शिर्डी ( प्रतिनिधी) : देशातील नंबर दोनचे आंतरराष्ट्रीय दर्जाचे देवस्थान असलेल्या शिर्डी शहरातून जाणाऱ्या राष्ट्रीय राज्य नगर मनमाड महामार्गावर मागील वर्षी निकृष्ट दर्जाचे डांबरीकरणाचे काम करण्यात आले असून शिर्डी शहरात निकृष्ट दर्जाचे काम झाल्यामुळे एकाच वर्षात वर्षात खड्डेच खड्डे पडल्याने दुचाकी वाहनधारक तसेच पायी पालखी घेऊन येणाऱ्या साई भक्तांना शिर्डी नागरिकांना आपला जीव मुठीत धरून वाटचाल कारवाई लागत तसेच शिर्डी बायपास जड वाहतूक वळवलेली असताना सदर रस्त्यावर कमी वर्दळ असताना देखील रस्ता एकाच वर्षात कसा खराब झाला हा प्रश्न नागरिकांना पडला आहे तरी ठेकेदारांकडून तातडीने नव्याने डांबरीकरण करून तयार करून घेण्यात यावा अन्यथा शिर्डी शहर राष्ट्रवादी पक्षाच्या वतीने आंदोलन तीव्र स्वरूपाचे छेडण्यात येईल असा इशारा शिर्डी शहर राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष दीपक गोंदकर यांनी केले आहे.
दरम्यान राष्ट्रवादीचे शिर्डी शहराध्यक्ष श्री गोंदकर यांनी म्हटले आहे कि, साईबाबांच्या शिर्डी शहरात वर्षाकाठी देश विदेशातून लाखो साईभक्त शिर्डीत येत असतात.शहरातून जाणाऱ्या नगर मनमाड रस्त्यावर मागील वर्षी ठेकेदारांकडून अतिशय निकृष्ट दर्जाचे काम झाल्याने रस्त्यावर एक वर्षाच्या आतच या रस्त्यावर खडी उदगळून पडली आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी मोठ मोठे खड्डे पडले असून रस्त्यावरून येणाऱ्या जाणाऱ्या दुचाकीस्वारांना धुळीच्या साम्राज्याला सामोरे जावे लागत आहे तसेच पद यात्रींना आपला जीव मुठीत धरून वाटचाल करावी लागत असल्याचे निदर्शनास आले आहे.त्यामुळे सदरच्या रस्त्याचे काम सबंधित ठेकेदारांकडून नव्याने तातडीने पूर्ण करून घ्यावे आणि साई भक्तांच्या प्रवास सुखकर व्हावा अशी मागणी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण अहिल्यांयानगर यांच्याकडे शिर्डी शहराध्यक्ष दीपक गोंदकर यांनी केली आहे.
याप्रसंगी बाबासाहेब कोते, राष्ट्रवादीचे नेते रमेश गोंदकर निलेश कोते, अमित शेळके, युवक अध्यक्ष निलेश शिंदे, साई कोतकर, सचिन गोंदकर, योगेश गायके, अनिल कोते, सुशांत अवताडे, अमोल सुपेकर, अजित जगताप, शंकर त्रिभुवन, गणेश कानडे, गंगाधर वाघ, राहुल फुंदे, चंद्रभान बनकर, फिरोज पठाण, राजेश कांबळे, विशाल नागरगोजे, युनूस सय्यद, सादिक शेख, लक्ष्मण झाडे आदी उपस्थित होते.




















