अंमळनेर : डॉ. बाबासाहेबआंबेडकर मागासवर्गीय मुलींचे वसतीगृह कारेगाव /नाळवंडी व जानपीर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय नाळवंडी / कारेगाव ता. पाटोदा जि. बीड यांच्या संयुक्त विद्यमाने गणवेश वितरणाचा व लोकमान्य टिळक यांच्या जयंतीचा कार्यक्रम दि.२३/०७/ २०२५ रोजी सकाळी १० वाजता आष्टी येथील पोलीस उपअधीक्षक आदरणीय श्री. बाळकृष्णजी हणपुडे पाटील व अंमळनेर पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री. भार्गव सपकाळ साहेब तसेच संस्थेचे सचिव श्री. पठाण जे.एल.साहेब (गुरुजी) यांच्या शुभ हस्ते संपन्न झाला.सर्वप्रथम कार्यक्रमाचे अध्यक्ष व प्रमुख अतिथी यांच्या शुभहस्ते विश्वरत्न भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर, विद्येची देवता सावित्रीबाई फुले तसेच बाळ गंगाधर टिळक यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. त्यानंतर संस्था सचिव साहेब श्री पठाण जे. एल (गुरुजी) यांच्या हस्ते मान्यवरांचे स्वागत करण्यात आले. विद्यालयातील व वसतिगृहातीलविद्यार्थिनींनी अध्यक्ष व प्रमुख पाहुणे यांचे स्वागत गीताच्या माध्यमातून स्वागत केले. कार्यक्रमाच्या प्रस्ताविक पर भाषणामध्ये संस्थेचे सचिव साहेब यांनी हे वसतिगृहआणि विद्यालय सुरू करण्यासाठी आमच्या आईची फार मोठी प्रेरणा होती त्यांच्या प्रेरणेतूनच आम्ही हे शिक्षण रुपी मंदिर उभे करूशकलो याबद्दल आपले विचार मांडले. यावेळी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत असताना उधडझ श्री हाणपुडे साहेब यांनी विद्यार्थ्यांना म
मार्गदर्शन करत असताना सांगितले की आपण आपले अगोदर ध्येय निश्चित करा आणि ते ध्येय साध्य करण्यासाठी कठोर मेहनत करा तरच आपणाला यश मिळेल. या जगामध्ये ज्ञानाचा प्रचंड मोठा सागर आहे त्या ज्ञानाचा जीवनामध्ये उपयोग करा असा मौलिक संदेश त्यांनी दिला. लोकमान्य टिळक यांनी देशाला स्वातंत्र्य मिळवण्यासाठी दिलेल्या योगदानाबद्दल विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत असताना आपणजिद्दीने अभ्यास केला पाहिजे तरच आपण जीवनाम ध्ये यशस्वी होऊ शकतो त्यासाठी कठोर मेहनत घेतली पाहिजे याबद्दल विद्यार्थ्यांना सखोल असे मार्गदर्शन केले त्यांच्या समवेत बीट अंमलदार श्री. सांगळे साहेब, श्री. भरत कोळेकर साहेब, श्री शाम खाडे साहेब कार्यक्रमासाठी उपस्थित होते.या कार्यक्रमासाठी विद्यालयाच्या मुख्याध्यापिका श्रीमती शेख के. एस. मॅडम व डॉ. बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय मुलींच्या वसतिग्रहाच्या अधिक्षिका श्रीमती उमा पाटील तसेच स्वयंपाकी डोके गिताताई व गावातील प्रतिष्ठित नारिक उपस्थित होते.या कार्यक्रमाची अध्यक्षीय सूचना विद्यालयाचे जेष्ठ शिक्षक श्री. शेख नसीर सर यांनी मांडली तर कार्यक्रमाचे सुंदर असे सूत्रसंचालन श्रीराम जाधव सर यांनी केले तर उपस्थितांचे आभार सुनील साबळे सर यांनी मानले या कार्यक्रमासाठी सर्व शिक्षक प्राध्यापक शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी यांच्या सहकार्य लाभले यामुळे हा कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न झाला.




















