शांतता भंग करणाऱ्यांवर कारवाई करा
राहाता मुस्लिम समाजाचे पोलिसांना निवेदन
राहाता : अहिल्यानगर शहरात गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या धार्मिक वादाचे तीव्र पडसाद जिल्ह्यात उमटले असून, राहाता येथील मुस्लिम समाजाने एकत्र येत मुस्लिम समाजाच्या भावना एका कार्यक्रमात जमिनीवर प्रेषित पैगंबर मुहम्मद यांचे नाव रोंगोळीत काढून जाणीवपूर्वक दुखावण्याचा प्रयत्न करणाऱ्या आणि शांतता भंग करणाऱ्यांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी राहाता पोलीस ठाण्यात निवेदन देऊन केली.राहाता पोलीस ठाण्यात जमीयत उलेमा-ए-हिंद, राहाता तालुका संघटनेने निवेदन दिले आहे. निवेदनात म्हटले आहे, प्रेषित पैगंबर मुहम्मद हे मुस्लिम समाजासाठी अत्यंत पवित्र व आदरणीय आहेत. अशा कृत्यांमुळे केवळ धार्मिक भावना दुखावत नाहीत, तर समाजात द्वेष व तणाव निर्माण होतो. आरोपींवर धार्मिक भावना दुखावण्याच्या कलमांतर्गत कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी आली. यावेळी संघटनेचे तालुकाध्यक्ष हाफिज वसीम शेख, उपाध्यक्ष जावेद पठाण व हाजी मुन्नाभाई शहा, जनरल सेक्रेटरी समीर शेख, सेक्रेटरी आर्क. असद पटेल, तसेच जीशान शेख, पत्रकार राजूभाई पठाण, सामाजिक कार्यकर्ते इलियास शहा, जमील शहा, पत्रकार मुश्ताक शाह उपस्थित होते. राहाता पोलीस स्टेशनच्या पोलीस उपनिरीक्षक संगीता गिरी यांनी निवेदन स्वीकारले.




















