
मेकॅनिकल विभागाचे शरद शिरोळे ‘आदर्श कर्मचारी पुरस्काराने’ सन्मानित
मेकॅनिकल विभागातील शरद शिरोळे यांना ‘आदर्श कर्मचारी पुरस्कार’ प्रदान करून सन्मानित करण्यात आले. मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाङीलकर यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.
शिरोळे यांनी मेकॅनिकल विभागामार्फत विविध सेवा उत्कृष्टपणे राबवत आपल्या कार्याचा ठसा उमटवला आहे. त्यांच्या उल्लेखनीय कामगिरीमुळे यापूर्वीही त्यांना अनेक पुरस्कारांनी गौरविण्यात आले आहे.
कर्मचाऱ्यांशी असलेला त्यांचा मनमिळावू स्वभाव, कार्यतत्परता आणि जबाबदारीची जाणीव यामुळेच त्यांची या पुरस्कारासाठी निवड करण्यात आली. त्यांच्या या यशाबद्दल सर्व स्तरांतून अभिनंदन होत असून, त्यांच्या भावी वाटचालीस शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. यावेळी प्रशासकीय अधिकारी व मेकॅनिकल विभागाचे प्रमुख अतुल वाघ व प्रशासकीय अधिकारी व मोठ्या संख्येने कर्मचारी वर्ग उपस्थित होता


















