Homeताज्या बातम्यासौ प्रभावती घोगरे यांच्या नेतृत्वात महाविकास आघाडी व घटक पक्षाचे जन सुरक्षा...

सौ प्रभावती घोगरे यांच्या नेतृत्वात महाविकास आघाडी व घटक पक्षाचे जन सुरक्षा कायदा विरोधात निवेदन

सौ प्रभावती घोगरे यांच्या नेतृत्वात महाविकास आघाडी व घटक पक्षाचे जन सुरक्षा कायदा विरोधात निवेदन

राहाता, दिनांक –
महाराष्ट्र राज्यात नागरिकांच्या मौलिक हक्कांवर घाला घालणाऱ्या आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर प्रचंड परिणाम करणाऱ्या “महाराष्ट्र विशेष जन सुरक्षा कायदा २०२४” विरोधात काँग्रेसच्या प्रदेश सरचिटणीस सौ प्रभावती जनार्दन घोगरे यांच्या नेतृत्वाखाली राहाता येथे शांततामय आंदोलनाचे आयोजन करण्यात आले.

या वेळी सौ प्रभावती घोगरे यांनी नायब तहसीलदार श्री हेमंत पाटील साहेब यांच्याकडे महाविकास आघाडी व घटक पक्षांच्या वतीने निवेदन सुपूर्त केले. निवेदनामध्ये सरकारच्या मनमानी व लोकशाही विरोधी धोरणांविरुद्ध कडक निषेध व्यक्त केला गेला.
निवेदनात स्पष्ट करण्यात आले की प्रस्तुत विधेयक मनमानी अटक व शांततामय आंदोलनांवर बंदी घालण्याचा कट रचलेला असून, भारतीय संविधानात दिलेले नागरिकांचे मुळभूत हक्क कायम ठेवण्याची कडक मागणी करण्यात आली आहे.

सौ प्रभावती घोगरे म्हणाल्या,
“लोकशाहीमुळे नागरिकांना मोकळ्या मनाने विचार मांडण्याचा व शांततामय आंदोलन करण्याचा अधिकार आहे. सरकारने प्रस्तावित केलेला जन सुरक्षा कायदा या अधिकारांना गंभीरपणे आघात करणारा असून तात्काळ रद्द करावा.”

तसेच श्री धनंजय गाडेकर, नाना बावके, ॲड. पंकज लोंढे, सचिन चौगुले, शशिकांत लोळगे,सिमोन जगताप, राजेंद्र बावके, बाळासाहेब गिधाड, गणेश सोमवंशी आदींनी यावेळी मनोगत व्यक्त केले.

कार्यक्रमात श्री भगवानराव टिळेकर, राजेंद्र बावके, विजयराव दंडवते, नानासाहेब बावके, विठ्ठलराव शेळके, अनिल बोठे, विक्रांत दंडवते, रंजीत बोठे, विजय मोगले,राजेंद्र निर्मळ, पुंडलिक बावके, लक्ष्मण सदाफळ, प्रशांत सदाफळ, सुरेश पानसरे, संपत हिंगे, कानिफनाथ तांबे, बाळासाहेब गिधाड, अमृत गायके, उत्तमराव मते, सदाशिव गाडेकर, अमोल आरणे, योगेश सातपुते, अनिस शेख, शरद घोगरे, राहुल विखे,संतोष अनाप, सोमनाथ जेजुरकर व महिला प्रतिनिधी सौ. आशाताई आहेर यांसह मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते.

नायब तहसीलदार श्री हेमंत पाटील साहेब यांनी हे निवेदन स्वीकारले व प्रशासनाकडे योग्य ती कारवाई करण्याचे आश्वासन दिले.

सौ प्रभावती घोगरे व इतर पक्षनेते यांनी सरकारला जनतेच्या शांततामय आवाजाचा आदर करण्याचे आव्हान केले व पुढील आंदोलनात्मक कारवायांची घोषणाही केली आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

*भाजपा अल्पसंख्यांक मोर्चा जिल्हाध्यक्ष श्री. रऊफ शेख यांची राहता येथे ‘ग्रेट भेट’; कार्यकर्त्यांशी संवाद...

*भाजपा अल्पसंख्यांक मोर्चा जिल्हाध्यक्ष श्री. रऊफ शेख यांची राहता येथे 'ग्रेट भेट'; कार्यकर्त्यांशी संवाद व कौटुंबिक भेटीगाठी* *राहता, दि. 13मे*: *भारतीय जनता पार्टी अल्पसंख्यांक मोर्चाचे...

त्याने हेलिकॉप्टर धुतले, साम्राज्य निर्माण केले, निवृत्त झाले – नंतर 64 व्या वर्षी इंटर्न...

"मला पैशांची गरज नाही. माझ्याकडे पुरेसे आहे."ओटिस डिसोझा यांनी ते इतके आकस्मिकपणे सांगितले की ते जवळजवळ अविस्मरणीय वाटले.त्यानंतर वाक्याचा दुसरा अर्धा भाग...

कर्जमाफी योजनेनंतर कंपनी सेक्रेटरी कोर्समध्ये 1,000 पर्यंत ड्रॉपआउट्स पुन्हा सामील होतात

इन्स्टिट्यूट ऑफ कंपनी सेक्रेटरीज ऑफ इंडियाचे राष्ट्रीय अध्यक्ष पवन चांडक पुण्यात बोलत होते पुणे : इन्स्टिट्यूट ऑफ कंपनी सेक्रेटरीज ऑफ इंडिया (ICSI) ने...

सहा वेळचा चॅम्पियन ऑस्ट्रेलियाने लॉरा वोल्वार्डच्या दक्षिण आफ्रिकेचा पराभव केला; महिला T20 विश्वचषकाची दमदार...

मँचेस्टर, इंग्लंड येथे 13 जून 2026 रोजी ओल्ड ट्रॅफर्ड येथे ICC महिला T20 विश्वचषक 2026 सामन्यादरम्यान दक्षिण आफ्रिकेची लॉरा वोल्वार्ड एक शॉट खेळत...

'खाली घे!' केनेडी सेंटरने ट्रम्पचे नाव काढून टाकल्याने गर्दीचा जयजयकार झाला – पहा

वॉशिंग्टनमधील जॉन एफ केनेडी सेंटर फॉर परफॉर्मिंग आर्ट्सच्या दर्शनी भागातून अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे नाव काढून टाकण्याचे काम शनिवारी पूर्ण झाले....

error: Content is protected !!