विद्यार्थ्यांनी घेतला राखी बनविण्याचा आनंद: शारदा कन्या विद्या मंदिर चा अनोखा उपक्रम
राहाता: शहरातील रयत शिक्षण संस्थेच्या शारदा कन्या विद्यामंदिर येथे शनिवार दिनांक 2/8/2025 रोजी विद्यार्थ्यांनी राखी बनवण्याचा आनंद घेतला. विद्यार्थ्यांना शाळेच्या मैदानावर गटानुसार बसविण्यात आले. सुरुवातीला कलाशिक्षक श्री लव्हारकर सर यांनी राखी बनवण्याचे प्रात्यक्षिक दाखवले. त्यानंतर विद्यार्थ्यांनी आपणाकडील राखी बनवण्यासाठी आवश्यक असलेली साहित्य यांची जुळवाजुळ करून आकर्षक राख्या बनवल्या.
विद्यार्थिनींनी स्वतः राख्या बनवल्या व राख्या बनवण्याचे प्रात्यक्षिक समजून घेतले व तयार केलेल्या राख्या विद्यालयातील विद्यार्थिनींनी सीमेवर लढणाऱ्या सैनिकांसाठी पोस्टाने पाठवून दिल्या यासाठी विद्यालयाच्या मुख्याध्यापिका सौ गुंजाळ मॅडम गुरुकुल प्रमुख श्री राठोड सर त्याचबरोबर चित्रकला शिक्षक श्री लव्हारकर सर उऱ्हे सर श्री किशोर जाधव सर यांनी विशेष प्रयत्न केले व विद्यार्थिनींनी प्रात्यक्षिकेचा स्वतः अनुभव घेतला विद्यार्थिनींच्या कलागुणांना वाव देण्यासाठी सदर उपक्रम विद्यालयात राबविण्यात आला




















