Homeताज्या बातम्याकाँग्रेसचे मामा पगारे यांचा अमानुष अपमान लोकशाहीला काळिमा फासणारा – सौ. प्रभावती...

काँग्रेसचे मामा पगारे यांचा अमानुष अपमान लोकशाहीला काळिमा फासणारा – सौ. प्रभावती घोगरे

काँग्रेसचे मामा पगारे यांचा अमानुष अपमान लोकशाहीला काळिमा फासणारा – सौ. प्रभावती घोगरे

राहाता :
काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ कार्यकर्ते आणि सामाजिक न्यायासाठी आयुष्यभर झटणारे श्री.प्रकाश उर्फ मामा पगारे (वय ७५) यांच्यावर भाजप पदाधिकाऱ्यांकडून झालेल्या अमानुष व अपमानास्पद कृत्याचा काँग्रेस पक्षाने तीव्र निषेध नोंदविला आहे.

मंगळवारी रुग्णालयात जात असताना काही भाजप पदाधिकाऱ्यांनी पगारे यांना फसवून बोलावले. त्यानंतर भर रस्त्यात त्यांच्यावर दमदाटी करण्यात आली, त्यांना साडी परिधान केली. तसेच जातिवाचक वक्तव्ये करून त्यांच्या सन्मानावर गंभीर आघात करण्यात आला.

या घटनेवर प्रतिक्रिया देताना काँग्रेस नेत्या सौ. प्रभावती जनार्दन घोगरे म्हणाल्या –
“ही घटना फक्त एका व्यक्तीचा अपमान नाही, तर हा प्रहार आहे ज्येष्ठ नागरिकांच्या सन्मानावर, दलित समाजाच्या स्वाभिमानावर आणि काँग्रेस कार्यकर्त्यांच्या आत्मगौरवावर. महाराष्ट्राच्या राजकीय संस्कृतीवर काळिमा फासणारी ही गुंडगिरी लोकशाहीत कोणत्याही परिस्थितीत सहन केली जाणार नाही. ही घटना भारतीय संविधानाच्या मूलभूत मूल्यांनाही धक्का देणारी आहे.”

या घटनेची गांभीर्याने दखल घेऊन मा.मंत्री आदरणीय बाळासाहेब थोरात साहेब तसेच महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धनजी सपकाळ साहेब यांनी प्रशासनाकडे संबंधित आरोपींवर कठोर कारवाईची मागणी केली आहे.

सौ. घोगरे पुढे म्हणाल्या –
“संबंधित भाजप पदाधिकाऱ्यांवर तात्काळ कठोर गुन्हा दाखल झाला पाहिजे. अन्यथा काँग्रेस पक्ष रस्त्यावर उतरून लोकशाही मार्गाने न्याय मिळविण्यासाठी लढा उभारेल. न्याय मिळेपर्यंत आम्ही शांत बसणार नाही.”

दरम्यान, या प्रकरणी काँग्रेसच्या वतीने शिर्डी येथील राहता तालुका पोलीस ठाणे येथे अधिकृत निवेदन देऊन गुंड प्रवृत्तीच्या कृत्याचा तीव्र निषेधही नोंदविण्यात आला.

यावेळी ॲड.पंकज लोंढे, सचिन चौगुले, विक्रांत दंडवते, शिवसेनेचे सचिन कोते, संजय शिंदे, ज्ञानेश्वर वर्पे, उत्तमराव घोरपडे, राजेंद्र निर्मळ, सचिन गाडेकर, अमृत गायके, अमोल आरणे, उत्तमराव मते, संजय डांगे, रावसाहेब बनसोडे, सौरभ शेळके, सचिन(मुन्ना) आहेर, शरद घोगरे, किरण जपे, शरद भदे, साहिल मस्के यांच्यासह महिला प्रतिनिधी सुनीता कोरडे आणि इतर अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते होते.

विशेष म्हणजे या निषेधात काँग्रेससोबत शिवसेनेचे पदाधिकारी व कार्यकर्तेही सहभागी झाले, ज्यामुळे पक्षांची एकजूट स्पष्ट झाली.

काँग्रेस पक्षाने न्याय मिळेपर्यंत ठाम भूमिका घेण्याची भूमिका ठरवली असून, सामाजिक सलोखा टिकवण्यासाठी व संविधानाचे मूल्य जपण्यासाठी सर्व कार्यकर्त्यांनी एकत्र येऊन आवाज उठविण्याचे आवाहन केले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

मॅक्रॉन चर्चा, ट्रम्प बैठक, G7 शिखर परिषद आणि तंत्रज्ञान संबंध: पंतप्रधान मोदींच्या युरोप अजेंडावर...

पंतप्रधान नरेंद्र मोदी नवी दिल्ली: फ्रान्स आणि स्लोव्हाकियाच्या भेटी आणि त्यानंतर G7 शिखर परिषदेत सहभाग असलेल्या व्यस्त युरोप दौऱ्याची सुरुवात करून पंतप्रधान नरेंद्र...

आजची ज्यू म्हण: “साठ वर्षांची स्त्री, सहा वर्षांच्या मुलीसारखी,… च्या आवाजाने धावते” |

दिवसाची ज्यू म्हण (Google Gemini द्वारे व्युत्पन्न केलेली प्रतिमा) वय वाढण्याबद्दल एक मनोरंजक गोष्ट आहे. लोक अगणित मार्गांनी बदलतात. त्यांचा दिनक्रम बदलतो. त्यांचे...

गुठळ्या त्वचेच्या आजाराचा सामना करण्यासाठी महाराष्ट्रात शेळीपॉक्स लस उत्पादनास सुरुवात झाली

प्रातिनिधिक हेतूसाठी चित्र पुणे : राज्य पशुसंवर्धन विभागाच्या पशुवैद्यकीय जैविक उत्पादनांच्या संस्थेने (IVBP) प्रथमच गुरांचे ढेकूळ त्वचा रोग (LSD) पासून संरक्षण करण्यासाठी गोटपॉक्स...

'त्या चर्चेने मला खरोखर मदत केली': अफगाणिस्तानच्या गुरबाजने रेकॉर्डब्रेक शतकाचे श्रेय गौतम गंभीरला दिले

रहमानउल्ला गुरबाज आणि गौतम गंभीर (एजन्सी इमेज) अफगाणिस्तानचा सलामीवीर रहमानुल्ला गुरबाज याने शनिवारी धर्मशाला येथील एचपीसीए स्टेडियमवर झालेल्या पहिल्या वनडेमध्ये यजमानांविरुद्ध जबरदस्त शतक...

रुबिओचे शब्द आज्ञेचे होते, खेदाचे नव्हते: काँग्रेस

नवी दिल्ली: ओमानच्या आखातातील एका व्यावसायिक जहाजावर अमेरिकेने केलेल्या हल्ल्यात तीन भारतीय क्रू मेंबर्सचा मृत्यू झाल्याबद्दल अमेरिकेचे परराष्ट्र सचिव मार्को रुबिओ यांच्या...

error: Content is protected !!