राहाता प्रतिनिधी )येथील पुष्कर आहेर या विद्यार्थ्यांची मुंबई येथे महाराष्ट्र रायफल असोसिएशन च्या वतीने घेण्यात आलेल्या राज्यस्तरीय स्पर्धेतून राष्ट्रीय पातळीवर निवड झाली. ही स्पर्धा मुंबई येथे आयोजित केली होती. मोठ्या प्रमाणावर स्पर्धकांनी सहभाग घेतला होता. रायफल शूटिंग स्पर्धेचे कौशल्य पुष्करने आत्मसात केल्यामुळे त्याला हे यश प्राप्त झाले. पुष्कर हा रयत शिक्षण संस्थेच्या महात्मा गांधी ज्युनिअर कॉलेजचा विद्यार्थी आहे व शारदा शैक्षणिक संकुल राहाता येथील प्रा. रमेश आहेर व सौ. माधुरी आहेर यांचा तो चिरंजीव आहे त्याच्या या यशाचे कौतुक रयत शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष अरुण कडू पाटील,रयत शिक्षण संस्थेचे जनरल बॉडी सदस्य रावसाहेब म्हस्के, एकनाथ घोगरे पाटील, शारदा संकुलाचे अध्यक्ष रमेश शिंदे, प्राचार्य ए.डी. बनसोडे, प्रा. शरद गमे, आदी शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांकडून त्याच्या या यशाचे कौतुक होत आहे




















