Homeउद्योग*गणेशनगरच्या चिमुकल्यांनी घेतला खरेदी-विक्रीचा आनंद*—-श्री संजय घोलप ( मुख्याध्यापक )

*गणेशनगरच्या चिमुकल्यांनी घेतला खरेदी-विक्रीचा आनंद*—-श्री संजय घोलप ( मुख्याध्यापक )

*गणेशनगरच्या चिमुकल्यांनी घेतला खरेदी-विक्रीचा आनंद*

गणेशनगर जिल्हा परिषद शाळेतील मुलांनी शनिवारी आनंद बाजार भरवला होता. त्यात त्यांनी त्यांच्या कल्पनेप्रमाणे भाजीपाला,फळे,स्टेशनरी, कोल्ड्रिंक्स ,खेळण्या, सौंदर्यप्रसाधने तसेच खाण्याच्या विविध प्रकारचे स्टॉल लावले होते. जवळपास 48 स्टॉल विद्यार्थ्यांनी लावले होते. विशेष म्हणजे बाल आनंद बाजारात खाऊ गल्ली सर्वांचे लक्ष वेधून घेत होती, गावातील पदाधिकारी, शिक्षक ,पालक, ग्रामस्थ यांनी मनसोक्तपणे खरेदी करून खवय्येगिरी केली आणि मुलांचे कौतुक केले. बाल आनंद मेळावा भरवण्याचा मुख्य उद्देश म्हणजे मुलांना खरेदी-विक्रीचे ज्ञान मिळावे ,शाळेत मिळालेल्या ज्ञानाचे प्रत्यक्ष व्यवहारात उपयोजन करता यावे. शाळेतील मुलांनी ग्राहक आणि विक्रेता या भूमिकेचा प्रत्यक्ष अनुभव घेतला.

व्यवहार करताना किंवा बाजारात बसताना शेतकरी, व्यापारी यांना किती कष्ट असावे लागतात याचा ज्वलंत अनुभव घेतला. शाळेचे मुख्याध्यापक संजय घोलप यांच्या मार्गदर्शनाखाली शाळेतील शिक्षक कैलास चिंधे ,सुनील गायकवाड ,दत्ता गायकवाड ,सुनीता गागरे, मनीषा निर्मळ व्हेरोणिका गायकवाड, सोनल भावसार ,भाऊसाहेब सहाने ,रोशन धनवटे यांच्या परिश्रमाने मेळावा यशस्वी झाला. मुलांच्या या बाल आनंद मेळाव्यात गणेश कारखान्याचे संचालक अनिल गाढवे, सरपंच सुनीताताई कासार ,दत्तकृपा पतसंस्थेचे सोपान कासार ,महेश आहेर ,एकरुखे शाळेचे मुख्याध्यापक राधाकिसन दळवी, गावातील पदाधिकारी, पालक ,ग्रामस्थ यांनी भेट देऊन खरेदीचा आनंद घेतला व विद्यार्थ्यांचे कौतुक केले .
बाल आनंद मेळाव्याचे संपूर्ण संचालन दत्ता गायकवाड आणि वेरोनिका गायकवाड यांनी केले तर मनीषा निर्मळ यांनी सर्वांचे आभार मानले .शाळेच्या या नावीन्यपूर्ण उपक्रमाचे गटशिक्षणाधिकारी राजेश पावसे, विस्ताराधिकारी विष्णू कांबळे व भाऊसाहेब घोरपडे, केंद्रप्रमुख सोमनाथ वैद्य यांनी विशेष कौतुक केले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

प्रभसिमरन सिंग, श्रेयस अय्यर यांनी पंजाब किंग्जच्या मुंबई इंडियन्सचा 7 विकेट्सने पराभव केला.

प्रभसिमरन सिंग आणि पीबीकेएसचा कर्णधार श्रेयस अय्यर. (फोटो क्रेडिटः आयपीएल) नवी दिल्ली: पंजाब किंग्जने गुरुवारी वानखेडे स्टेडियमवर यजमानांचा सलग चौथा पराभव करताना मुंबई...

प्रीमियम राहण्यासाठी गुरुग्राममधील टॉप 5 पॉश निवासी क्षेत्रे

लक्झरी व्हिला, हिरवे क्षेत्र आणि उच्च-स्तरीय सुरक्षा वैशिष्ट्यीकृत, ॲम्बियन्स आयलंड हे सर्वात उच्चभ्रू समुदायांपैकी एक आहे. हे NH-48 जवळ आणि दिल्लीच्या अगदी जवळ स्थित...

पुण्यातील RMCs ऑपरेशनला विराम देतात, नियमांची स्पष्टता, एकसमान अंमलबजावणी शोधतात

पुणे: शहरातील रेडी मिक्स काँक्रिट ऑपरेटर्सनी संबंधित सर्व प्राधिकरणांनी एकत्रित मार्गदर्शक तत्त्वे तयार करेपर्यंत उत्पादन थांबवले आहे, तरीही नागरी संस्थेने वनस्पतींवर कारवाई सुरू ठेवली...

डिस्ट्रिक्ट गव्हर्नर MJF लायन राजेशजी अग्रवाल यांची लायन्स क्लब राहता येथील क्लबला भेट—-डॉ संजय...

डिस्ट्रिक्ट गव्हर्नर MJF लायन राजेशजी अग्रवाल यांची लायन्स क्लब राहता येथील क्लब भेट, डॉ संजय उबाळे आज दिनांक 12 एप्रिल रोजी हॉटेल साई स्वाद, राहाता...

IPL 2026: रोहित शर्मा MI vs PBKS सामन्यात का खेळत नाही?

नवी दिल्ली: पंजाब किंग्ज विरुद्ध मुंबई इंडियन्सच्या लढतीत एका प्रश्नाचे वर्चस्व होते: रोहित शर्मा खेळेल का?सामन्याच्या एक दिवस आधी अनिश्चितता दाटून आली...

error: Content is protected !!