इगतपुरी येथील खालची पेठ येथील रहिवाशी सौ कुलसुमबी इस्माईल शेख ( वय ७० वर्ष)यांचे हृदय विकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाल्यामुळे परिसरात शोककळा पसरली आहे.समाजसेवक हानिफ भाई शेख ,आरिफभाई शेख व जावेद भाई शेख यांच्या त्या आई होत.त्यांच्या पश्चात पती,तीन मुले,सुना,एक मुलगी,जावई व नातवंडे असा मोठा परिवार आहे.इगतपुरी येथील कब्रस्तान मध्ये त्यांच्या दफनविधी वेळेस नातेवाईक,व्यापारी,राजकीय,सामाजिक,शैक्षणिक स्तरातील नागरिक व स्थानिक ग्रामस्थ मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते.





















