भाजपा युवा मोर्चा राहाता मंडल अध्यक्षपदी सागर कापसे
राहाता
पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, डॉ. सुजय विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली राहाता मंडल अध्यक्ष डॉ. स्वाधीन गाडेकर यांनी राहाता मंडलची कार्यकारणी नव्याने घोषित केली. या निवडीत भाजपा युवा मोर्चा मंडल अध्यक्षपदी पिंपळस येथील भाजपाचे सागर भाऊसाहेब कापसे यांची नियुक्ती करण्यात आली.
श्री. कापसे यांनी भाजपा बूथ अध्यक्ष, युवा मोर्चा मध्ये यापूर्वी तालुका सरचिटणीस, जिल्हा उपाध्यक्ष, पिंपळस ग्रामपंचायत
सदस्य या पदावर सक्रिय काम केले आहे. पक्षाचे बूथ सक्षमीकरण अभियान प्रवाहीपणे राबवणे, आंदोलन, मोर्चा यामध्ये सहभाग आणि पक्षाचे प्रदेशस्तरावरील कार्यक्रम स्थानिक स्तरावर राबवले आहेत. त्यामुळे या पदावर काम करण्याची संधी देण्यात आली. या निवडीच्या प्रसंगी ना. राधाकृष्ण विखे पाटील, डॉ. सुजय विखे पाटील, जिल्हा अध्यक्ष नितीन दिनकर, जिल्हा सरचिटणीस नितीनराव कापसे पाटील, राहाता मंडल अध्यक्ष डॉ. स्वाधीन गाडेकर यांनी अभिनंदन केले.




















