Homeताज्या बातम्या“”श्री साईबाबा हॉस्पिटलमध्ये ४ किलोचा महाकाय ट्यूमर यशस्वीरीत्या काढला - श्रद्धा, सबुरी...

“”श्री साईबाबा हॉस्पिटलमध्ये ४ किलोचा महाकाय ट्यूमर यशस्वीरीत्या काढला – श्रद्धा, सबुरी आणि शस्त्रकौशल्याची सांगड!—-गोरक्ष गाडीलकर ( मुख्य कार्यकारी अधिकारी )

🏥 “”श्री साईबाबा हॉस्पिटलमध्ये ४ किलोचा महाकाय ट्यूमर यशस्वीरीत्या काढला – श्रद्धा, सबुरी आणि शस्त्रकौशल्याची सांगड!
शिर्डी : श्री साईबाबा हॉस्पिटलमध्ये एक अतिशय गुंतागुंतीची आव्हानात्मक शस्त्रक्रिया यशस्वीरीत्या पार पडली. दिनांक १३ फेब्रुवारी २०२६ रोजी हॉस्पिटलमधील जनरल सर्जन डॉ. अजिंक्य पानगव्हाणे व त्यांच्या टीमने रुग्णाच्या पोटातून तब्बल चार किलो वजनाचा ट्यूमर सर्जरी करून यशस्वीरीत्या काढून मोठे वैद्यकीय यश संपादन केले आहे. निकिता गायकवाड राहणार कोपरगाव वय 27 ह्या रुग्णाला बाळंतपणानंतर गेल्या काही दिवसांपासून पोटात तीव्र वेदना व सूज जाणवत होती. त्या तपासणी करिता श्री साईबाबा हॉस्पिटल शिर्डी येथे डॉक्टर अजिंक्य पानगव्हाणे यांच्या कडे आल्या असता तपासणीनंतर त्यांच्या पोटामध्ये मोठ्या आकाराचा ट्यूमर असल्याचे निदान झाले. परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन तातडीने शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय घेण्यात आला. डॉ. अजिंक्य पानगव्हाणे व भूलतज्ञ डॉ निहार जोशी यांच्या कुशल नेतृत्वाखाली श्री साईबाबा हॉस्पिटल मधील वैद्यकीय टीमने अत्यंत कौशल्यपूर्ण पद्धतीने शस्त्रक्रिया पूर्ण केली. या शस्त्रक्रियेमध्ये श्रद्धा, सबुरी आणि शस्त्रकौशल्याची सांगड झाल्याचे दिसून येत असून सध्या रुग्णाची प्रकृती पूर्णतः स्थिर असल्याकारणाने व समाधानकारकरीत्या सुधारल्यामुळे डॉक्टरांनी त्यांना नुकताच डिस्चार्ज दिला. आधुनिक तंत्रामुळे शस्त्रक्रिया कमी वेदनादायक, कमी रक्तस्रावाची आणि जलद पुनर्वसनाची ठरली आहे. श्री साईबाबा हॉस्पिटलमध्ये उपलब्ध आधुनिक वैद्यकीय सुविधा आणि अनुभवी डॉक्टरांमुळे परिसरातील रुग्णांना मोठा आधार व दिलासा मिळत आहे.

रुग्णाच्या कुटुंबीयांनी डॉक्टर व संपूर्ण वैद्यकीय टीमचे मनःपूर्वक आभार मानले असून, डॉ. अजिंक्य पानगव्हाणे भूलतज्ञ डॉ निहार जोशी व जनरल सर्जरी विभागातील सर्व कर्मचाऱ्यांचे श्री साईबाबा संस्थान विश्वस्त व्यवस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री गोरक्ष गाडीलकर साहेब(भा प्र से ) यांनी कौतुक केले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

आणखी एक सुरुवात, दुसरी चूक: वैभव सूर्यवंशी श्रीलंका अ विरुद्ध २१ धावांवर बाद

वैभव सूर्यवंशी (एक्स-क्रिकबझ) वैभव सूर्यवंशीची आणखी एक निराशाजनक खेळी, कारण किशोरवयीन फलंदाजीची खळबळजनक खेळी पुन्हा एकदा चालू असलेल्या त्रि-राष्ट्रीय मालिकेत भरीव धावसंख्येमध्ये आश्वासक...

वर्ल्ड कप फुटबॉलची जादू पाहण्यासाठी चाहते कामाच्या वेळापत्रकात बदल करतात, बॉडी क्लॉक | भारत...

फुटबॉल चाहत्यांनी कोलकात्यात रोनाल्डो, नेमार आणि मेस्सीचे कट आऊट घेतले; कोझिकोडचे चाहते ब्राझील विरुद्ध मोरोक्को पाहतात. (पीटीआय आणि रॉयटर्स फोटो) क्रॉस. नियंत्रण. ड्रिबल....

“मुले रडत नाहीत” कदाचित आपल्या मुलांना आपल्या लक्षात येण्यापेक्षा जास्त त्रास होत असेल; 5...

एक लहान मुलगा एका संध्याकाळी त्याच्या आईकडे पाहतो आणि विचारतो, "आई, लोक मला सांगतात की मुले रडू नका. म्हणून मी रडलो तर मी अशक्त...

तळेगाव मंदिरात 1.3 किलोचा चांदीचा मुकुट पुन्हा चोरीला गेला

पुणे23 मे रोजी तळेगाव दाभाडे येथील मंदिरातून चोरट्यांनी पहिल्यांदा तुळजाभवानी देवीचा 1.3 किलो वजनाचा चांदीचा मुकुट चोरला.एका अज्ञात व्यक्तीने भक्त असल्याचे भासवून...

एजबॅस्टनचा इतिहास! भारत-पाकिस्तानने मोडला महिला T20 विश्वचषकातील विक्रम | क्रिकेट बातम्या

भारताच्या स्मृती मानधनाने तिची अर्धशतक पूर्ण केली (AP/PTI) एजबॅस्टन येथे रविवारी भारत आणि पाकिस्तान यांच्यातील ब्लॉकबस्टर चकमकीने केवळ भारतीय विजय मिळवून दिला नाही...

error: Content is protected !!