Homeताज्या बातम्याशिवभक्‍ती मध्‍ये दृढ विश्‍वास आणि समर्पण भावना असेल तर, सुखाची झोळी भरण्‍यातील...

शिवभक्‍ती मध्‍ये दृढ विश्‍वास आणि समर्पण भावना असेल तर, सुखाची झोळी भरण्‍यातील सर्व अडथळे आपोआप दुर होतील.—-पंडीत प्रदीपकुमार मिश्रा

राहाता, दि. १२ प्रतिनिधी

शिवभक्‍ती मध्‍ये दृढ विश्‍वास आणि समर्पण भावना असेल तर, सुखाची झोळी भरण्‍यातील सर्व अडथळे आपोआप दुर होतील. शिवपुराण कथेतून जेवढा भक्‍तीचा रसभाव तुम्‍ही ग्रहन कराल तेवढी तुमची भक्‍ती तुम्‍हाला शिवापर्यंत घेवून जाईल असा संदेश पंडित प्रदिप कुमार मिश्रा यांनी शिवपुराण कथेच्‍या पहिल्‍याच दिवशी लाखो भाविकांना दिला.
अस्‍तगाव येथे भक्‍तीमय वातावरणात चार दिवसांच्‍या शिवपुराण कथेचा प्रारंभ लाखो भाविकांच्‍या उपस्थितीत हर हर महादेवाचा जयघोष करीत करण्‍यात आला. मंत्री राधाकृष्‍ण विखे पाटील आणि सौ.शालिनीताई विखे पाटील यांच्‍या शुभहस्‍ते शि‍वपुजन करुन, शिवपुराण कथेचा प्रारंभ करण्‍यात आला. पहिल्‍याच दिवशी भाविकांच्‍या उपस्थिती ने गर्दीचा उच्‍चांक मोडल्‍याचे दिसून आले. कथेच्‍या निमित्‍ताने डॉ.सुजय विखे पाटील यांच्‍या नेतृत्‍वाखाली सुयोग्‍य नियोजन झाल्‍यामुळे गर्दी असूनही भाविकांना कथेचा आस्‍वाद घेता आला. माजी मंत्री आण्‍णासाहेब म्‍हस्‍के पाटील, आ.विठ्ठलराव लंघे, आ.अमोल खताळ आदि मान्‍यवर याप्रसंगी उपस्थित होते.
पंडित प्रदिप मिश्रा यांनी साईबाबांच्‍या भूमिचा उल्‍लेख करुन, शिवपुराण कथा या भागामध्‍ये होणे या पाठीमागे सुध्‍दा एक मोठी पुण्‍याई आहे. शिवपुराण कथा ऐकण्‍यासाठी सुध्‍दा मनामध्‍ये भाव असावा लागतो. आणि कथेचे आयोजन करण्‍याचा भाव मनामध्‍ये येणे यामध्‍ये सुध्‍दा शिवाची आराधनाच दडलेली आहे. विखे पाटील परिवाराला मिळालेली पुण्‍याई पाहाता कथेचे आयोजन करणे त्‍यांच्‍या मनामध्‍ये येणे यामध्‍ये शिवभक्‍तीमध्‍ये असलेला भाव आणि दृढ विश्‍वास याचे द्योतक असल्‍याचे त्‍यांनी आवर्जुन सांगितले शिव आराधने मध्‍ये दया, करुणा असणे महत्‍वाचे आहे. शिवाच्‍या मंदिरात जावून आराधने मध्‍ये सातत्‍य राखणा-या भाविकांना आलेल्‍या अनुभवरुपी पत्रांचे प्रदिप मिश्रा यांनी वाचन करुन, कोणत्‍याही भक्‍तीमध्‍ये निर्मलभाव असावा लागतो. त्‍यातूनच भक्‍तीरुपी आनंद आत्मसाद करता येतो. महादेवाच्‍या पिंडीवर होणा-या अभिषेकाचे जल प्राषण करुन, जगणा-या पाण्‍यामधील मधील माशाचे उदाहरण देवून पंडित मिश्रा महाराज म्‍हणाले की, महादेवाच्‍या पिंडीत होणारा जलाभिषेक हा प्रत्‍येक प्रश्‍नाचे उत्‍तर ठरतो असे त्‍यांनी भाविकांना सांगितले.
याप्रसंगी सर्वांचे स्‍वागत करताना मंत्री ना.राधाकृष्‍ण विखे पाटील म्‍हणाले की, पंडित प्रदिपकुमार मिश्रा यांच्‍या शिवपुराण कथेचे आयोजन करण्‍याची मिळालेली संधी ही पुर्वाश्रमीची पुण्‍याईच आहे. सनातन संस्‍कृतीला साजेसा असा शिवपुराण सोहळा आजपासून सुरु होत आहे. सर्व भाविकांच्‍या पाठबळाने हा अध्‍यात्मिक सोहळा ऐतिहासिक ठरेल असा विश्‍वास त्‍यांनी व्‍यक्‍त केला.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

'शिस्तीने सर्व काही बदलले': जसपाल राणाचे सर्वात मोठे योगदान मनू भाकरच्या वडिलांनी आठवले

फाइल फोटोः जसपाल राणा आणि मनू भाकर (पीटीआय फोटो) नवी दिल्ली: दिग्गज नेमबाज आणि प्रशिक्षक जसपाल राणा यांच्या अकाली निधनाने शोकग्रस्त, दुहेरी ऑलिम्पिक...

थॉमस मेर्टन कोट: थॉमस मेर्टनचे दिवसाचे कोट: “कला आपल्याला एकाच वेळी स्वतःला शोधण्यास आणि...

कला एक गहन अनुभव देते, जे एकाच वेळी आपला आत्म-जागरूक आंतरिक आवाज शांत करताना आपल्याला स्वतःचे लपलेले पैलू शोधू देते. सर्जनशील प्रयत्नांमध्ये किंवा...

३ वर्षाच्या चिमुरडीने चार जणांना जीवदान दिले, पुणे विभागातील सर्वात तरुण बाल अवयव दाता...

शहरातील घराच्या दुसऱ्या मजल्यावरून अपघाती पडल्याने तीन वर्षांचा मुलगा गंभीर जखमी झाला. पुणे : 12 जून रोजी ब्रेन डेड घोषित केलेला तीन वर्षांचा...

फिफा विश्वचषक 2026: सर्वाधिक चोरीला गेलेला गियर जप्त झाल्यामुळे इंग्लंडमधील उपकरणे चोरीप्रकरणी दोघांवर आरोप

कॅन्सस सिटीमध्ये फिफा विश्वचषकासाठी इंग्लिश राष्ट्रीय संघाचे सदस्य सराव करत आहेत. (एपी फोटो) युनायटेड स्टेट्समधील संघाच्या मोहिमेपूर्वी अधिकाऱ्यांनी बहुतेक हरवलेल्या वस्तू परत मिळवून,...

मॅक्रॉन चर्चा, ट्रम्प बैठक, G7 शिखर परिषद आणि तंत्रज्ञान संबंध: पंतप्रधान मोदींच्या युरोप अजेंडावर...

पंतप्रधान नरेंद्र मोदी नवी दिल्ली: फ्रान्स आणि स्लोव्हाकियाच्या भेटी आणि त्यानंतर G7 शिखर परिषदेत सहभाग असलेल्या व्यस्त युरोप दौऱ्याची सुरुवात करून पंतप्रधान नरेंद्र...

error: Content is protected !!