Homeताज्या बातम्याभारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे केवळ एका समाजाचे नेते नव्हते तर ते...

भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे केवळ एका समाजाचे नेते नव्हते तर ते संपूर्ण मानवतेचे उद्धारकर्ते होते—डॉ श्री स्वाधीन गाडेकर ( नगराध्यक्ष )

राहाता प्रतिनिधी
भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे केवळ एका समाजाचे नेते नव्हते तर ते संपूर्ण मानवतेचे उद्धारकर्ते होते समता बंधुत्व व न्याय या तत्त्वांनी त्यांनी समाज व मानवतेची विशेष जडणघडण केली आहे आपल्या लेखणीव्दारे संविधानाच्या माध्यमातून आपल्या देशाचे उज्वल भविष्य त्यांनी कोरले आहे संविधान पवित्र ग्रंथ आहे यावरच देशाची प्रगतीपथावरची व संवैधानिक वाटचाल सुरू आहे असे प्रतिपादन राहाता नगरपरिषदेचे नगराध्यक्ष डॉ स्वाधीन गाडेकर यांनी केले आहे

भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची आज १३५ वी जयंती निमित्ताने राहाता नगरपरिषदेत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे नगराध्यक्ष डॉक्टर स्वाधीन गाडेकर व नगरसेवकांच्या हस्ते पूजन करून डॉ बाबासाहेबा आंबेडकरांना वंदन व अभिवादन करण्यात आले यावेळी डॉ बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करताना नगराध्यक्ष डॉ. स्वाधीन गाडेकर म्हणाले की
ज्या महामानवाने आपल्या लेखणीने या देशाचे भविष्य कोरले, ज्यांनी कोटीवधी पददलितांना सन्मानाने जगण्याचे बळ दिले ते विश्वरत्न, बोधिसत्व,
डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे केवळ एका समाजाचे नेते नव्हते, तर ते संपूर्ण मानवतेचे उद्धारकर्ते होते. त्यांच्या आयुष्याचा प्रत्येक क्षण हा ‘संघर्ष’ आणि ‘समर्पण’ याचे मूर्तिमंत उदाहरण आहे.अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत त्यांनी परदेशात जाऊन उच्च शिक्षण घेतले आणि आपल्या ज्ञानाचा उपयोग स्वतःसाठी न करता, या देशातील दीन-दलितांच्या, महिलांच्या आणि कामगारांच्या हक्कासाठी केला. “शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे आणि जो तो प्राशन करेल तो गुरगुरल्या शिवाय राहणार नाही.” आणि म्हणून आपल्या मुलांच्या दर्जेदार शिक्षणावर भर देणे हेच त्यांना खरे अभिवादन ठरेल. आजचा हा दिवस केवळ उत्सव साजरा करण्याचा नाही, तर त्यांनी दिलेल्या “शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा” या महामंत्राचे आत्मचिंतन करण्याचा आहे. आणि तो प्रत्यक्षात कृतीत आणण्याचा आहे संविधानाच्या माध्यमातून त्यांनी आपल्याला समता आणि बंधुभावाचा मंत्र दिला. आपल्या शहरात जाती-पातीचे भेद विसरून आपण सर्वजण गुण्यागोविंदाने राहिलो, तरच खऱ्या अर्थाने त्यांचे स्वप्न पूर्ण होईल. बाबासाहेबांनी जलनीती, कामगार कायदे आणि लोकशाही मूल्यांची पायाभरणी केली. त्यांच्या याच विचारांचा वारसा घेऊन आपल्या नगरपालिकेचा कारभार स्वच्छ पारदर्शक आणि लोकाभिमुख ठेवण्याचा आपण सर्व मिळून प्रामाणिक प्रयत्न करणार आहोत.
यावेळी उपनगराध्यक्ष डॉ विजय सदाफळ, नगरसेवक गटनेते मुन्ना शहा, नगरसेवक प्रवीण सदाफळ, अजय आग्रे, राहुल सदाफळ, पुष्पा आरणे, माजी नगरसेवक भीमराज निकाळे, दशरथ तुपे, संदीप मुर्तडक, ॲड मयूर पाळंदे, नितीन गाडेकर, अक्षय बोठे, प्रवीण रुणवाल, विजय गिधाड, प्रभाकर आरणे, योगेश डांगे, सुयोग शेळके, प्रदीप बनकर, अरुण गाडेकर, कार्यालयीन अधीक्षक नानासाहेब टिक्कल आणि कर्मचारी उपस्थित होते.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

चंदीगड स्टोअरमध्ये गोळ्यांचा पाऊस : कॅशियरची गोळ्या झाडून हत्या; 13 राऊंड गोळीबार, थंडगार सीसीटीव्ही...

चंदीगड: चंदीगडच्या सेक्टर 11 मधील एका मेडिकल स्टोअरमधील कॅशियरची शनिवारी दुपारी दोन मुखवटाधारी व्यक्तींनी दुकानात गोळीबार केल्याने त्याची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली.या हल्ल्यात...

घरामध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुम्ही “सन टेस्ट” केली आहे का?

भारतातील बहुतेक भागांमध्ये, पूर्वाभिमुख आणि उत्तराभिमुख घरे सामान्यतः सर्वात आरामदायक मानली जातात कारण त्यांना मऊ आणि अधिक संतुलित सूर्यप्रकाश मिळतो. पूर्वाभिमुख घरे सकाळचा आल्हाददायक...

पुण्यातील तांत्रिकाची आत्महत्या: सहकाऱ्याच्या आत्महत्येस प्रवृत्त करणाऱ्या तीन आरोपींसह आयटी फर्मच्या दोन महिला अधिकाऱ्यांचा...

AI-व्युत्पन्न केलेली प्रतिमा प्रातिनिधिक हेतूसाठी वापरली जाते. पुणे - भोसरी पोलिसांनी हिंजवडी येथील एका प्रख्यात आयटी कंपनीतील दोन महिला अधिकारी आणि 48 वर्षीय...

'कोणालाही हारलो, पण पाकिस्तानला नाही': जेमिमाह रॉड्रिग्स IND vs PAK महिला T20 विश्वचषक सलामीच्या...

जेमिमाह रॉड्रिग्ज (पीटीआय फोटो/शैलेंद्र भोजक) नवी दिल्ली: भारताची फलंदाज जेमिमाह रॉड्रिग्ज हिने रविवारी बर्मिंगहॅम येथे होणाऱ्या ICC महिला T20 विश्वचषक 2026 च्या उभय...

अमेरिकन सरकारने इंटेल, आयबीएम आणि इतर अमेरिकन कंपन्यांमध्ये भाग घेतल्याने बिल गेट्स खूश नाहीत;...

बिल गेट्स यांनी ट्रम्प प्रशासनाच्या खाजगी अमेरिकन कंपन्यांमधील इक्विटी स्टेक उचलण्याच्या वाढत्या सवयीबद्दल शांत परंतु निदर्शनास चिंतेचा झेंडा दाखवला आहे, असा इशारा...

error: Content is protected !!