Homeउद्योगशिर्डी (प्रतिनिधी) – अप्पर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर श्री. अविनाश अशोक शिंदे व श्री....

शिर्डी (प्रतिनिधी) – अप्पर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर श्री. अविनाश अशोक शिंदे व श्री. करणभाऊ गायकर यांनी विविध मागण्यांसाठी बेमुदत आमरण उपोषण

शिर्डी (प्रतिनिधी) – येथील अप्पर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर श्री. अविनाश अशोक शिंदे व श्री. करणभाऊ गायकर यांनी विविध मागण्यांसाठी बेमुदत आमरण उपोषण सुरू केले असून आंदोलन दिवसेंदिवस तीव्र होत आहे. या उपोषणामुळे परिसरात लक्षवेधी वातावरण निर्माण झाले आहे.
उपोषणकर्त्यांनी मांडलेल्या प्रमुख मागण्यांमध्ये २६ जानेवारी रोजी सर्वानुमते मंजूर झालेल्या ग्रामसभा ठरावाची तात्काळ अंमलबजावणी करावी, तसेच पिंपळवाडी येथील वीटभट्टीवर १५ वर्षीय बालमजुराच्या मृत्यूस जबाबदार असलेल्या संबंधितांवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा, यांचा समावेश आहे.
तसेच, पिंपळवाडी गावातील बेकायदेशीर वीटभट्ट्यांमुळे वाढणारे प्रदूषण, शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान व नागरिकांच्या आरोग्यावर होणारे दुष्परिणाम यावर तातडीने उपाययोजना करण्याची मागणी करण्यात आली आहे. ग्रामपंचायतीमार्फत बालमजुरीविरोधात ठोस धोरण राबवून सर्व वीटभट्ट्यांचे सर्वेक्षण करून योग्य ती कारवाई करावी, अशीही विनंती उपोषणकर्त्यांनी केली आहे.
यासोबतच, संबंधित प्रकरणात दुर्लक्ष करणाऱ्या प्रशासनातील अधिकाऱ्यांची सखोल चौकशी करून त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करावी व गावातील सर्व वीटभट्ट्यांचा पंचनामा करून त्या शासनाच्या ताब्यात घ्याव्यात, अशी ठाम भूमिका आंदोलनकर्त्यांनी घेतली आहे. तसेच २६ जानेवारीच्या ग्रामसभा ठरावाला न जुमानणाऱ्या वीटभट्टी मालकांवरही गुन्हे दाखल करण्याची मागणी करण्यात आली आहे.
दरम्यान, छावा क्रांतिवीर सेना, महाराष्ट्र राज्याचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपोषणस्थळी उपस्थित असून मागण्या पूर्ण होईपर्यंत उपोषण मागे घेणार नसल्याचा इशारा अविनाश शिंदे यांनी दिला आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

IPL 2026: 'तो माझ्या खिशात आहे'- पूरनला बाद केल्यानंतर जडेजाने आनंद साजरा केला

राजस्थान रॉयल्सचा रवींद्र जडेजा (पीटीआय फोटो) राजस्थान रॉयल्सने लखनौ सुपर जायंट्सचा 40 धावांनी पराभव केल्यामुळे रवींद्र जडेजाने सामना जिंकून देणारी अष्टपैलू...

ब्रिटनमधील पुरुषाने एका पीआयओ महिलेवर धार्मिकरित्या प्रेरित हल्ला केल्याचे कबूल केले

लंडनमधील TOI प्रतिनिधी: एका ब्रिटीश व्यक्तीने एका शीख महिलेवर तिच्या घरी बलात्कार केल्याची कबुली दिली आहे.जॉन ॲशबी (32), कोणतेही निश्चित निवासस्थान नसताना,...

तुम्ही तुमच्या बोगनविलेला दयाळूपणे मारत आहात का? येथे 4 गोष्टी आहेत ज्या तुम्हाला खरोखर...

पूर्ण बहरलेल्या बोगनविलेबद्दल काहीतरी आश्चर्यकारक आहे. ते भिंतींवर पसरते, बाल्कनीवर चढते आणि बाकी सर्व काही थकल्यासारखे दिसते तेव्हा रंगात फुटते. परंतु, त्या उज्ज्वल क्लस्टर्समागील...

PAT पेपर लीक झाल्यानंतर SCERT ने 6 ऑनलाइन चॅनलविरोधात तक्रार दाखल केली. पुणे बातम्या

पुणे : परीक्षेपूर्वी सोशल मीडियावर नियतकालिक मूल्यांकन चाचणी (पीएटी) III च्या प्रश्नपत्रिका प्रसारित केल्याच्या आरोपावरून व्हिडिओ-सामायिकरण प्लॅटफॉर्मवर सहा चॅनेलच्या संचालकांविरुद्ध मंगळवारी गुन्हा...

आयपीएल 2026: वैभव सूर्यवंशी 8 धावांवर बाद झाला कारण एलएसजी विरुद्ध आरआरची शीर्ष क्रम...

राजस्थान रॉयल्सचा वैभव सूर्यवंशी (एएनआय फोटो) लखनौ सुपर जायंट्स विरुद्ध राजस्थान रॉयल्सच्या लढतीत वैभव सूर्यवंशीकडे लक्ष वेधले गेले होते, सूर्यवंशी रेड-हॉट...

error: Content is protected !!