Homeटेक्नॉलॉजीसौर ऊर्जा प्रकल्प संगमनेर तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी ठरणार वरदान—पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील.

सौर ऊर्जा प्रकल्प संगमनेर तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी ठरणार वरदान—पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील.

सौर ऊर्जा प्रकल्प संगमनेर तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी ठरणार वरदान – पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील

शिर्डी, दि. ४ – शासनाने मुख्यमंत्री सौर ऊर्जा कृषी वाहिनी योजनेच्या माध्यमातून राज्याला भारनियमनमुक्त करण्याचे धोरण स्वीकारले असून, तालुक्यातील आठ गावांसाठी सुरू झालेला सौर ऊर्जा प्रकल्प शेतकऱ्यांसाठी वरदान ठरेल, असा विश्वास जलसंपदा मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी व्यक्त केला.

संगमनेर तालुक्यातील निमोण येथील ३३/११ के.व्ही. उपकेंद्रावर मुख्यमंत्री सौर ऊर्जा कृषी वाहिनी योजनेअंतर्गत सौर ऊर्जा प्रकल्प उभारण्यात आला आहे. या प्रकल्पाचे उद्घाटन पालकमंत्री विखे पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी आमदार अमोल खताळ, आमदार काशिनाथ दाते, महावितरणचे कार्यकारी अभियंता प्रदीप वट्टमवार आदी होते. हिरवा झेंडा दाखवून पालकमंत्री विखे पाटील यांनी सौर प्रकल्प कार्यान्वित केला.

कर्हे परिसरातील शासनाच्या २५ एकर जागेवर ६ मेगावॅट क्षमतेचा सौर प्रकल्प उभारण्यात आला आहे. या प्रकल्पामुळे निमोण उपकेंद्राखालील पळसखेडे, निमोण, कर्हे, सोनेवाडी, पिंपळे, सोनोशी, बिरेवाडी व नान्नजदुमाला या आठ गावांतील १,८५७ शेतकऱ्यांना सकाळी ९ ते संध्याकाळी ५ या वेळेत सातत्याने वीजपुरवठा होणार आहे.

पालकमंत्री विखे पाटील म्हणाले, “मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सौर ऊर्जेला विकास प्रक्रियेचा एक महत्त्वाचा भाग मानले असून, राज्यातील भारनियमनाचा प्रश्न कायमस्वरूपी सोडवण्यासाठी मुख्यमंत्री सौर कृषी योजना प्रभावीपणे राबवली जात आहे. या योजनेचा दुसरा टप्पा सध्या कार्यान्वित असून, संगमनेर तालुक्यातील हा पहिला प्रकल्प शेतकऱ्यांसाठी एक क्रांतिकारी पाऊल आहे.”

ते पुढे म्हणाले, “शासनाने यापूर्वीच ७ अश्वशक्तीपर्यंतच्या पंपांसाठी शेतकऱ्यांचे वीजबिल माफ करण्याचा निर्णय घेतला आहे. राज्यभरातील भारनियमन हटवण्यासाठी सौर ऊर्जेचे जाळे अधिक विस्तारित केले जात असून, या धोरणात कृषी क्षेत्रासह घरगुती व व्यापारी ग्राहकांनाही सामावून घेतले जात आहे.”

*****

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

'पेड्डी' बॉक्स ऑफिस कलेक्शन दिवस 8: राम चरण चित्रपटात आणखी घसरण; जगभरात जवळपास रु...

राम चरणच्या स्पोर्ट्स ॲक्शन ड्रामा 'पेड्डी'ने थिएटरमध्ये आठ दिवस पूर्ण केल्यामुळे संकलनात आणखी एक घट झाली. दमदार ओपनिंग आठवड्यानंतर, चित्रपटाची रोजची कमाई...

आजची यहुदी म्हण: “जो तुम्हाला त्याचे सर्व त्रास सांगतो त्याच्यावर कधीही विश्वास ठेवू नका...

दिवसाची ज्यू म्हण (Google Gemini द्वारे व्युत्पन्न केलेली प्रतिमा) बहुतेक लोकांना असे कोणीतरी भेटले आहे.संभाषण सामान्यपणे सुरू होते. काही मिनिटांत, ते समस्यांकडे वळते:...

दिपके यांच्या 5-सूत्री घोषणापत्रात पेपर लीक, रद्द झालेल्या परीक्षा आणि निकाल विलंबाची भरपाई मागितली...

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात (SPPU) झुरळांचा जनता पक्षाचा (CJP) गुरुवारी निषेध. CJP चे संस्थापक अभिजित दिपके (निळ्या रंगात) आणि शिक्षण सुधारक सोनम वांगचुक...

इतिहास घडवला! बांगलादेशने ऑस्ट्रेलियावर पहिली वनडे मालिका जिंकली

बांगलादेशचा मुस्तफिझूर रहमान, केंद्र, संघसहकाऱ्यांसोबत साजरा करत आहे (एपी फोटो) बांगलादेशने गुरुवारी ऑस्ट्रेलियावर पहिला वनडे मालिका जिंकून इतिहास रचला, दुसऱ्या सामन्यात पाच गडी...

ब्रिटिश भारतीय टोरी पीअर रामी रेंजर यांनी यूकेचे पीएम स्टारर यांना सीबीई रद्द केल्याबद्दल...

ब्रिटनचे पंतप्रधान कीर स्टारमर (एपी) लंडन: ब्रिटिश भारतीय टोरी पीअर लॉर्ड रेंजर यांनी त्यांची CBE (कमांडर ऑफ द ऑर्डर ऑफ द ब्रिटिश एम्पायर)...

error: Content is protected !!