Homeताज्या बातम्यालायन्स क्लब इंटरनॅशनल डिस्ट्रिक्ट ३२३४ डी२ अंतर्गत झोन अॅडव्हायझरी मिटिंग शिर्डी...

लायन्स क्लब इंटरनॅशनल डिस्ट्रिक्ट ३२३४ डी२ अंतर्गत झोन अॅडव्हायझरी मिटिंग शिर्डी येथील निसर्ग हॉटेलमध्ये अत्यंत उत्साहात व यशस्वीरित्या पार —-डॉ संजय उबाळे. ( झोन चेअरपर्सन MJF )

लायन्स क्लब इंटरनॅशनल डिस्ट्रिक्ट ३२३४ डी२ अंतर्गत झोन अॅडव्हायझरी मिटिंग दिनांक १० ऑगस्ट २०२५ रोजी शिर्डी येथील निसर्ग हॉटेलमध्ये अत्यंत उत्साहात व यशस्वीरित्या पार पडली. या बैठकीस डिस्ट्रिक्ट गव्हर्नर PMJF लायन राजेश अग्रवाल यांची प्रमुख उपस्थिती लाभली होती. यांच्यासोबत झोन चेअरपर्सन MJF डॉ. संजय उबाळे, विविध कॅबिनेट ऑफिसर्स, सिनिअर मेंबर्स तसेच लायन्स आणि लिओ क्लबचे PST पदाधिकारी देखील मोठ्या संख्येने उपस्थित होते.

या झोन अॅडव्हायझरी मिटिंगमध्ये सर्व क्लब्सनी आपापल्या सामाजिक कार्याचा, उपक्रमांचा व योजनांचा सुसुत्र व प्रभावी आढावा सादर केला. यावेळी झोन सेक्रेटरी म्हणून लायन्स क्लब संगमनेर सैफ्रॉन सफायरचे लायन कल्याण कासाट आणि झोन ट्रेझरर म्हणून लायन्स क्लब कोपरगावचे लायन संदीप राशीनकर यांची नियुक्ती करण्यात आली. या निवडीमुळे झोनमध्ये नवचैतन्याचे व नेतृत्वाच्या सशक्त दिशादर्शनाचे संकेत मिळाले.

या प्रसंगी डिस्ट्रिक्ट गव्हर्नर लायन राजेश अग्रवाल यांनी आपल्या मार्गदर्शनपर भाषणात सर्व उपस्थितांना समाजोपयोगी सेवा उपक्रमांमध्ये अधिक सक्रिय सहभागासाठी प्रेरित केले. त्यांनी “सर्व्हायकल कॅन्सर जनजागृती”, “नेत्र तपासणी शिबिरे”, “नया सवेरा” उपक्रम, LCIF डोनेशन यांसारख्या महत्वपूर्ण विषयांवर सखोल विवेचन केले. त्यांच्या विचारमंथनात्मक भाषणामुळे उपस्थित सदस्यांमध्ये समाजसेवेविषयी नवचैतन्य निर्माण झाले. झोन चेअरमन डॉ. संजय उबाळे यांनी डिस्ट्रिक्ट गव्हर्नर यांच्या उपस्थितीबद्दल विशेष आभार मानले आणि क्लबच्या PST प्रतिनिधींना आगामी कार्यासाठी मार्गदर्शन दिले.

या बैठकीस डिस्ट्रिक्ट चेअरपर्सन चेतन भुताडा, MJF उमेश अग्रवाल, प्रकाश सदाफळ, डॉ. कुटे, अंजली उबाळे, अक्षय गिरमे, संदीप राशीनकर राहुल अरबत्ती, योगेश पटेल, प्रसाद नागरे, रेखा रणमळे, मनीषा वैद्य, संतोष घोडके, विनोद गाडेकर,डॉ.मनाली उबाळे व्यंकटेश आहिरे, धीरज कराचीवाला, रुपेश पोरवाल, भाग्यश्री वालझाडे व इतर अनेक लायन्स-लिओ सदस्यांची उत्स्फूर्त उपस्थिती होती. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सरला तायडे यांनी तर आभार प्रदर्शन सोहन उबाळे यांनी केले. या बैठकीने सामाजिक कार्याच्या दिशेने एक सकारात्मक पाऊल टाकले असून, आगामी काळात विविध उपक्रम अधिक व्यापक आणि परिणामकारक स्वरूपात राबवले जातील, असा विश्वास व्यक्त करण्यात आला.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

चंदीगड स्टोअरमध्ये गोळ्यांचा पाऊस : कॅशियरची गोळ्या झाडून हत्या; 13 राऊंड गोळीबार, थंडगार सीसीटीव्ही...

चंदीगड: चंदीगडच्या सेक्टर 11 मधील एका मेडिकल स्टोअरमधील कॅशियरची शनिवारी दुपारी दोन मुखवटाधारी व्यक्तींनी दुकानात गोळीबार केल्याने त्याची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली.या हल्ल्यात...

घरामध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुम्ही “सन टेस्ट” केली आहे का?

भारतातील बहुतेक भागांमध्ये, पूर्वाभिमुख आणि उत्तराभिमुख घरे सामान्यतः सर्वात आरामदायक मानली जातात कारण त्यांना मऊ आणि अधिक संतुलित सूर्यप्रकाश मिळतो. पूर्वाभिमुख घरे सकाळचा आल्हाददायक...

पुण्यातील तांत्रिकाची आत्महत्या: सहकाऱ्याच्या आत्महत्येस प्रवृत्त करणाऱ्या तीन आरोपींसह आयटी फर्मच्या दोन महिला अधिकाऱ्यांचा...

AI-व्युत्पन्न केलेली प्रतिमा प्रातिनिधिक हेतूसाठी वापरली जाते. पुणे - भोसरी पोलिसांनी हिंजवडी येथील एका प्रख्यात आयटी कंपनीतील दोन महिला अधिकारी आणि 48 वर्षीय...

'कोणालाही हारलो, पण पाकिस्तानला नाही': जेमिमाह रॉड्रिग्स IND vs PAK महिला T20 विश्वचषक सलामीच्या...

जेमिमाह रॉड्रिग्ज (पीटीआय फोटो/शैलेंद्र भोजक) नवी दिल्ली: भारताची फलंदाज जेमिमाह रॉड्रिग्ज हिने रविवारी बर्मिंगहॅम येथे होणाऱ्या ICC महिला T20 विश्वचषक 2026 च्या उभय...

अमेरिकन सरकारने इंटेल, आयबीएम आणि इतर अमेरिकन कंपन्यांमध्ये भाग घेतल्याने बिल गेट्स खूश नाहीत;...

बिल गेट्स यांनी ट्रम्प प्रशासनाच्या खाजगी अमेरिकन कंपन्यांमधील इक्विटी स्टेक उचलण्याच्या वाढत्या सवयीबद्दल शांत परंतु निदर्शनास चिंतेचा झेंडा दाखवला आहे, असा इशारा...

error: Content is protected !!