Homeताज्या बातम्यास्वतंत्र दिनानिमित्त राहाता न्यायालयात स्वच्छता अभियान—-डॉ बाप्पूसाहेब पानगव्हाने ( साईयोग फाउंडेशन अध्यक्ष)

स्वतंत्र दिनानिमित्त राहाता न्यायालयात स्वच्छता अभियान—-डॉ बाप्पूसाहेब पानगव्हाने ( साईयोग फाउंडेशन अध्यक्ष)

स्वतंत्र दिना निमित्त राहाता न्यायालयात स्वच्छता अभियान….
सालाबादप्रमाणे स्वातंत्रदिनाच्या पूर्वी राहाता विधी सेवा समिती,राहाता वकील संघ व साईयोग फाउंडेशन राहाता द्वारे रविवारी भल्या पहाटे माननीय न्यायाधीशांच्या मार्गदर्शनाखाली स्वच्छता अभियान राबविण्यात आले.याप्रसंगी वरिष्ठ न्यायाधीश एस बी शेख,वरिष्ठ न्यायाधीश के सी रजपूत,वरिष्ठ न्यायाधीश एस एस तट तसेच कनिष्ठ न्यायाधीश पी आर फुलारी,कनिष्ठ न्यायाधीश एस आर भरड यांनी स्वतः हातात झाडू घेऊन अभियानात उत्स्फूर्त सहभाग नोंदविला.न्यायालय परिसरातील प्लास्टिक बाटल्या,कचरा गोळा करण्यात आला.मोठ्या झाडांच्या अनावश्यक फांद्या छाटण्यात आल्या.तसेच अनावश्यक गवत,झाडी झुडपे फावड्याने काढून संपूर्ण परिसर झाडून स्वच्छ करण्यात आला.
स्वच्छतेनंतर साईयोग फाउंडेशन द्वारे सर्व सन्माननीय न्यायाधीश महोदय,वकील संघाचे पदाधिकारी तसेच न्यायालयीन कर्मचाऱ्यांचा साईशाल व गुलाब पुष्प देऊन सत्कार करण्यात आला.साईयोग फाउंडेशनचे जेष्ठ सदस्य ॲड.दिगंबर धनवटे यांनी सर्वांचे स्वागत करून प्रास्ताविक केले.गेली अकरा वर्षांपासून साईयोग फाउंडेशन राहाता न्यायालय परिसरात स्वतंत्र दिन व प्रजासत्ताक दिनानिमित्त स्वच्छता अभियान अविरत राबवत असून सर्वांचे सहकार्य मिळत असल्याचे नमूद केले.जेष्ठ सदस्य ॲड गोरखनाथ दंडवते यांनी न्यायालय परिसरात अस्वच्छता होणार नाही याची दक्षता घेण्याची विनंती केली.वरिष्ठ न्यायाधीश के सी रजपूत यांनी मनोगत व्यक्त करताना साईयोग फाउंडेशनच्या सामाजिक कार्याचे कौतुक करत आभार मानले तसेच ह्या परिसरात स्वच्छता राहील त्यासाठी शक्य ते प्रयत्न केले जातील याची ग्वाही दिली.राहाता वकील संघाचे अध्यक्ष ॲड शिवाजी चौधरी यांनी सर्वांचे आभार मानले.शेवटी सर्वांना न्यायालयाच्या वतीने स्वादिष्ट नाष्टा व चहापान करून समारोप करण्यात आला.
या अभियानात साईयोग फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष डॉ बापूसाहेब पानगव्हाणे,वकील संघाचे खजिनदार ॲड प्रविण सापते,सुष्मिता चव्हाण,नीलम चेनुके,विलास वाळेकर,मोहन तांबे,संजय बाबर,संदीप डांगे,प्रताप गमे,परमेश चव्हाण,राजू वायकर,अरविंद बावके,दीपक दंडवते,रवींद्र धस,व्यंकटेश अहिरे,सिताराम बावके,उमेश लुटे,शिवाजी पोटे,कैलास चेनुके,नारायण गाडेकर,ज्ञानेश्वर आरणे,भागवत वाघमारे,प्रणव लावर तसेच न्यायालयीन कर्मचारी उपस्थित होते.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

ऑस्ट्रेलिया महिला 2.3 षटकात 9/1 | ऑस्ट्रेलिया महिला वि दक्षिण आफ्रिका महिला लाइव्ह स्कोअर,...

ऑस्ट्रेलियाने त्यांच्या ICC महिला T20 विश्वचषक 2026 च्या मोहिमेची सुरुवात मँचेस्टरमधील ओल्ड ट्रॅफर्ड येथे दक्षिण आफ्रिकेविरुद्ध गट 1 च्या लढतीने केली. सहा वेळचा चॅम्पियन...

चंदीगड स्टोअरमध्ये गोळ्यांचा पाऊस : कॅशियरची गोळ्या झाडून हत्या; 13 राऊंड गोळीबार, थंडगार सीसीटीव्ही...

चंदीगड: चंदीगडच्या सेक्टर 11 मधील एका मेडिकल स्टोअरमधील कॅशियरची शनिवारी दुपारी दोन मुखवटाधारी व्यक्तींनी दुकानात गोळीबार केल्याने त्याची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली.या हल्ल्यात...

घरामध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुम्ही “सन टेस्ट” केली आहे का?

भारतातील बहुतेक भागांमध्ये, पूर्वाभिमुख आणि उत्तराभिमुख घरे सामान्यतः सर्वात आरामदायक मानली जातात कारण त्यांना मऊ आणि अधिक संतुलित सूर्यप्रकाश मिळतो. पूर्वाभिमुख घरे सकाळचा आल्हाददायक...

पुण्यातील तांत्रिकाची आत्महत्या: सहकाऱ्याच्या आत्महत्येस प्रवृत्त करणाऱ्या तीन आरोपींसह आयटी फर्मच्या दोन महिला अधिकाऱ्यांचा...

AI-व्युत्पन्न केलेली प्रतिमा प्रातिनिधिक हेतूसाठी वापरली जाते. पुणे - भोसरी पोलिसांनी हिंजवडी येथील एका प्रख्यात आयटी कंपनीतील दोन महिला अधिकारी आणि 48 वर्षीय...

'कोणालाही हारलो, पण पाकिस्तानला नाही': जेमिमाह रॉड्रिग्स IND vs PAK महिला T20 विश्वचषक सलामीच्या...

जेमिमाह रॉड्रिग्ज (पीटीआय फोटो/शैलेंद्र भोजक) नवी दिल्ली: भारताची फलंदाज जेमिमाह रॉड्रिग्ज हिने रविवारी बर्मिंगहॅम येथे होणाऱ्या ICC महिला T20 विश्वचषक 2026 च्या उभय...

error: Content is protected !!