*शारदा शैक्षणिक संकुलाचे वार्षिक स्नेहसंमेलन मोठ्या उत्साहात संपन्न* :-
( राहाता- प्रतिनिधी) रयत शिक्षण संस्थेच्या शारदा शैक्षणिक संकुल राहाता या ठिकाणी शारदा कन्या, शारदा विद्या मंदिर मुले, ज्युनिअर कॉलेज विभागाचा वार्षिक स्नेहसंमेलनाचा कार्यक्रम संपन्न झाला. विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास व्हावा, सुप्त कलागुणांना वाव मिळावा, विविध कार्यक्रमांतून उद्याचे कलाकार घडावेत ,या उद्देशाने हा कार्यक्रम घेण्यात आला .या कार्यक्रमा प्रसंगी प्रमुख पाहुणे संकुलाचे मार्गदर्शक रमेश शिंदे होते होते. त्यांनी विद्यार्थ्यांना शुभेच्छा देताना आपल्या शालेय जीवनातील आठवणींतून प्रेरणा घेऊन उद्याचे कलाकार व्हावेत आपण प्रयत्नशील असावे त्याच्यातून यश येते असे सांगितले .

कार्यक्रमाचे अध्यक्ष संकुलाचे स्थानिक स्कूल कमिटीचे ज्येष्ठ सदस्य डॉ.पी.जी गुंजाळ होते. त्यांनी विद्यार्थ्यांना कार्यक्रमासाठी शुभेच्छा दिल्या.
प्राचार्य अनिल बनसोडे यांनी कार्यक्रमाच्या प्रास्ताविकातून विद्यार्थ्यांना स्नेहसंमेलनाचा उद्देश सांगितला व शुभेच्छा दिल्या . या कार्यक्रमात कोळीगीते, नाटिका, पारंपारिक लावणी ,गणेश वंदना ,भक्ती गीते, देशभक्तीपर गीतांचा समावेश होता .विद्यार्थ्यांनी अतिशय दर्जेदार कार्यक्रम घडवून आणला. विद्यार्थ्यांमध्ये अतिशय आनंदाचे वातावरण होते. याप्रसंगी कन्या विद्यालयाच्या मुख्याध्यापिका हेमलता गुंजाळ ,इंग्लिश मीडियमच्या प्राचार्या निशा चेंगोट, पर्यवेक्षक देशमुख, सौ. शीला संसारे ,उपप्राचार्य अशोक बोरसे, सांस्कृतिक विभाग प्रमुख प्रा. बाळासाहेब दिघे, सोनाली थोरात ,अर्चना थोरात,प्रा. शरद गमे, प्रा. रंणजीत पाटील, प्रा.मोसिन शेख, असिर पठाण,राजकुमार साळवे,संजय खंदारे आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाला ग्रामस्थ, पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. पालकांनी विद्यार्थ्यांचे कौतुक केले.k




















