*राहाता तालुका विज्ञान प्रदर्शनात पाथरे विद्यालयाचे घवघवीत यश*
नुकत्याच पार पडलेल्या राहाता तालुका गणित विज्ञान व कला प्रदर्शन-2025 श्री यशवंतराव चव्हाण विद्यालय राजुरी तालुका राहाता जिल्हा अहिल्यानगर येथे संपन्न झाले.
यामध्ये उद्घाटन समारंभात विद्यालयाचे प्राचार्य माननीय श्री. बारगुजे सर यांचा राहता तालुका कृतिशील मुख्याध्यापक पुरस्कार देऊन मुख्य कार्यकारी अधिकारी डॉक्टर सुष्मिता विखे पाटील यांनी सत्कार केला श्री. छत्रपती शिवाजी विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय पाथरे बुद्रुक तालुका राहाता जिल्हा अहिल्यानगर विद्यालयातील इयत्ता पहिली ते पाचवी मध्ये कुमारी समृद्धी महाले हिच्या मॅप कॅल्क्युलेशन ग्राफ या उपकरणास उत्तेजनार्थ स्मृतीचिन्ह व प्रमाणपत्र तसेच इयत्ता नववी ते बारावी मध्ये चिरंजीव कृष्णा उमाकांत कडू यास नदीजोड प्रकल्प साठी उत्तेजनार्थ स्मृतीचिन्ह व प्रमाणपत्र तर विज्ञान परिचार गटातून श्री नवनाथ मोरे यांना माजी प्रयोगशाळा या उपकरणास द्वितीय क्रमांक तर शिक्षक गटामध्ये विद्यालयाच्या विज्ञान शिक्षिका सौ.अनिता नळे यांना बायटेनियस या उपकरणास द्वितीय क्रमांक स्मृतिचिन्ह व प्रमाणपत्र तसेच विद्यालयातील कला शिक्षक श्री राधाकृष्ण को-हाळे यांना कला विभागात तृतीय क्रमांकाचे स्मृतिचिन्ह व प्रमाणपत्र कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी माजी मंत्री माननीय अण्णासाहेब म्हस्के पाटील यांच्या शुभहस्ते प्रदान करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी स्थानिक स्कूल कमिटीचे अध्यक्ष मारुती गोविंद गोरे पाटील होते

यावेळी गटशिक्षणाधिकारी राजेश पावसे साहेब,विस्तार अधिकारी श्री विष्णू कांबळे साहेब, केंद्रप्रमुख श्री कानिफनाथ कोळेकर, विद्यालयाच्या प्राचार्य सातपुते मॅडम,प्राचार्य बारगजे सर मुख्याध्यापक श्री संजय उंबरकर,प्रवरा कलाध्यापक संघाचे अध्यक्ष राजेंद्र तुपे राहाता तालुका गणित विज्ञान कला संघटनेचे अध्यक्ष डॉ. संदीप म्हस्के सर एडवोकेट गोरे यांचे सह पालक,शिक्षक -शिक्षिका,विद्यार्थी -विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
पुरस्कार प्राप्त विद्यार्थ्यांचे स्थानिक स्कूल कमिटीचे उपाध्यक्ष माननीय आबासाहेब पाटील घोलप सरपंच उमेश पाटील घोलप उपसभापती माननीय अण्णासाहेब पाटील कडू यांच्यासह ग्रामस्थांनी अभिनंदन केले आहे.




















