Homeताज्या बातम्याराहाता शहरात मोहम्मद पैगंबर जयंती निमित्त विविध सेवा उपक्रमांचे भव्य आयोजन

राहाता शहरात मोहम्मद पैगंबर जयंती निमित्त विविध सेवा उपक्रमांचे भव्य आयोजन

राहाता शहरात मोहम्मद पैगंबर जयंतीनिमित्त विविध सेवा उपक्रमांचे भव्य आयोजन

राहाता शहरातील सिरत कमिटीच्या वतीने १५०० व्या मोहम्मद पैगंबर जयंतीनिमित्त राहाता शहर व परिसरात सामाजिक आणि आरोग्य सेवा उपक्रमांचे भव्य आयोजन करण्यात आले. या उपक्रमांतून सर्वधर्मीय एकात्मता आणि मानवसेवेचा संदेश दिला जात आहे.

साकुरी येथील सिद्ध संकल्प मंगलकार्यालय येथे डॉ. जकवान गौरी यांच्या नेतृत्वाखाली हिजामा उपचार शिबिराचे आयोजन करण्यात आले. यामध्ये दोनशेहून अधिक तरुणांनी हिजामाचा लाभ घेत आरोग्य सुधारण्याचा मार्ग अवलंबला.

त्याच ठिकाणी डॉ. आमिर इनामदार आणि डॉ. वसीम कुरेशी यांच्या मार्फत मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले. अनेक नागरिकांनी या सेवांचा लाभ घेत आपल्या आरोग्याविषयी मार्गदर्शन मिळवले.

सिरत कमिटीच्या वतीने तालुक्यातील विविध ठिकाणी सुमारे ७० हजार रुपयांची केळी आणि बिस्किटे लहान मुलांना वाटप करण्यात आली. मुलांच्या चेहऱ्यावर उमटलेले हास्य हा कार्यक्रमाचा खरा यशाचा मानबिंदू ठरला.

सायंकाळी सिद्ध संकल्प मंगलकार्यालय येथे मौलाना अब्दुल्ला कासमी चतुर्वेदी (डायरेक्टर, एज्युकेशन अकॅडमी, बिहार) यांचे मार्गदर्शनपर प्रवचन आयोजित करण्यात आले. यावेळी राहाता आणि परिसरातील मुस्लिम तसेच हिंदू बांधव मोठ्या संख्येने उपस्थित राहून एकात्मतेचा संदेश दिला.

कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मौलाना यहया, सिरत कमिटी अध्यक्ष शाहरुख बागवान, सामाजिक कार्यकर्ते हाजी मुन्नाभाई शाह, डॉ जकवान गौरी,इलियास शहा सर,जेष्ठ पत्रकार मुस्ताक शहा, सलमान पठाण, शून्नाभाई शेख, भैय्या पैलवान, मतीन पठाण, तौसिफ सय्यद, इरफान शेख, दानिश पठाण, सद्दाम शेख, वाजिद शेख, साजिद इनामदार, खलील तांबोळी, जाहिद दारुवाले, शहाणवाज शेख, अर्शद शेख, नदीम शेख, शाहरुख तांबोळी, सोहेल शेख, जावेद सय्यद आदींनी विशेष परिश्रम घेतले.

कार्यक्रमादरम्यान मौलाना अब्दुल रऊफ साहब,राहाता पोलीस स्टेशनच्या उपपोलीस निरीक्षक कोमल कुमावत, लायन्स क्लबचे डॉ. संजय उबाळे, कैलासबाप्पु सदाफळ,डॉ स्वाधीन गाडेकर ( भाजपा मंडल अधिकारी राहता तालुका)राजूभाई पठाण पत्रकार,साहिल उद्योगसमूहाचे मालक दिलीप रोहम, धनुभाऊ गाडेकर,संदीपभाऊ दंडवते,इलियास भाई शहा टेलर,अन्सारभाई शेख,फिरोज पठाण,मौलाना अल्ताफ शहा,राजूभाई इनामदार,बाबासाहेब काकड पोलीस कॉन्स्टेबल अनिल गवांदे, विलास मोरे, पोलीस नाईक विनोद गंभीरे ,यांसह अनेक मान्यवरांनी सदिच्छा भेट देऊन कार्यक्रमाला पाठिंबा दिला.

या उपक्रमामुळे समाजातील परस्पर सहकार्य, सेवा आणि सद्भावनेचा संदेश बळकट झाला. सर्वधर्मीय नागरिकांनी एकत्र येत सामाजिक बांधिलकी आणि मानवतेसाठी कार्य करण्याचा संकल्प व्यक्त केला.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

मॅक्रॉन चर्चा, ट्रम्प बैठक, G7 शिखर परिषद आणि तंत्रज्ञान संबंध: पंतप्रधान मोदींच्या युरोप अजेंडावर...

पंतप्रधान नरेंद्र मोदी नवी दिल्ली: फ्रान्स आणि स्लोव्हाकियाच्या भेटी आणि त्यानंतर G7 शिखर परिषदेत सहभाग असलेल्या व्यस्त युरोप दौऱ्याची सुरुवात करून पंतप्रधान नरेंद्र...

आजची ज्यू म्हण: “साठ वर्षांची स्त्री, सहा वर्षांच्या मुलीसारखी,… च्या आवाजाने धावते” |

दिवसाची ज्यू म्हण (Google Gemini द्वारे व्युत्पन्न केलेली प्रतिमा) वय वाढण्याबद्दल एक मनोरंजक गोष्ट आहे. लोक अगणित मार्गांनी बदलतात. त्यांचा दिनक्रम बदलतो. त्यांचे...

गुठळ्या त्वचेच्या आजाराचा सामना करण्यासाठी महाराष्ट्रात शेळीपॉक्स लस उत्पादनास सुरुवात झाली

प्रातिनिधिक हेतूसाठी चित्र पुणे : राज्य पशुसंवर्धन विभागाच्या पशुवैद्यकीय जैविक उत्पादनांच्या संस्थेने (IVBP) प्रथमच गुरांचे ढेकूळ त्वचा रोग (LSD) पासून संरक्षण करण्यासाठी गोटपॉक्स...

'त्या चर्चेने मला खरोखर मदत केली': अफगाणिस्तानच्या गुरबाजने रेकॉर्डब्रेक शतकाचे श्रेय गौतम गंभीरला दिले

रहमानउल्ला गुरबाज आणि गौतम गंभीर (एजन्सी इमेज) अफगाणिस्तानचा सलामीवीर रहमानुल्ला गुरबाज याने शनिवारी धर्मशाला येथील एचपीसीए स्टेडियमवर झालेल्या पहिल्या वनडेमध्ये यजमानांविरुद्ध जबरदस्त शतक...

रुबिओचे शब्द आज्ञेचे होते, खेदाचे नव्हते: काँग्रेस

नवी दिल्ली: ओमानच्या आखातातील एका व्यावसायिक जहाजावर अमेरिकेने केलेल्या हल्ल्यात तीन भारतीय क्रू मेंबर्सचा मृत्यू झाल्याबद्दल अमेरिकेचे परराष्ट्र सचिव मार्को रुबिओ यांच्या...

error: Content is protected !!