
आज राहता नगरपरिषदेमध्ये माननीय श्री विजू नाना सदाफळ यांनी उपनगराध्यक्ष पदाचा पदभार स्वीकारला त्यावेळी त्यांचा सत्कार करण्यात आला,त्यावेळी उपनगराध्यक्ष विजूभाऊ सदाफळ यांनी सांगितले की जनतेने माझ्यावर दाखविलेला विश्वासास मी तडा जाऊ देणार नाही.जलसंपदा तथा पालकमंत्री सन्माननीय श्री राधाकृष्ण विखे पाटील व खासदार सुजय दादा विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाने व सहकार्याने राहाता शहराचा विकास घडविण्यासाठी नगराध्यक्ष श्री डॉ स्वाधीन गाडेकर व सर्व नगरसेवकांच्या मदतीने सर्वतोपरी प्रयत्न करणार आहे.
राहाता शहराची जनता व विखे पाटील परिवारामुळे मला हा मान मिळाला आहे असेही त्यांनी मनोगत व्यक्त करताना सांगितले.
या वेळी भारतीय जनता पार्टीचे तालुका सर चिटणीस चेतन भाऊ गाडेकर ,हेमंत अनाप सर ,सुधीर भाऊ पुंड ,भीमा भाऊ निकाळे ,पत्रकार राजू भाई पठाण नगरसेवक अक्षय बोटे आणि नगरपालिकेचे कर्मचारी उपस्थित होते यावेळी त्यांचा सत्कार करून भावी वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या.यावेळी नगरसेवक अक्षय बोठे यांचाही सत्कार करून त्याना पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या.






















