Homeताज्या बातम्याडॉ .सुजयदादा तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है..... एकच वादा सुजय...

डॉ .सुजयदादा तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है….. एकच वादा सुजय दादा—-डॉ स्वाधीन गाडेकर ( लोकनियुक्त नगराध्यक्ष राहाता नगरपरिषद )

राहाता प्रतिनिधी
भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी मुंबईतून नव्या कार्यकारिणीची घोषणा केली.या घोषणेत माजी खासदार डॉ सुजयदादा विखे पाटील यांची भारतीय जनता पार्टीच्या प्रदेश उपाध्यक्षपदी निवड जाहीर होताच राहाता शहरात नगराध्यक्ष डॉ.स्वाधीन गाडेकर तसेच नगरपरिषद पदाधिकारी व शहरवासीयांनी फटाक्यांची जोरदार आतिषबाजी करत व एकमेकांना पेढा भरवून या निवडीचे स्वागत करीत मोठा जल्लोष साजरा केला यावेळी डॉ .सुजयदादा तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है….. एकच वादा सुजय दादा अशा घोषणांनी परिसर दुमदुमून गेला होता..

भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी मुंबईतून नव्या कार्यकारिणीची घोषणा केली. या घोषणेत डॉ. सुजय विखे पाटील यांची भारतीय जनता पार्टीच्या प्रदेश उपाध्यक्षपदी निवड जाहीर केली आणि राहाता शहरात कार्यकर्त्यांनी सर्वत्र फटाक्यांची जोरदार आतिषबाजी करून मिठाई वाटप करून आपल्या नेतृत्वाला मिळालेल्या महत्त्वपूर्ण जबाबदारीबद्दल जल्लोष साजरा केला विधानसभा, नगरपालिका आणि महानगरपालिका निवडणुकां दरम्यान डॉ सुजयदादा विखे पाटील यांनी केलेल्या संघटनात्मक कामाची अहिल्यानगर मध्ये मिळवलेले अभूतपूर्व राजकीय यश आणि पक्षविस्तारा साठी घेतलेल्या मेहनतीची दखल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व पक्ष नेतृत्वाने घेतल्याने नगराध्यक्ष डॉ. स्वाधीन गाडेकर व उपस्थितांनी या सर्वांचे आभार मानत आनंदोत्सव साजरा केला याप्रसंगी उपनगराध्यक्ष डॉ विजय सदाफळ, भाजपा महिला मोर्चा जिल्हाध्यक्षा शोभा घोरपडे, माजी नगराध्यक्ष कैलास सदाफळ, गणेश चे माजी संचालक मोहनराव सदाफळ, नगरसेवक मुन्ना शहा, राहुल सदाफळ, दशरथ तुपे, संदीप मुर्तडक, नितीन गाडेकर, प्रवीण रुणवाल, संजय गांधी निराधार योजना चे अध्यक्ष संजय सदाफळ, वीरभद्र देवस्थान ट्रस्ट चे अध्यक्ष जबाजी मेचे, उपाध्यक्ष विजय सदाफळ , अनु. जमाती मोर्चा मंडलअध्यक्ष पुनीत बर्डे, युवा मोर्चा मंडल अध्यक्ष सागर कापसे, भटक्या विमुक्त आघाडी संयोजक चेतन रनमाळे,माजी नगरसेवक भीमराज निकाळे , सचिन मेहेत्रे, प्रभाकर आरणे, स्वप्नील बावके, दादा दळवी, राजू भातोडे, मंगेश भातोडे, दत्ता सदाफळ, भूषण देसाई, दिलीप वाघ, अंकुश भडांगे , मंगल बोठे, डॉ.वैशाली मस्के, दीपाश्री चोळके, अलका शेजवळ, सुरेखा रनमाळे, सुवर्ण मोकाशी, दिपाली गिळे, लता शेलार, अर्चना डांगे,पुष्पलता हरदास, अक्षदा अछडा,ललिता आहेर, पुष्पा शिरसागर, ॲड प्रवीण गांधी आदी समवेत मोठ्या प्रमाणात युवक व महिला कार्यकर्ते यांच्यासह मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते.

जल्लोष यानंतर प्रतिक्रिया देताना राहाता नगरपरिषदेचे लोकनियुक्त नगराध्यक्ष डॉ स्वाधीन गाडेकर म्हणाले की मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्यासह वरिष्ठ नेतृत्वाने डॉ.सुजयदादा विखे पाटील यांची प्रदेश उपाध्यक्षपदी केलेली निवड अहिल्यानगर जिल्हा व आमच्या सर्वांसाठी भूषणाह व अभिमानास्पद बाब आहे राज्याचे जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचे मार्गदर्शन व नेतृत्वाखाली काम करताना आमचे प्रेरणास्थान डॉ सुजयदादा विखे पाटील यांची राज्य संघटनेत एवढ्या उच्च पदावर लागलेली वर्णी म्हणजे अहिल्यानगर साठी मोठी सन्मानाची बाब आहे पहिल्यांदाच अहिल्यानगर जिल्ह्यात युवा नेतृत्वाला दिलेली मोठी जबाबदारी व संधी प्राप्त झाली आहे या पदाच्या माध्यमातून युवा नेतृत्व व आमचे प्रेरणास्थान डॉक्टर सुजयदादा विखे पाटील भारतीय जनता पार्टी अधिक बळकटी प्राप्त करून देतील आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजपच्या राज्य संघटनेत सुजयदादा विखे पाटील यांच्या रूपाने कृतिशील कर्तव्यनिष्ठ व दूरदृष्टी नेतृत्व समोर आले आहे. जिल्हा ते राज्य असा प्रवास करत नेतृत्वाला मिळालेली संधी आम्हा सर्व कार्यकर्त्यांसाठी प्रेरणादायी व अभिमानास्पद असल्याचे नगराध्यक्ष गाडेकर यांनी सांगितले

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

मधुर विरली: 'कडल नही करोगे क्या इसके बाद?' या जुन्या क्लिपनंतर कॉमेडियन मधुर विरलीने...

सुमारे दोन वर्षांपूर्वी रेकॉर्ड केलेली स्टँड-अप कॉमेडी क्लिप पुन्हा चर्चेत आली आहे आणि यावेळी, त्यावर हास्याऐवजी टीका होत आहे.अलीकडच्या काही दिवसांत, सोशल...

कल्याण-नगर महामार्गावर कंटेनर ट्रकने मोटारसायकलला धडक दिल्याने दोघांचा मृत्यू झाला

कल्याण-नगर महामार्गावर कंटेनर ट्रकने मोटारसायकलला धडक दिल्याने दोघांचा मृत्यू झाला पुणे : कल्याण-नगर महामार्गावर शनिवारी रात्री उशिरा पुण्यापासून १०५ किलोमीटर अंतरावर असलेल्या ओतूरजवळील...

आणखी एक सुरुवात, दुसरी चूक: वैभव सूर्यवंशी श्रीलंका अ विरुद्ध २१ धावांवर बाद

वैभव सूर्यवंशी (एक्स-क्रिकबझ) वैभव सूर्यवंशीची आणखी एक निराशाजनक खेळी, कारण किशोरवयीन फलंदाजीची खळबळजनक खेळी पुन्हा एकदा चालू असलेल्या त्रि-राष्ट्रीय मालिकेत भरीव धावसंख्येमध्ये आश्वासक...

वर्ल्ड कप फुटबॉलची जादू पाहण्यासाठी चाहते कामाच्या वेळापत्रकात बदल करतात, बॉडी क्लॉक | भारत...

फुटबॉल चाहत्यांनी कोलकात्यात रोनाल्डो, नेमार आणि मेस्सीचे कट आऊट घेतले; कोझिकोडचे चाहते ब्राझील विरुद्ध मोरोक्को पाहतात. (पीटीआय आणि रॉयटर्स फोटो) क्रॉस. नियंत्रण. ड्रिबल....

“मुले रडत नाहीत” कदाचित आपल्या मुलांना आपल्या लक्षात येण्यापेक्षा जास्त त्रास होत असेल; 5...

एक लहान मुलगा एका संध्याकाळी त्याच्या आईकडे पाहतो आणि विचारतो, "आई, लोक मला सांगतात की मुले रडू नका. म्हणून मी रडलो तर मी अशक्त...

error: Content is protected !!