Homeताज्या बातम्याश्री साई श्रद्धा ग्रामीण मुक-बधिर विद्यालयात शिर्डी व राहाता नवनिर्वाचित नगराध्यक्ष,उपनगराध्यक्ष आणि...

श्री साई श्रद्धा ग्रामीण मुक-बधिर विद्यालयात शिर्डी व राहाता नवनिर्वाचित नगराध्यक्ष,उपनगराध्यक्ष आणि नगरसेवकांचा सन्मान सोहळा संपन्न.—श्री माधवराव चौधरी ( संस्थापक )

Screenshot

श्री साई श्रद्धा ग्रामीण मुक-बधिर विद्यालयात शिर्डी व राहाता नवनिर्वाचित नगराध्यक्ष,उपनगराध्यक्ष आणि नगरसेवकांचा सन्मान सोहळा संपन्न.
महाराष्ट्र राज्याचे जलसंधारण मंत्री व अहिल्यानगरचे पालकमंत्री ना.राधाकृष्ण विखे पाटील तसेच युवानेते पद्मश्री डॉ.विठ्ठलराव विखे पाटील सह.साखर कारखान्याचे चेअरमन मा.खा.डॉ. सुजयदादा विखे पाटील, यांच्या मार्गदर्शनातून श्री साई अपंग विकास महिला मंडळ संचलित श्री साई-श्रद्धा ग्रामीण मुक-बधिर विद्यालय(निवासी)शिर्डी ता.राहाता जि.अहिल्यानगर येथे विद्यालय संस्थापक तथा नांदुर्खी बु.चे लोकनियुक्त सरपंच श्री माधवराव चौधरी सर यांच्या संकल्पनेतून शिर्डी व राहाता नगरपरिषदेचे नवनिर्वाचित नगराध्यक्ष,उपनगराध्यक्ष व नगरसेवकांचा सन्मान व सत्कार सोहळा शनिवार दि.१४ फेब्रुवारी२०२६ रोजी सायं.४.०० वा पार पडला.
नगर परिषद सार्वत्रिक निवडणूक २०२५-२६ मध्ये प्रचंड मतांनी निवडून आलेल्या माननीय नगराध्यक्ष,उपनगराध्यक्ष व नगरसेवक शहराचे प्रतिनिधी म्हणून काम करत आहे.शहरातील विविध विकास कामांचे ध्येय त्यांचेकडे आहेत.त्यांच्या भावी कार्यास शुभेच्छा देणे हि आपली एक सामाजिक बांधिलकी आहे त्यामुळे या सुंदर समारंभाचे आयोजन श्री माधवराव चौधरी सर यांनी केले.
या कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थान राहाता कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती मा.ज्ञानेश्वर (आबा) गोंदकर पाटील यांनी भूषविले.तर प्रमुख पाहुणे म्हणून कमलाकर कोते उपस्थित होते.तसेच विद्यालयातील मुकबधिर विद्यार्थ्यांसह शिर्डी ग्रामस्थ, नांदुर्खी बु.चे ग्रामस्थ,परिसरातील गावांतील सरपंच,राहाता शहरातील ग्रामस्थ आदी बहुसंखेने उपस्थित होते.

राहाता शहर,नगराध्यक्ष,उप नगराध्यक्ष व सर्व नगरसेवक मूक बधीर विद्यालयाच्या मदत व सहकार्यासाठी मागे राहणार नाही व
“हा सन्मान बहुप्रतिक्षित असून आजपर्यंतचा आमचा सर्वात मोठा सत्कार असल्याचे प्रतिपादन राहाता नगरपरिषदेचे नवनिर्वाचित नगराध्यक्ष डॉ.स्वाधीन गाडेकर यांनी केले.”

“पिंपळवाडी रोड ते शाळा रस्त्याचे काम असो किंवा ड्रेनेज,पिण्याचे पाणी यांसारख्या मुलभूत सुविधा नगरपरिषदेच्या माध्यमातून या मुक-बधिर विद्यार्थ्यांसाठी आम्ही केलेल्या आहे.यापुढेही कोणतीही मदत लागल्यास त्याची पूर्तता करणार असल्याचे प्रतिपादन शिर्डी नगरपरिषदेचे नवनिर्वाचीत उपनगराध्यक्ष मा.अभय (भैय्या) शेळके पाटील यांनी केले”.

“विद्यालय स्थापनेपासून माधवराव चौधरी सर,मुकबधिर विद्यालय व आमचे स्नेहपूर्ण ऋणानुबंध असून विद्यालयास यापूर्वीही आमचे सहकार्य राहिलेले आहे व यापुढेही राहणार असल्याचे अहिल्यानगर उत्तर शिवसेना जिल्हाध्यक्ष मा.कमलाकर कोते यांनी सांगितले.”

या अनोख्या कार्यक्रम प्रसंगी राहाता नगरपरिषदेचे उपनगराध्यक्ष डॉ.विजयराव सदाफळ,गटनेते नगरसेवक शफीक ( मुन्नाभाई )शहा,नगरसेवक प्रवीण सदाफळ,राहुल सदाफळ,अर्चना निकाळे,दशरथ तुपे,अनिता शेळके,अक्षय बोठे आदि उपस्थित होते.

तसेच शिर्डी नगरपरिषदेचे नगरसेवक निलेश कोते,सुनिता गोंदकर,बापू ठाकरे,आशाताई कोते,नितीन उत्तमराव कोते,नितीन पाराजी कोते,सरिता सोनवणे,अमित शेळके,छाया शिंदे,अलका गोतीस,दीपक गोंदकर,वैशाली कोते,छाया पोपट शिंदे,प्रतिक्षा कोते,धनराज कोते,अब्रार शेख आदी उपस्थित होते.

या सत्कार सोहळ्यानिमित्त रांजणगावच्या सरपंच सुनिताताई कासार, नांदुर्खी खु.च्या सरपंच आशाताई आरणे,कनकुरीच्या सरपंच संगीताताई गोतरीक्ष,पिंपळवाडीचे सरपंच विक्रम तुरकणे,साकुरीच्या सरपंच मेघनाताई दंडवते,दहेगावच्या सरपंच पूनमताई डांगे ,कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक मा.ज्ञानदेवराव चौधरी,साई अपंग विकास महिला मंडळाच्या सरचिटणीस सौ.वैशालीताई चौधरी,उपाध्यक्ष बापूराव दाभाडे,पत्रकार राजुभाई पठाण,दत्तात्रय वहाडणे,दादासाहेब चौधरी,नामदेव चौधरी, संदीप दंडवते,वसंत गोंदकर,वीरेश चौधरी,राजेंद्र चौधरी,कचेश्वर चौधरी,विलास वाकचौरे,प्रल्हाद चौधरी,संजय चौधरी,वसंत काळे,विक्रम दाभाडे संदीप चौधरी,सोमनाथ चौधरी,दीपक चौधरी,अवधूत काळे,विलास वाकचौरे,रामदास चौधरी सर, सुरशे सर,राजेंद्र गोंदकर,विलास औताडे,सुदाम गोंदकर,अशोक गोर्डे, यांसह राहाता,शिर्डी व नांदुर्खी बु.चे ग्रामस्थ बहुसंखेने आन्य मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सुत्रसंचलन श्री सोळसे बी.बी यांनी केले तर आभार विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री कासार बी.आर यांनी मानले कार्यक्रम यशस्वीतेसाठी विद्यालय वस्तीग्रह सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.कार्यक्रमाच्या समारोप प्रसंगी मुकबधिर विद्यार्थ्यांसह आलेल्या मान्यवरांना स्वादिष्ट भोजनाचे आयोजन करण्यात आले होते.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

आजची यहुदी म्हण: “जो तुम्हाला त्याचे सर्व त्रास सांगतो त्याच्यावर कधीही विश्वास ठेवू नका...

दिवसाची ज्यू म्हण (Google Gemini द्वारे व्युत्पन्न केलेली प्रतिमा) बहुतेक लोकांना असे कोणीतरी भेटले आहे.संभाषण सामान्यपणे सुरू होते. काही मिनिटांत, ते समस्यांकडे वळते:...

दिपके यांच्या 5-सूत्री घोषणापत्रात पेपर लीक, रद्द झालेल्या परीक्षा आणि निकाल विलंबाची भरपाई मागितली...

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात (SPPU) झुरळांचा जनता पक्षाचा (CJP) गुरुवारी निषेध. CJP चे संस्थापक अभिजित दिपके (निळ्या रंगात) आणि शिक्षण सुधारक सोनम वांगचुक...

इतिहास घडवला! बांगलादेशने ऑस्ट्रेलियावर पहिली वनडे मालिका जिंकली

बांगलादेशचा मुस्तफिझूर रहमान, केंद्र, संघसहकाऱ्यांसोबत साजरा करत आहे (एपी फोटो) बांगलादेशने गुरुवारी ऑस्ट्रेलियावर पहिला वनडे मालिका जिंकून इतिहास रचला, दुसऱ्या सामन्यात पाच गडी...

ब्रिटिश भारतीय टोरी पीअर रामी रेंजर यांनी यूकेचे पीएम स्टारर यांना सीबीई रद्द केल्याबद्दल...

ब्रिटनचे पंतप्रधान कीर स्टारमर (एपी) लंडन: ब्रिटिश भारतीय टोरी पीअर लॉर्ड रेंजर यांनी त्यांची CBE (कमांडर ऑफ द ऑर्डर ऑफ द ब्रिटिश एम्पायर)...

*_नेपाळमध्ये शिर्डीच्या विद्यार्थ्यांची सुवर्ण कामगिरी; एव्हरेस्ट इंटरनॅशनल कराटे स्पर्धेत ५ पदकांची कमाई._*

*_नेपाळमध्ये शिर्डीच्या विद्यार्थ्यांची सुवर्ण कामगिरी; एव्हरेस्ट इंटरनॅशनल कराटे स्पर्धेत ५ पदकांची कमाई._* *नेपाळ येथे आयोजित करण्यात आलेल्या १२ व्या एव्हरेस्ट इंटरनॅशनल कराटे चॅम्पियनशिपमध्ये शिर्डी येथील...

error: Content is protected !!