
राहाता तालुक्यातील नांदुर्खी बुद्रुक येथे जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील व खासदार सुजय विखे पाटील यांच्या सहकार्याने व नियोजनातून सांस्कृतिक भवनाचे काम चालू असून त्याची पाहणी खासदार सुजय विखे पाटील यांनी भेट देऊन केली व यावेळी या कामासाठी अधिकचा निधीची पूर्तता करण्याचेही चर्चा करताना सांगितले.
सांस्कृतिक भवनाची भेट देवून पाहणी करताना यावेळी सरपंच माधवराव चौधरी व सर्व ग्रामपंचायत सदस्य यांची सांस्कृतिक भवनाची व इतर विकास कामाची ही चर्चा झाली.त्यासाठी लागणाऱ्या निधीची तरतूद ही लवकरच होणार असल्याचे ही सांगितले.यावेळी सरपंच माधवराव चौधरी,ज्ञानेश्वर चौधरी,योगेश चौधरी,सोन्याबापू चौधरी,वीरेश चौधरी,सचिन मुरादे सागर गाडेकर इतर मान्यवर उपस्थित होते.




















