*”डॉ. संतोष मैड यांचा मोतीबिंदू शस्त्रक्रिया यशस्वी केल्याबद्दल साहित्यप्रेमी मंडळाच्या वतीने विशेष सन्मान.”*
राहाता येथील डॉ. मैड मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल येथे 2000 मोतीबिंदू शस्त्रक्रिया यशस्वीरित्या पूर्ण करण्यात आल्याबद्दल डॉ. संतोष मैड यांचा साहित्यप्रेमी मंडळ सोमेश्वरनगर ता- बारामती या साहित्य संस्थेचे संस्थापक अध्यक्ष- प्रा. हनुमंत माने यांच्या वतीने विशेष सन्मान करण्यात आला.
डॉ. संतोष मैड यांचे कार्य म्हणजे समाजासाठी एक प्रेरणादायी दीपस्तंभ आहे. वैद्यकीय क्षेत्रात त्यांनी केलेले योगदान अतुलनीय असून, त्यांच्या सेवेमुळे हजारो रुग्णांचे जीवन नव्या आशेने उजळले आहे. मोतीबिंदू शस्त्रक्रियांद्वारे दृष्टीदान करणे. ही केवळ वैद्यकीय कामगिरी नसून ती मानवतेची खरी साधना आहे.
रुग्णांची सेवा हीच देवसेवा या तत्त्वावर डॉ. मैड कार्यरत आहेत. त्यांच्या निःस्वार्थी सेवाभावामुळे आणि अत्याधुनिक वैद्यकीय सेवा ग्रामीण भागात उपलब्ध करून दिल्यामुळे समाज आरोग्यदायी आणि सक्षम होत आहे.
साहित्यप्रेमी मंडळ, सोमेश्वरनगर यांच्या वतीने अशा विलक्षण कार्याचा सन्मान करताना आम्हाला अभिमान वाटतो.
डॉ. संतोष मैड यांचे कार्य हे समाजासाठी आदर्श आहे. आणि आगामी काळात ते आणखी अनेक लोकांच्या जीवनाला प्रकाश देतील, याचा आम्हाला पूर्ण विश्वास आहे.
असे गौरव उद्गार प्रा. हनुमंत माने यांनी व्यक्त केले.
प्रगत फेको मशीन व झाईस मायक्रोस्कोपच्या द्वारे सूक्ष्म व सुरक्षित शस्त्रक्रिया करून रुग्णांना स्पष्ट दृष्टी परत मिळवून देण्यात यश आले आहे. या सर्व शस्त्रक्रिया परवडणाऱ्या दरात करण्यात आल्या असून गुणवत्तेशी कोणतीही तडजोड करण्यात आलेली नाही. आणि यापुढेही अधिकाधिक रुग्णांना गुणवत्तापूर्ण आणि सुलभ उपचार देण्याचा डॉ.संतोष मैड यांनी मानस व्यक्त केला.
याप्रसंगी जेष्ठ पत्रकार राजू भाई पठाण ,प्रितम नवदे,काळोखे सर,डॉ आशुतोष मैड,डॉ कविता खांडरे,कैलास बोरहाडे,सुधाकर पाटील,संदेश गायकवाड,तैयमुर इनामदार,शुभम पवार आसिफ अंसारी,मंदार कुलकर्णी व इतर मान्यवर आवर्जून उपस्थित होते.




