योग प्राणायाम शिबिर उत्साहात संपन्न….
सालाबादप्रमाणे जागतिक योग दिनानिमित्त राहाता येथील साईयोग फाउंडेशन द्वारे आयोजित पाच दिवसीय मोफत योग प्राणायाम शिबिर उत्साहात संपन्न झाले.योगगुरू सुरेश भिंगारदिवे यांच्या मार्गदर्शनाखाली सावता महाराज मंदिर येथे दि १७- ६- २५ पासून पहाटे ५.३० ते ७ वाजेपर्यंत शिबिर आयोजित केले होते.
शनिवारी जागतिक योग दिनी शिबिराच्या समारोप प्रसंगी प्रांताधिकारी माणिक आहेर,राहाता नगरपालीकेचे मुख्याधिकारी वैभव लोंढे,नरेश राऊत फाऊंडेशनचे सचिव लक्ष्मणराव गोर्डे,नायब तहसीलदार हेमंत पाटील,सावता माळी पंच कमिटीचे अध्यक्ष मच्छिंद्र बनकर,राहाता प्रेस क्लबचे अध्यक्ष रामभाऊ लोंढे,धनंजय गाडेकर,दहेगावच्या सरपंच पूनम डांगे,राहाता नगरपालिकेचे माजी उपाध्यक्ष संजय सदाफळ,योगगुरू सुरेश भिंगारदिवे,भाऊसाहेब बनकर प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते.शिबिराच्या कालावधीत योगगुरू सुरेश भिंगारदिवे यांनी शास्त्रशुद्ध व सोप्या पद्धतीने योग प्राणायाम शिकविले.
समारोप प्रसंगी प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले.तसेच मान्यवरांच्या हस्ते सर्व अतिथींचा फेटा बांधून साईशाल व गुलाब पुष्प देऊन सत्कार करण्यात आला.साईयोग फाऊंडेशनचे जेष्ठ सदस्य बाळासाहेब गाडेकर यांनी सर्वांचे स्वागत केले.फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष डॉ बापूसाहेब पानगव्हाणे यांनी प्रस्तावना करताना सामाजिक कार्याला प्रशासकीय अधिकारी,राहाता नगरपालिकेचे सर्व नगराध्यक्ष,नगरसेवक, मुख्याधीकारी व सर्व ग्रामस्थांचे अनमोल.सहकार्य मिळत असल्याचे नमूद केले.तसेच पत्रकार व मीडिया बंधूंची शाबासकीची थाप ही ऊर्जा वाढविणारी बाब असून सर्वांचे आभार मानले.प्रांताधिकारी माणिक आहेर यांनी योगाचे महत्व विषद करत योगगुरू सुरेश भिंगारदिवे यांची योग शिकविण्याच्या सोप्या व शास्त्र शुद्ध पद्धतीची प्रशंसा करत याचा सर्वांनी फायदा घेत आपले जीवन सुखमय करावे असे आवाहन केले.मुख्याधिकारी वैभव लोंढे,रामभाऊ लोंढे,हेमंत पाटील,धनंजय गाडेकर, लक्ष्मण गोर्डे व सुश्मिताताई परमेश चव्हाण यांनी मनोगत व्यक्त करताना फाउंडेशनच्या योग,वृक्षारोपण व वृक्षसंवर्धन,स्वच्छता अभियान,शिर्डी साई सायकल परिक्रमा आदी अविरत सुरू असलेल्या सामाजिक कामांचे कौतुक केले.सामाजिक कार्यकर्ते दशरथ तुपे यांनी सर्वांचे आभार मानले.नरेश राऊत फाऊंडेशन तर्फे लक्ष्मणराव गोर्डे सर यांनी साईयोग फाउंडेशनच्या वृक्षारोपण कार्याला ११ हजार रुपये देणगी दिली.
याप्रसंगी दीपक गाडेकर,संजय बाबर,मनोज पिपाडा,विलास वाळेकर,प्रकाश पुंड,संदीप डांगे, ॲड दिगंबर धनवटे,ॲड गोरख दंडवते,बबलू फटांगरे,राजेंद्र बांगर,रवींद्र धस,अनिल सातव,अरविंद बावके,दीपक दंडवते,म्हसु पाटील सदाफळ,संजय वाघमारे,विठ्ठल निर्मळ,सीताराम बावके,व्यंकटेश अहिरे,शिवाजी पोटे,बबन लुटे,प्रकाश बेंद्रे,अंकुश गांधी,विष्णू गाडेकर,परमेश चव्हाण,सागर माळवे,रंगनाथ सदाफळ,मिलिंद बनकर,कैलास चेनुके,सचिन डांगे,पांडुरंग गायकवाड,नारायण गाडेकर,मेजर आप्पासाहेब माळवदे,सुभाष दंडवते,भागवत वाघमारे,अर्जुन चव्हाण,सार्थक तुपे,पोपट काळे,प्रशांत माळवे,डॉ अंजली पानगव्हाणे,सुष्मिता चव्हाण,उज्वला गाडेकर,नीलम चेनुके,पुष्पाताई सदाफळ,आशा पिपाडा,माधुरी बेंद्रे,माधुरी माळवे,गार्गी आहेर,साईशा चव्हाण,वैष्णवी पिपाडा,सुनीता बोबडे,स्नेहल भागवत,दिव्या बाबर,ज्ञानेश्वर जाधव,डॉ ज्ञानदेव गाडेकर,प्रणव लावर आदी मान्यवर उपस्थित होते




















