शारदा कन्या विद्यामंदिर राहता येथील मुलींनी घेतला वनभोजन सहलीचा आनंद
तालुका राहता येथील शारदा कन्या विद्या मंदिर ची शैक्षणिक वनभोजन सहल यावर्षी दहेगाव देवी या ठिकाणी आयोजित केले होते वनभोजनामध्ये विद्यार्थ्यांना विविध प्रकारचे मार्गदर्शन सहलीचे उद्देश उद्दिष्टे त्याचबरोबर दहेगाव गावचे माहिती गावातील सामाजिक कार्यकर्ते श्री भगवानराव डांगे पाटील त्याचबरोबर त्यांचे बंधू रिटायर्ड डी वाय एस पी डांगे साहेब यांनी देखील विद्यार्थिनींना मार्गदर्शन केले त्याचबरोबर गावांमधील वेगवेगळ्या वृक्षांची लागवड करून वृक्षांचे महत्त्व मुलींना सांगितले अभ्यासाबरोबरच बाहेर ज्ञान किती महत्त्वाचे असते हे त्यांना या सहलीच्या निमित्ताने सांगितले त्याचबरोबर श्रीराम पार्क येथे गर्ल गाईडच्या मुलींनी आपले टेन्ट टाकून त्या ठिकाणी चुलीवरचा स्वयंपाक बनवून वेगवेगळ्या प्रकारच्या पाककृती बनवल्या. या विद्यार्थिनींना मार्गदर्शन श्रीमती थोरात पठाण एन एम पावरा मॅडम यांनी केले या सहलीमध्ये विद्यालयातील कलावंत मुलींनी गायन नक्कल विनोद अशा विविध प्रकारचा सांस्कृतिक कार्यक्रम पार पाडला व या सहलीत विद्यार्थिनींनी चांगला प्रकारे आनंद घेतला.
त्याचबरोबर दहेगाव गावातील शारदा विद्या मंदिर चा विद्यार्थी भारत भरवड याची पोलीस कॉन्स्टेबल पदी नियुक्ती झाल्याबद्दल गावातील सामाजिक कार्यकर्ते यांनी स्वागत केले त्याचबरोबर सदर कार्यक्रमासाठी डांगे परिवाराने आपल्या घरी घरासमोरील परिसर मुलींना जेवणासाठी उपलब्ध करून दिला त्याचबरोबर मुलींना अल्पपोहाराची व्यवस्था करून दिली तसेच या कार्यक्रमासाठी शारदा शैक्षणिक संकुलाचे मार्गदर्शक रमेश भाऊ शिंदे पाटील यांनी देखील सर्व ग्रामस्थांचे मान्यवरांचे स्वागत केले . यावेळी विद्यालयाच्या मुख्याध्यापिका सौ हेमलता गुंजाळ मॅडम तसेच शैक्षणिक सहल प्रमुख श्री किशोर लोहारकर सर श्री पर्वत उरे सर श्री किशोर जाधव उपस्थित होते या कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्री साळवे सर सूत्रसंचालन श्री जाधव सर तसेच आभार प्रदर्शन श्री राठोड एस के सर यांनी केले.




















