राहता शहरातील एक आगळे वेगळे सामाजिक व धार्मिक कार्यात नेहमी अग्रेसर राहणारे कालिका प्रतिष्ठान च्या वतीने सालाबाद प्रमाणे शारदीय नवरात्र उत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. उत्सवात सकाळ व सायंकाळ महाआरती नंतर, दूध व खिचडी महाप्रसादाचे वाटप केले जाते. शहरातील अनेक भाविक यामध्ये योगदान देतात. अष्टमीला चंडीयाग महायज्ञ संपन्न होईल. यज्ञाचे पौरोहित्य श्री. अतुल गुरु लावर हे करणार आहेत. कालिका प्रतिष्ठानने आरोग्य तपासणी, वृक्षारोपण, योग विषयक जनजागृती, सर्पदंश व प्रथमोपचार जनजागृती, क्लासिकल संगीत क्लासेस, शाळा, कॉलेज मध्ये विविध वक्त्यांची व्याख्याने, विद्यार्थी स्पर्धा यांसारखे अनेक कार्यक्रम आजवर आयोजित करत धार्मिक कार्यासोबत विशेष असे सामाजिक कार्यक्रम शिर्डी परिसर व राहाता तालुक्यात केलेले आहेत. यावर्षी सामाजिक कार्यामध्ये शहरात शालास्तरीय विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी वक्तृत्व स्पर्धा, निबंध स्पर्धा आणि चित्रकला स्पर्धा घेतल्या जाणार आहेत. त्याचे प्रायोजक अमित मोटर्स चे श्री. अमितशेठ पीपाडा आहेत. अशी माहिती प्रतिष्ठानचे उपाध्यक्ष श्री. विजूनाना गाडेकर यांनी दिली. आज तिसऱ्या पुष्प मालेच्या सायंकाळच्या सेवेमध्ये माजी जिल्हा परिषद अध्यक्ष माननीय नामदार सौ. शालिनीताई विखे पाटील यांनी जगनमाता सत्यकालिकेचे दर्शन घेतले व शहरातील सर्व नवरात्र उत्सवाच्या शुभेच्छा दिल्या. आजची महाआरती श्री व सौ. दीपक शेठ गांधी, श्री व सौ. अमित शेठ पिपाडा, श्री.व सौ. राकेश खरारे यांच्या शुभ हस्ते संपन्न झाली. कालिका प्रतिष्ठान अध्यक्ष सौ. संगीताताई शिवरकर यांनी सांगितले की दररोज च्या महाप्रसादासाठी भक्त परिवारातील महिला सौ. नानी मेहत्रे, कृष्णाबाई जेजुरकर, कल्पना टिळेकर, सुनिता गाडेकर, प्रिया शिवरकर, वैशाली शिंदे, दिपाली आहेर, जयश्री जेजुरकर, पल्लवी जेजुरकर, प्रज्ञा ताम्हणे, वैशाली मेहेत्रे आदी सर्व महिला मेहनत घेतात. आरती व खिचडी प्रसाद नियोजनासाठी श्री विजय गाडेकर, राजेंद्र शिवरकर, नवनाथ मेहेत्रे, रविभाऊ शिवरकर, पप्पूभाऊ मोरे, सचिन मेहेत्रे, सागर गाडेकर, बबलू गाडेकर, प्रवीण कोल्हे, नवनाथ आहेर, सदानंद ताम्हणे, श्यामाभाऊ गाडेकर, संजय गाडेकर, विदेश बनकर, अक्षय भालेराव, व प्रसादभाऊ शिवरकर हे सर्वजण मेहनत घेतात. तालुक्यातून अनेक भाविक या ठिकाणी कालिका मातेच्या दर्शनासाठी येत आहेत. सर्व भाविकांनी नवरात्रोत्सवात या कार्यक्रमांचा लाभ घ्यावा विनंती अशी कालिका माता भक्त परिवाराकडून श्री राजेंद्र जेजुरकर यांनी केली व कार्यक्रमाची माहिती दिली.




















