Homeताज्या बातम्यासाई भक्ताला मदत करनारा शाहरुख ठरला शिर्डी माणुसकीचा हिरो

साई भक्ताला मदत करनारा शाहरुख ठरला शिर्डी माणुसकीचा हिरो

राजेंद्र भुजबळ पत्रकार शिर्डी प्रतिनिधी

सर्वंधर्म समभावाचं प्रतीक असणाऱ्या साईंच्या नगरीत दररोज हजारो भाविक दर्शनासाठी येत असतात,शुक्रवारी राजस्थान बॉर्डर वरील रतलाम येथून आशिष जैन नावाचे भाविक एकटेच शिर्डीत आले. आपल्या आईने त्यांना शिर्डीला जाऊन बाबांचे आशीर्वाद घेण्याचे सांगितले, आईच्या इच्छेनुसार ते साई दर्शनासाठी शिर्डीत आले होते. वास्तविक आशिष जैन हे नित्यानियमाने दर पौर्णिमेला शिर्डीत येऊन दर्शन घेत होते. परंतु तीन महिन्यांपासून ते शिर्डीत गेले नसल्याने त्यांच्या आईने त्यांना शिर्डीला जाण्यास सांगितले. शुक्रवारी जैन यांनी शिर्डीतील हैदरभाई पठाण यांच्या लॉजिंगवर रूम घेतला व साई समाधी दर्शनाला गेले. मंदिरात मोबाईल नेण्यास बंदी असल्याने त्यांनी तो रूमवरच ठेवला होता, दर्शन झाल्यावर ते रूमवर आल्यावर त्यांनी मोबाईल चालू केला व त्यावर घरचे वीस मिसकॉल आलेले होते, ज्यावेळी त्यांनी रीडायल केला त्यावेळी त्यांच्या पत्नीने आईचा वीस मिनिटांपूर्वी देहांत झाला आहे असे सांगितले हे ऐकून ते रडू लागले व ज्यावेळी आईचा मृत्यू झाला त्यावेळी ते साई समाधी दर्शन घेत होते. हा एक योगायोग होता, परंतु आईच्या अंतविधीला जाण्यासाठी बस रात्री होती त्यामुळे ते मोठया अडचणीत सापडले तर खासगी कार चे भाडेही खूप महाग जात होते, अशावेळी हैदरभाई पठाण यांनी माणुसकीचा हात देत जैन यांना धीर दिला व मुलगा शाहरुख याला स्वतःची गाडी घेऊन अंत्यविधीसाठी वेळेत पोहचविण्यासाठी जाण्यास सांगितले. शाहरुखने वडिलांच्या सांगण्यावरून जाण्याची तयारी फक्त दहा मिनिटात केली. राजस्थान बॉर्डर पर्यंतचा एक साईडचा प्रवास साडे पाचशे किलोमीटरचा होता परंतु शाहरुखने सलग नऊ तास ड्रायविंग करून सदर भक्ताला सुखरूप घरी सोडले व त्यांना आईच्या अंत्यसंस्कारासाठी वेळेत घरी पोहचऊन आपले कर्तव्य पार पाडले व जैन यांच्याकडून फक्त डिझेलचे पैसे घेऊन परत शिर्डीला निघाले. विशेष म्हणजे खासगी गाडीचे वीस हजारहुन अधिक भाडे झाले असते परंतु माणुसकी जोपासत त्यांनी भाविकाकडून कुठलेही पैसे घेतले नाही व परत नऊ तासाचा प्रवास करून शाहरुखभाई पठाण शिर्डीत शनिवारी पहाटे आले. ना जेवण ना नास्ता फक्त भाविकांची सेवा आणि केलेली वेळेवरची मदत ही कुठेतरी शिर्डी ग्रामस्थांना प्रेरणा देणारी ठरली.मी हे काम प्रामाणिक हेतूने केले असं त्यांनी आवर्जून सांगितलं. अर्थात एक मुस्लिम तरुण शिर्डीत एका भाविकाला आपल्या जीवाची पर्वा नकरता संकटात मदत करतो ही बाब शिर्डीत कळताच अनेकांनी त्यांचे कौतुक करत अभिनंदन केले. शाहरुख पठाण यांचे कौतुक करावे तेव्हडे थोडेच आहे. परंतु पत्रकार या नात्याने आपल्या लेखणीच्या आधारे त्यांचे मनापासून अभिनंदन करणे हा धर्म आणि कर्तव्य समजून नवराष्ट्र चे जेष्ठ पत्रकार व आपल्या पत्रकारितिने सर्वाणा न्याय देनारे राजेंद्र भुजबळ यांनी शाहरुख यांच्या कामगिरीला बातमीद्वारे न्याय दिला आहे.

शाहरुख पठाण यांचा मोबाईल नं. 9970919148

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

मॅक्रॉन चर्चा, ट्रम्प बैठक, G7 शिखर परिषद आणि तंत्रज्ञान संबंध: पंतप्रधान मोदींच्या युरोप अजेंडावर...

पंतप्रधान नरेंद्र मोदी नवी दिल्ली: फ्रान्स आणि स्लोव्हाकियाच्या भेटी आणि त्यानंतर G7 शिखर परिषदेत सहभाग असलेल्या व्यस्त युरोप दौऱ्याची सुरुवात करून पंतप्रधान नरेंद्र...

आजची ज्यू म्हण: “साठ वर्षांची स्त्री, सहा वर्षांच्या मुलीसारखी,… च्या आवाजाने धावते” |

दिवसाची ज्यू म्हण (Google Gemini द्वारे व्युत्पन्न केलेली प्रतिमा) वय वाढण्याबद्दल एक मनोरंजक गोष्ट आहे. लोक अगणित मार्गांनी बदलतात. त्यांचा दिनक्रम बदलतो. त्यांचे...

गुठळ्या त्वचेच्या आजाराचा सामना करण्यासाठी महाराष्ट्रात शेळीपॉक्स लस उत्पादनास सुरुवात झाली

प्रातिनिधिक हेतूसाठी चित्र पुणे : राज्य पशुसंवर्धन विभागाच्या पशुवैद्यकीय जैविक उत्पादनांच्या संस्थेने (IVBP) प्रथमच गुरांचे ढेकूळ त्वचा रोग (LSD) पासून संरक्षण करण्यासाठी गोटपॉक्स...

'त्या चर्चेने मला खरोखर मदत केली': अफगाणिस्तानच्या गुरबाजने रेकॉर्डब्रेक शतकाचे श्रेय गौतम गंभीरला दिले

रहमानउल्ला गुरबाज आणि गौतम गंभीर (एजन्सी इमेज) अफगाणिस्तानचा सलामीवीर रहमानुल्ला गुरबाज याने शनिवारी धर्मशाला येथील एचपीसीए स्टेडियमवर झालेल्या पहिल्या वनडेमध्ये यजमानांविरुद्ध जबरदस्त शतक...

रुबिओचे शब्द आज्ञेचे होते, खेदाचे नव्हते: काँग्रेस

नवी दिल्ली: ओमानच्या आखातातील एका व्यावसायिक जहाजावर अमेरिकेने केलेल्या हल्ल्यात तीन भारतीय क्रू मेंबर्सचा मृत्यू झाल्याबद्दल अमेरिकेचे परराष्ट्र सचिव मार्को रुबिओ यांच्या...

error: Content is protected !!