Homeताज्या बातम्याआमच्या हयातीत संत सेना महाराजांच्या राहाता येथिल मंदिराचा जीर्णोधार झाला पाहिजे हीच...

आमच्या हयातीत संत सेना महाराजांच्या राहाता येथिल मंदिराचा जीर्णोधार झाला पाहिजे हीच इच्छा —-श्री दशरथभाऊ तुपे ( संत सेना नाभिक मंडळ अध्यक्ष राहाता)

संत सेना महाराज यांच्या पुण्यतिथी निमित्त राहाता शहरात भव्य शोभा मिरवणूक काढण्यात आली. या मिरवणुकीत महिला, लहान मुले तसेच नाभिक समाज बांधव मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. पारंपरिक वाद्यांच्या गजरात आणि टाळ-मृदंगाच्या तालात ही शोभायात्रा पालखी मार्गे शहरात फिरवण्यात आली…शोभायात्रे दरम्यान महिलांनी फुगडी खेळून पारंपरिक संस्कृती जपली. सकाळी संत सेना महाराजांच्या पवित्र प्रतिमेचे अभिषेक व पूजन करून धार्मिक विधी पार पडले.या भव्य सोहळ्यामुळे राहाता शहरात भक्तीमय वातावरण निर्माण झाले होते.
आपले मनोगत व्यक्त करताना संत सेना नाभिक मंडळ अध्यक्ष व समाजसेवक दशरथ तुपे यांनी मंदिराची माहिती देवून मंदिराचा जीर्णोधार गरजेचा असून जीर्णोधार आमच्या हयातीत झाला पाहिजे हीच सर्व समाजाची इच्छा असल्याचे सांगितले.भाजपा नेते राजेंद्र पिपाडा यांनी मनोगत व्यक्त करताना खासदार साहेबांकडून मंदिरास मदत मिळवून देण्याची ग्वाही व त्यासाठी लागणारा संपूर्ण पाठपुरावा करणार असल्याचे सांगितले.सिंनगर सरानी सुद्धा मंदिर जीर्णोद्धारासाठी सर्वोतोपरी मदत करण्याचे सांगितले.
राहाता शहराचे भूषण असलेली राहाता पीपल्स नागरी सहकारी पतसंस्था राहाता चे चेयरमन श्री भाऊसाहेब चौधरी यांनी जात पात न जुमानता सामाजिक बांधिलकी म्हणून रोख रक्कम पंचवीस हजार रुपये मंदिरासाठी मदत केली .मंडळातर्फे त्यांचा सत्कार करण्यात आला.

या कार्यक्रमासाठी माजी ग्रामसेवक राजू गायकवाड यांनी अन्नदान केले तर भारत धावणे महाराजांचे किर्तन पार पडले…

यावेळी मुकूंदनाना सदाफळ ,मोहनदादा सदाफळ , कैलास बापू सदाफळ , डॉ.राजेंद्र पिपाडा , स्वाधीन गाडेकर , पत्रकार अजय जाधव,राजूभाई पठाण,मोगले,भाऊसाहेब चौधरी,राजेंद्र पठारे , राजेंद्र धुमसे , शशिकांत लोळगे , मुकूंद सिनारे , धनंजय गाडेकर , राजेंद्र निकाळे , सागर सदाफळ , गणेश बोरकर , सागर बोठे , अनिल बोठे , साई कार्ले , सागर भुजबळ ,दशरथ तुपे,संदीप तुपे.भगवान वाघ यासह नाभिक बांधव भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

रुबिओचे शब्द आज्ञेचे होते, खेदाचे नव्हते: काँग्रेस

नवी दिल्ली: ओमानच्या आखातातील एका व्यावसायिक जहाजावर अमेरिकेने केलेल्या हल्ल्यात तीन भारतीय क्रू मेंबर्सचा मृत्यू झाल्याबद्दल अमेरिकेचे परराष्ट्र सचिव मार्को रुबिओ यांच्या...

*भाजपा अल्पसंख्यांक मोर्चा जिल्हाध्यक्ष श्री. रऊफ शेख यांची राहता येथे ‘ग्रेट भेट’; कार्यकर्त्यांशी संवाद...

*भाजपा अल्पसंख्यांक मोर्चा जिल्हाध्यक्ष श्री. रऊफ शेख यांची राहता येथे 'ग्रेट भेट'; कार्यकर्त्यांशी संवाद व कौटुंबिक भेटीगाठी* *राहता, दि. 13मे*: *भारतीय जनता पार्टी अल्पसंख्यांक मोर्चाचे...

त्याने हेलिकॉप्टर धुतले, साम्राज्य निर्माण केले, निवृत्त झाले – नंतर 64 व्या वर्षी इंटर्न...

"मला पैशांची गरज नाही. माझ्याकडे पुरेसे आहे."ओटिस डिसोझा यांनी ते इतके आकस्मिकपणे सांगितले की ते जवळजवळ अविस्मरणीय वाटले.त्यानंतर वाक्याचा दुसरा अर्धा भाग...

कर्जमाफी योजनेनंतर कंपनी सेक्रेटरी कोर्समध्ये 1,000 पर्यंत ड्रॉपआउट्स पुन्हा सामील होतात

इन्स्टिट्यूट ऑफ कंपनी सेक्रेटरीज ऑफ इंडियाचे राष्ट्रीय अध्यक्ष पवन चांडक पुण्यात बोलत होते पुणे : इन्स्टिट्यूट ऑफ कंपनी सेक्रेटरीज ऑफ इंडिया (ICSI) ने...

सहा वेळचा चॅम्पियन ऑस्ट्रेलियाने लॉरा वोल्वार्डच्या दक्षिण आफ्रिकेचा पराभव केला; महिला T20 विश्वचषकाची दमदार...

मँचेस्टर, इंग्लंड येथे 13 जून 2026 रोजी ओल्ड ट्रॅफर्ड येथे ICC महिला T20 विश्वचषक 2026 सामन्यादरम्यान दक्षिण आफ्रिकेची लॉरा वोल्वार्ड एक शॉट खेळत...

error: Content is protected !!