शिर्डी (प्रतिनिधी ) महेंद्रसिंग धोनी यांची पत्नी साक्षी धोनी यांनी मुलगी झिवा धोनी सोबत शिर्डीत येऊन साईबाबांच्या समाधीचे मनोभावे दर्शन घेतले. यावेळी त्यांनी माध्यान्ह आरतीला हजेरी लावत साईचरणी लीन झाल्या.
दर्शनानंतर साईबाबा संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर आणि उपकार्यकारी अधिकारी भिमराज दराडे यांनी साक्षी धोनी यांचा साईबाबांची मूर्ती व शाल देऊन सत्कार केला. या प्रसंगी शिर्डी नगरपरिषद आरोग्य विभागाचे सभापती दीपक गोंदकर उपस्थित होते.
दर्शनानंतर साक्षी धोनी यांनी द्वारकामाई आणि गुरुस्थान येथेही भेट देत प्रार्थना केली. त्यानंतर त्यांनी साईबाबा संस्थानच्या वैद्यकीय निधीसाठी तब्बल ७ लाख रुपयांची देणगी दिली.
यावेळी बोलताना साक्षी म्हणाल्या की, “मी लहानपणापासून आई-वडिलांसोबत शिर्डीत येत आहे. साईबाबांच्या दर्शनाने मनाला शांती आणि समाधान मिळते. माझी मुलगी झिवा हिला पहिल्यांदाच येथे घेऊन आले असून तिलाही या ठिकाणाची अनुभूती मिळावी ही इच्छा होती.”
साईबाबांच्या समाधीचे दर्शन घेतल्यानंतर एक वेगळीच सकारात्मक ऊर्जा मिळते, जी शब्दांत सांगता येणार नाही.”
दरम्यान, महेंद्रसिंग धोनी यांना शिर्डीत कधी आणणार, असा प्रश्न विचारण्यात आला असता साक्षी यांनी स्पष्टपणे सांगितले, “साईबाबांचं बोलावणं आल्याशिवाय कोणीही त्यांच्या दर्शनासाठी येऊ शकत नाही. जेव्हा त्यांना बोलावणं येईल, तेव्हा आम्ही नक्कीच त्यांना येथे घेऊन येऊ





















