*राज्यस्तरीय हँडबॉल स्पर्धेसाठी अंकुश ज्ञानेश्वर गिधाड याची निवड*-
रयत शिक्षण संस्थेच्या शारदा ज्युनिअर कॉलेज चा कला शाखेचा विद्यार्थी अंकुश गिधाड याची राज्यपातळीवर हँडबॉल स्पर्धेसाठी निवड झाली हँडबॉल असोसिएशन ऑफ महाराष्ट्र यांच्या विद्यमाने लोणंद सातारा येथे पाच ते सात सप्टेंबर या कालावधीत राज्यस्तरीय 19 वर्षे मुले या अजिंक्यपद स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे

या स्पर्धेसाठी अहिल्यानगर जिल्हा संघाची निवड चाचणी रविवार दिनांक 23 नोव्हेंबर 2025 मालपाणी हायस्कूल संगमनेर येथे झाली या चाचणीसाठी जवळपास 50 स्पर्धकांनी सहभाग नोंदवल्या होता या स्पर्धकांमधून आपल्या जुनिअर कॉलेजचा अंकुश ज्ञानेश्वर गिधाड याची उल्लेखनीय राज्यस्तरीय निवड झाली आहे तरी शारदा संकुलाच्या वतीने संकुलाचे अध्यक्ष रमेश शिंदे ,प्राचार्य अनिल बनसोडे, मुख्याध्यापिका हेमलता गुंजाळ, इंग्लिश मीडियम च्या प्राचार्यां निशा चेंगोट, ज्युनिअर कॉलेज उपप्राचार्य अशोक बोरसे ,सरकारी वकील गौरव बोर्डे, प्रा. शरद गमे, प्रा. रमेश आहेर, प्रा. बाळासाहेब दिघे, प्राध्यापिका सिंधू तनपुरे यांनी शुभेच्छा दिल्या या विद्यार्थ्याला राज्य पातळीवर पोहोचवण्यासाठी ज्युनिअर कॉलेजचे शिक्षक प्रसाद खोत,क्रिडा शिक्षक सुनिल बनसोडे यांनी विशेष परिश्रम घेतले या विद्यार्थ्याचं सर्व स्तरातून विशेष कौतुक होत आहे.




















