शारदा कन्या विद्यामंदिर राहता येथे बाल आनंद मेळावा उत्साहात संपन्न कन्या विद्यालयाच्या विद्यार्थिनींनी घेतला खरेदी विक्रीचा आनंद खरी कमाई अंतर्गत बाल आनंद बाजार घेण्यात आला असून सहभागी गर्ल गाईड तसेच 5वी ते 10अखेर बऱ्याच विद्यार्थीनी सहभाग घेतला . विद्यालयात जवळपास 150 वेगवेगळ्या प्रकारचे स्टॉल लावण्यात आले होते त्यामध्ये मुलींनी भाजीपाला खाण्याचे वेगवेगळे पदार्थ फनी गेम्स तयार केले होते व त्यातून मुलींनी खरेदी विक्री व्यवहार कसा करावा हे लक्षात घेतले विद्यार्थिनींना श्रमाचे महत्व, व्यवहारिक कौशल्य, नफा, तोटा ,जबाबदारी याची जाणीव करून देण्यात आली उद्घाटन प्रसंगी संकुलाचे मार्गदर्शक मा . श्री रमेश भाऊ शिंदे पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.
विद्यालयाच्या मुख्याध्यापिका सौ. गुंजाळ मॅडम, निशा चेंगोट मॅडम सर्व शिक्षक ,शिक्षिका आणि विद्यार्थिनी शारदा ज्युनिअर कॉलेज सर्व प्राध्यापक तसेच एज्यु टॉप चे सर्व शिक्षक शिक्षिका कार्यक्रमासाठी उपस्थित होते तसेच विद्यार्थिनींचे पालक देखील आनंद बाजार साठी सहभागी झाले होते कार्यक्रमाचे नियोजन श्रीमती अर्चना थोरात निलोफर पठाण श्रीमती वर्षा जगधने यांनी केले




















