Homeताज्या बातम्याश्री गुरुपौर्णिमा उत्सव शिर्डी-२०२५ सोने चांदी रोख रक्कम व सर्व प्रकारच्या देणग्या...

श्री गुरुपौर्णिमा उत्सव शिर्डी-२०२५ सोने चांदी रोख रक्कम व सर्व प्रकारच्या देणग्या मिळून ६,३१,३१,३६२/-( अक्षरी रुपये,सहा कोटी एकतीस लाख,एकतीस हजार,तीनशे बासस्ठ मात्र)इतकी रक्कम साई बाबांच्या झोळीत जमा.

श्री गुरुपौर्णिमा उत्‍सव २०२५
शिर्डी –
श्री साईबाबा संस्‍थान विश्‍वस्‍तव्‍यवस्‍था, शिर्डीच्‍या वतीने बुधवार दि. ०९ जुलै ते शुक्रवार दि. ११ जुलै या कालावधीत आयोजित केलेल्‍या श्री गुरूपौर्णिमा उत्‍सव कालावधीत दक्षिणापेटी, देणगी काऊंटर, ऑनलाईन, चेक डीडी, मनिऑर्डर, डेबीट-क्रेडीट कार्ड, युपीआय, सोने, चांदी व दर्शन/आरतीपास शुल्‍क इ. सर्व मार्गांनी मिळून एकूण रक्‍कम रु.६,३१,३१,३६२/- (अक्षरी – सहा कोटी, एकतीस लाख, एकतीस हजार, तिनशे बासष्‍ट मात्र) इतकी देणगी प्राप्‍त झाली असल्‍याची माहिती श्री साईबाबा संस्‍थानचे मुख्‍य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर यांनी दिली.
सदर देणगी मध्‍ये रोख स्‍वरुपात रुपये ०१ कोटी ८८ लाख ०८ हजार १९४ दक्षिणा पेटीत प्राप्‍त झाली असून, देणगी काऊंटर ०१ कोटी १७ लाख ८४ हजार ५३८ रुपये, पी.आर.ओ. सशुल्‍क पास ५५ लाख ८८ हजार २००, डेबीट क्रेडीट कार्ड,ऑनलाईन देणगी, चेक डी.डी.देणगी, मनी ऑर्डर असे एकूण ०२ कोटी ०५ लाख ७६ हजार ६२६ रुपये, सोने ६६८.४०० ग्रॅम रक्‍कम रुपये ५७ लाख ८७ हजार ९२५ व चांदी ६,७९८.६८० ग्रॅम रक्‍कम रुपये ०५ लाख, ८५ हजार ८७९ यांचा समावेश आहे.
श्री गुरूपौर्णिमा उत्‍सव कालावधीत साधारणतः ०३ लाखाहून अधिक साईभक्‍तांनी साईदर्शनाचा लाभ घेतला. उत्‍सव कालावधी मध्‍ये श्री साईप्रसादालयाद्वारे सुमारे ०१ लाख ८३ हजार ५३२ साईभक्‍तांनी प्रसाद भोजनाचा लाभ घेतला तर दर्शन रांगेत ०१ लाख ७७ हजार ८०० साईभक्‍तांना मोफत बुंदी प्रसाद पाकीटांचे वाटप करण्‍यात आले. या कालावधीत सशुल्‍क प्रसादरुपी लाडू पाकीटांच्‍या विक्रीतून ६४ लाख ०५ हजार ४६० रूपये प्राप्‍त झाले. उत्‍सव काळात हजारो साईभक्‍तांनी संस्‍थानच्‍या साईप्रसाद निवासस्‍थान, साईबाबा भक्‍तनिवासस्‍थान, व्‍दारावती निवासस्‍थान, साईआश्रम निवास व साईधर्मशाळा आदी ठिकाणांबरोबर अतिरिक्‍त निवास व्‍यवस्‍थेकरीता उभारण्‍यात आलेल्‍या मंडपात निवास व्‍यवस्‍थेचा लाभ घेतला. तसेच साईधर्मशाळा येथे विविध भागातून आलेल्‍या पालख्‍यांमधील पदयात्री साईभक्‍तांनी निवास व्‍यवस्‍थेचा लाभ घेतला.
सदर देणगीचा वापर श्री साईबाबा संस्‍थानचे प्रसादालय, रुग्‍णालये, शैक्षणिक संकुल यासेवाकार्या बरोबरच साईभक्‍तांच्‍या विविध सेवा सुविधांसाठी होत असल्‍याचे मुख्‍य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर यांनी सांगितले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

घरामध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुम्ही “सन टेस्ट” केली आहे का?

भारतातील बहुतेक भागांमध्ये, पूर्वाभिमुख आणि उत्तराभिमुख घरे सामान्यतः सर्वात आरामदायक मानली जातात कारण त्यांना मऊ आणि अधिक संतुलित सूर्यप्रकाश मिळतो. पूर्वाभिमुख घरे सकाळचा आल्हाददायक...

पुण्यातील तांत्रिकाची आत्महत्या: सहकाऱ्याच्या आत्महत्येस प्रवृत्त करणाऱ्या तीन आरोपींसह आयटी फर्मच्या दोन महिला अधिकाऱ्यांचा...

AI-व्युत्पन्न केलेली प्रतिमा प्रातिनिधिक हेतूसाठी वापरली जाते. पुणे - भोसरी पोलिसांनी हिंजवडी येथील एका प्रख्यात आयटी कंपनीतील दोन महिला अधिकारी आणि 48 वर्षीय...

'कोणालाही हारलो, पण पाकिस्तानला नाही': जेमिमाह रॉड्रिग्स IND vs PAK महिला T20 विश्वचषक सलामीच्या...

जेमिमाह रॉड्रिग्ज (पीटीआय फोटो/शैलेंद्र भोजक) नवी दिल्ली: भारताची फलंदाज जेमिमाह रॉड्रिग्ज हिने रविवारी बर्मिंगहॅम येथे होणाऱ्या ICC महिला T20 विश्वचषक 2026 च्या उभय...

अमेरिकन सरकारने इंटेल, आयबीएम आणि इतर अमेरिकन कंपन्यांमध्ये भाग घेतल्याने बिल गेट्स खूश नाहीत;...

बिल गेट्स यांनी ट्रम्प प्रशासनाच्या खाजगी अमेरिकन कंपन्यांमधील इक्विटी स्टेक उचलण्याच्या वाढत्या सवयीबद्दल शांत परंतु निदर्शनास चिंतेचा झेंडा दाखवला आहे, असा इशारा...

सुदर्शन पटनायकने रशिया ग्रँड सँड मास्टर चषक 2026 जिंकला: पद्मश्री पुरस्कार विजेत्याला भेटा, ज्यांनी...

ओडिशाचे प्रसिद्ध वाळू कलाकार, सुदर्शन पटनाईक यांनी ऐतिहासिक विजय संपादन केला आहे, जो रशिया ग्रँड सँड मास्टर कप 2026 जिंकणारा पहिला भारतीय बनला...

error: Content is protected !!