Homeताज्या बातम्याश्री साईबाबा संस्थान ट्रस्ट तर्फे सामुदायिक विष्णू सहस्रनाम स्तोत्र पठण उपक्रमास प्रारंभ—गोरक्ष...

श्री साईबाबा संस्थान ट्रस्ट तर्फे सामुदायिक विष्णू सहस्रनाम स्तोत्र पठण उपक्रमास प्रारंभ—गोरक्ष गाडिलकर ( मुख्य कार्यकारी अधिकारी साई संस्थान )

श्री साईबाबा संस्थान ट्रस्ट तर्फे सामुदायिक विष्णू सहस्रनाम स्तोत्र पठण उपक्रमास प्रारंभ
शिर्डी, दि. १८ फेब्रुवारी २०२६:
श्री साईचरित्र या पवित्र ग्रंथामध्ये विष्णू सहस्रनाम स्तोत्र पठणाचे महत्त्व अत्यंत स्पष्टपणे वर्णन करण्यात आले आहे. या स्तोत्राच्या नियमित जपाने मनःशांती, आध्यात्मिक उन्नती आणि ईश्वरकृपा प्राप्त होते, असे सांगितले गेले आहे. या आध्यात्मिक परंपरेच्या जतन व संवर्धनासाठी श्री साईबाबा संस्थान ट्रस्ट तर्फे साईभक्तांसाठी विविध उपक्रम सातत्याने राबविण्यात येत आहेत.
श्री साईबाबा समाधी मंदिर येथे दररोज सकाळी ६.०० वाजता श्रींच्या मंगलस्नानानंतर विष्णू सहस्रनाम स्तोत्राचे ध्वनिमुद्रित (रेकॉर्डिंग) पठण प्रसारित केले जाते. या उपक्रमामुळे मंदिर परिसरात भक्तिमय वातावरण निर्माण होत असून उपस्थित साईभक्तांना सामूहिक नामस्मरणाचा लाभ मिळत आहे.
संस्थानामार्फत पूर्वीपासूनच विष्णू सहस्रनाम स्तोत्र या पोथीचे प्रकाशन करण्यात आले असून, ती पोथी साईभक्तांना अत्यंत अल्प दरात प्रकाशन विभागामार्फत उपलब्ध करून देण्यात येत आहे. अनेक साईभक्त या पोथीच्या माध्यमातून घरी तसेच मंदिरात नियमित पठण करीत आहेत.
या आध्यात्मिक परंपरेला अधिक बळकटी देण्यासाठी संस्थानने आणखी एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. श्री साईबाबा संस्‍‍थानचे साईनाथ मंगल कार्यालय (पहिला मजला) येथे दि. १९ फेब्रुवारी २०२६ पासून दररोज सकाळी ०८.०० ते ११.०० या वेळेत सामुदायिक विष्णू सहस्रनाम स्तोत्र पठण उपक्रमाचा प्रारंभ करण्यात येणार आहे. या सामुदायिक पठणामध्ये साईभक्तांना सक्रिय सहभाग घेता येणार असून इच्छुक साईभक्त नियमितपणे सहभागी होऊ शकतील.
या उपक्रमामुळे भक्तांमध्ये एकात्मता, श्रद्धा आणि सामूहिक साधनेची भावना अधिक दृढ होईल, असा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे. संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर (भा.प्र.से.) यांनी सर्व साईभक्तांना या पवित्र उपक्रमात सहभागी होऊन विष्णू सहस्रनामाच्या जपातून आध्यात्मिक लाभ घ्यावा, असे आवाहन केले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

आजची इजिप्शियन म्हण: “स्नानगृहात प्रवेश करणे म्हणजे ते सोडण्यासारखे नाही.” |

दिवसाची इजिप्शियन म्हण (गुगल मिथुनद्वारे व्युत्पन्न केलेली प्रतिमा) तुम्ही थांबून क्षणभर त्यांचा विचार करेपर्यंत काही नीतिसूत्रे अनाकलनीय वाटतात."स्नानगृहात प्रवेश करणे म्हणजे ते सोडण्यासारखे...

सायबर फसवणूक पीडितांना प्रत्येक खेचर खात्यातून 50 हजारांपर्यंत पैसे मिळू शकतात

बनावट स्टॉक ट्रेडिंग ॲप्लिकेशनद्वारे गुंतवणूक करण्याचे आमिष दाखवणाऱ्या सायबर घोटाळेबाजांकडून तेल्लापूर येथील एका ४७ वर्षीय सॉफ्टवेअर इंजिनीअरने ३.२६ कोटी रुपये गमावले आहेत. पीडितेने...

64 धावांची हॅमरिंग! दीप्ती शर्मा आणि ऋचा घोष यांनी पाकिस्तानला बुडविले कारण भारताने टी-२०...

दीप्ती शर्माने ICC महिला T20 विश्वचषक, बर्मिंघम, इंग्लंड येथे भारत आणि पाकिस्तान यांच्यातील गट 1 क्रिकेट सामन्यादरम्यान पाकिस्तानच्या नतालिया परवेझला धावबाद करण्याचा प्रयत्न...

शहराचे रक्षण करणाऱ्यांसाठी घर: पश्चिम बंगालच्या प्रत्याशा गृहनिर्माण योजनेचे स्पष्टीकरण

पश्चिम बंगालमधील हजारो पोलिस कर्मचाऱ्यांसाठी घर घेणे हे फार पूर्वीपासून दूरचे ध्येय राहिले आहे. राज्य सरकारची प्रत्याशा योजना हे बदलण्यासाठी तयार करण्यात...

जगातील सर्वात लांब साप आणि जेथे प्रवासी त्यांना पाहू शकतात

या यादीत पुढे हिरवा ॲनाकोंडा आहे जो जाळीदार अजगरापेक्षा थोडा लहान आहे. हा जगातील सर्वात वजनदार साप म्हणून प्रसिद्ध आहे. त्यापैकी, प्रौढ महिला मोठ्या...

error: Content is protected !!