Homeताज्या बातम्यासोशल मीडियावरील दिशाभूल करणाऱ्या व बदनामीकारक पोस्टविरोधात शिर्डी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल

सोशल मीडियावरील दिशाभूल करणाऱ्या व बदनामीकारक पोस्टविरोधात शिर्डी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल

शिर्डी, दि. १० जून २०२६ :
श्री साईबाबा संस्थानच्या साई प्रसादालय, लाडू व बर्फी निर्मिती विभागाबाबत सोशल मीडियावर प्रसारित करण्यात आलेली एक बातमी पूर्णपणे खोटी, तथ्यहीन व दिशाभूल करणारी असून या माध्यमातून संस्थानची प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न करण्यात आल्याबाबत शिर्डी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे.
इन्स्टाग्रामवरील “24 News Marathi Official” या अकाऊंटवर श्री साईबाबा संस्थानविरोधात एफडीएने मोठी कारवाई करून लाडू निर्मिती केंद्र व प्रसादालय सील केल्याचा दावा करण्यात आला होता. सदर बातमीमध्ये कोणतेही तथ्य नसून श्री साईबाबा संस्थानचे साई प्रसादालय, लाडू व बर्फी निर्मिती विभाग नियमितपणे अन्न सुरक्षा व आरोग्य विषयक सर्व आवश्यक मानकांचे पालन करून कार्यरत आहेत.
संस्थानामार्फत चालविण्यात येणाऱ्या साई प्रसादालयात दररोज हजारो भाविकांना मोफत प्रसाद भोजन दिले जाते. तसेच लाडू व बर्फी निर्मिती विभागात तयार होणाऱ्या लाडू व बुंदी प्रसादाची गुणवत्ता सुनिश्चित करण्यासाठी आवश्यक तपासण्या तेथील प्रयोगशाळेत तसेच अन्न व औषध प्रशासनाच्या नियमांचे काटेकोर पालन केले जाते.
सोशल मीडियावरील संबंधित पोस्टमुळे साई भक्तांमध्ये संभ्रम निर्माण होण्याची तसेच संस्थानच्या प्रतिमेला धक्का पोहोचण्याची शक्यता असल्याने हे अकाउंट चालविणाऱ्या संबंधित व्यक्तीविरोधात कायदेशीर कारवाई व्हावी, अशी मागणी तक्रारीद्वारे करण्यात आली आहे.
श्री साईबाबा संस्थान सर्व साई भक्तांना आवाहन करते की, सोशल मीडियावर प्रसारित होणाऱ्या अप्रमाणित व दिशाभूल करणाऱ्या माहितीवर विश्वास ठेवू नये. संस्थानशी संबंधित अधिकृत माहिती केवळ संस्थानच्या अधिकृत माध्यमांद्वारेच ग्राह्य धरावी.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

ब्रिटिश भारतीय टोरी पीअर रामी रेंजर यांनी यूकेचे पीएम स्टारर यांना सीबीई रद्द केल्याबद्दल...

ब्रिटनचे पंतप्रधान कीर स्टारमर (एपी) लंडन: ब्रिटिश भारतीय टोरी पीअर लॉर्ड रेंजर यांनी त्यांची CBE (कमांडर ऑफ द ऑर्डर ऑफ द ब्रिटिश एम्पायर)...

*_नेपाळमध्ये शिर्डीच्या विद्यार्थ्यांची सुवर्ण कामगिरी; एव्हरेस्ट इंटरनॅशनल कराटे स्पर्धेत ५ पदकांची कमाई._*

*_नेपाळमध्ये शिर्डीच्या विद्यार्थ्यांची सुवर्ण कामगिरी; एव्हरेस्ट इंटरनॅशनल कराटे स्पर्धेत ५ पदकांची कमाई._* *नेपाळ येथे आयोजित करण्यात आलेल्या १२ व्या एव्हरेस्ट इंटरनॅशनल कराटे चॅम्पियनशिपमध्ये शिर्डी येथील...

बौद्ध समाजाच्या भावना दुखावणाऱ्यांवर कठोर कारवाईची मागणी; रिपब्लिकन पक्षाचे राहाता पोलिसांना निवेदन-श्री प्रदीप (...

बौद्ध समाजाच्या भावना दुखावणाऱ्यांवर कठोर कारवाईची मागणी; रिपब्लिकन पक्षाचे राहाता पोलिसांना निवेदन राहाता : कल्याण येथे बौद्ध भिक्कू संघावर झालेला हल्ला, बुद्ध भूमी जमीनदोस केल्याची घटना...

5-तासांचा नियम: बिल गेट्स ते इलॉन मस्क पर्यंत, सर्वात यशस्वी लोक त्यांचा मोकळा वेळ...

कामाच्या थकवणाऱ्या दिवसातून तुम्ही नुकतेच दारात गेलात. तुम्हाला भूक लागली आहे आणि खर्च झाला आहे, फक्त एक मिनिटासाठी तुमचा श्वास घ्यायचा आहे....

CJP चे अभिजीत दिपके म्हणतात, सार्वजनिक आंदोलनानंतर राजकीय पक्ष काढण्यात काहीच गैर नाही

पुणे: सार्वजनिक आंदोलनानंतर राजकीय पक्ष स्थापन करण्यात काहीच गैर नाही, असे सांगून झुरळ जनता पक्षाचे (सीजेपी) संस्थापक अभिजीत दिपके यांनी गुरुवारी सायंकाळी...

error: Content is protected !!