*मुक बधिर विद्यालयात आषाढी एकादशी निमित्त दिंडी सोहळा संपन्न*
श्री साई श्रद्धा ग्रामीण मुक बधिर विद्यालय (निवासी) शिर्डी ता. राहाता जि.अहिल्यानगर येथे रविवार दि.6 जुलै 2025 रोजी आषाढी एकादशी निमित्त दिंडी सोहळ्याचेआयोजन विद्यालय संस्थापक व नांदूर्खी बु.चे लोकनियुक्त सरपंच माधवराव चौधरी सर यांच्या व संस्था सरचिटणीस वैशालीताई चौधरी यांच्या उपस्थितीत विठ्ठल रुक्मिणीचे पूजन करून दिंडी सोहळ्याचे शुभारंभ करण्यात आला. आषाढी एकादशीनिमित्त दिंडी सोहळ्यात विद्यालय वस्तीगृहातील कर्मचारी वृंद व विद्यार्थ्यांनी उत्साहात सहभाग घेऊन दिंडी सोहळ्याची शोभा वाढवली. शिर्डीत दिंडी जात असताना अनेक भाविकांनी विद्यालयाच्या पालखीचे व पांडुरंगाचे दर्शनाचा लाभ घेतला. प्रसंगी मुख्याध्यापक सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.




















