येथील डॉ. के. वाय. गाडेकर धन्वंतरी पतसंस्थेमध्ये महापरिनिर्वाण दिनानिमित विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस चेअरमन आणि भाजपा तालुकाध्यक्ष डॉ.स्वाधीन गाडेकर आणि प्रतिथयश वैद्यकीय व्यावसायिक डॉ. संतोष मोकळ यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
यावेळी डॉ. स्वाधीन गाडेकर म्हणाले की, आजची पिढी घरात उजेड कमी असला की पुस्तक हातात घेणार नाहीत परंतु ज्यांच्या घरात लाईटच नव्हती म्हणून पथदिव्यांच्या खाली अभ्यास करून ज्यांची शिक्षण पूर्ण केले, या देशाला संविधान दिले, कायद्याचे राज्य आणले त्या डॉ. आंबेडकरांचे विचार आत्मसाद करून कृतीत उतरविण्याचे आव्हान तरुण पिढी समोर आहे.

यावेळी सुयोग शेळके, राजेंद्र निकाळे, भाजपा भटक्या विमुक्त आघाडीचे तालुकाध्यक्ष चेतन रनमळे, सोमनाथ सोनवणे, संजय भालेराव, मनीष चितळकर, संदीप गाडेकर, सुनील पाळंदे, मोहम्मद शेख, वसंत निकाळे, किशोर खरात, सुनंदा खरात, अरुण मेहेत्रे, राधाकिसन भुजबळ, रोहन गाडेकर, महेश त्रिभुवन, सचिन तुरकणे आदी उपस्थित होते.




















