Homeताज्या बातम्याशिर्डी – श्री साईबाबा संस्‍थान विश्‍वस्‍तव्‍यवस्‍था, शिर्डीच्‍या वतीने नाताळ सुट्टी, चालु वर्षाला...

शिर्डी – श्री साईबाबा संस्‍थान विश्‍वस्‍तव्‍यवस्‍था, शिर्डीच्‍या वतीने नाताळ सुट्टी, चालु वर्षाला निरोप व नवीन वर्षाचे स्‍वागता निमित्‍त आयोजित करण्‍यात आलेल्‍या दि. २५ डिसेंबर २०२५ ते ०१ जानेवारी २०२६ शिर्डी महोत्‍सवाची तयारी पुर्ण झाली असुन यानिमित्‍ताने दि. ३० डिसेंबर २०२५ ते ०१ जानेवारी २०२६ अखेर ०३ दिवस विविध सांस्‍कृतिक व धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन

शिर्डी –
श्री साईबाबा संस्‍थान विश्‍वस्‍तव्‍यवस्‍था, शिर्डीच्‍या वतीने नाताळ सुट्टी, चालु वर्षाला निरोप व नवीन वर्षाचे स्‍वागता निमित्‍त आयोजित करण्‍यात आलेल्‍या दि. २५ डिसेंबर २०२५ ते ०१ जानेवारी २०२६ शिर्डी महोत्‍सवाची तयारी पुर्ण झाली असुन यानिमित्‍ताने दि. ३० डिसेंबर २०२५ ते ०१ जानेवारी २०२६ अखेर ०३ दिवस विविध सांस्‍कृतिक व धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्‍यात आले असल्‍याची माहिती संस्‍थानचे मुख्‍य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर यांनी दिली. श्री. गाडीलकर म्‍हणाले, दरवर्षी नाताळ सुट्टी, चालू वर्षाला निरोप व नवीन वर्षाचे स्‍वागता निमित्‍त श्रींच्‍या दर्शनासाठी शिर्डीत मोठ्या प्रमाणात भाविक येत असतात. संस्‍थानकडे शिर्डी महोत्‍सवाकरीता वेगवगळया ठिकाणांहुन येणा-या ५३ पालख्‍यांनी नोंदणी केलीली आहे. या येणा-या साईभक्‍तांची होणारी संभाव्‍य गर्दी लक्षात घेवून मंदिर परिसरात तसेच अतिरिक्‍त निवासव्‍यवस्‍थेसाठी साईधर्मशाळा व भक्‍तनिवासस्‍थान (५०० रुम) या ठिकाणी ४६ हजार चौरस फुटाचे मंडप उभारण्‍यात आलेले आहे.

साईभक्‍तांकरीता सुमारे १२० क्विंटल साखरेचे मोफत बुंदी प्रसाद पाकीटे व सुमारे ४०० क्विंटल साखरेचे मोतीचूर लाडू प्रसाद पाकीटे तयार करण्‍यात येणार असून उत्‍सव कालावधीत भक्‍तांना प्रसाद लाडू पॅकेट सहजतेने उपलब्‍ध व्‍हावे यासाठी नविन दर्शन रांग, श्री साईनाथ मंगल कार्यालय, व्‍दारकामाई समोरील खुले नाट्यगृह, मारुती मंदिरा शेजारी साईकॉम्‍प्‍लेक्‍स, गेट नंबर ०४ चे आतील बाजू, श्री साईप्रसादालय, सेवाधाम इमारत, व सर्व निवासस्‍थाने आदी ठिकाणी लाडू विक्री केंद्र उभारण्‍यात आलेले आहेत. तसेच आवश्‍यकता भासल्‍यास अतिरिक्‍त लाडू विक्री केंद्र उभारण्‍याचे नियोजन करण्‍यात आलेले आहे. तसेच दर्शनरांगेत व परिसरात भक्‍तांना चहा, कॉफी, दुध व मिनीरल वॉटर सुलभतेने मिळावे यासाठी साई कॉम्‍प्‍लेक्‍स, साईआश्रम भक्‍तनिवास, साईआश्रम धर्मशाळा, भक्‍तनिवासस्‍थान (५००रुम), व्‍दारावती भक्‍तनिवासस्‍थान तसेच साई उद्यान इमारत परिसर, नविन दर्शन रांग इमारत, शांतीनिवास इमारतीतील दर्शनरांग येथे अतिरिक्‍त व्‍यवस्‍था करण्‍यात आली आहे.

याकालावधीत भक्‍तांच्‍या आरोग्‍य सुविधेसाठी विविध ठिकाणी प्रथमोपचार केंद्राची व्‍यवस्‍था करण्‍यात येणार असुन तातडीचे सेवेसाठी रुग्‍णवाहीका तैनात ठेवण्‍यात येणार आहे. तसेच सुरक्षेकामी पोलिस निरिक्षक, पोलिस उपनिरिक्षक, पोलिस कर्मचारी, एक शिघ्र कृतीदल पथक, एक बॉम्‍ब शोधक पथक तैनात असून बंदोबस्‍तासाठी अतिरिक्‍त पोलिस निरिक्षक, सहाय्यक पोलिस निरिक्षक, पुरुष पोलिस कर्मचारी व महिला पोलिस कर्मचारी तैनात करण्‍यात येवून याव्‍यतिरिक्‍त संस्‍थानचे पोलिस निरिक्षक व सुरक्षा कर्मचारी असे एकुण १००० हून अधिक कर्मचारी कार्यरत राहणार आहे.
बुधवार दिनांक ३१ डिसेंबर २०२५ रोजी समाधी मंदिर साईभक्‍तांना दर्शनासाठी रात्रभर उघडे राहणार असल्‍यामुळे या दिवशी रात्रौ १०.०० वाजता होणारी शेजारती व दिनांक ०१ जानेवारी २०२६ रोजीची पहाटे ०५.१५ वाजताची काकड आरती होणार नाही. नाताळ सुट्टी, चालु वर्षाला निरोप व नवीन वर्षाचे स्‍वागता निमित्‍त आयोजित करण्‍यात आलेल्‍या विविध सां‍स्‍कृतिक कार्यक्रमांची रुपरेषा पुढिलप्रमाणे दि. ३० डिसेंबर रोजी सकाळी १०.०० ते ११.३० यावेळेत श्री. प्रविण महामुनी, शिर्डी यांचा एक शाम साई के नाम हा कार्यक्रम, दुपारी ०१.०० ते ०३.०० यावेळेत भजन सम्राट, श्री नाना वीर, शिर्डी यांचा साईंची भजने हा कार्यक्रम, दुपारी ०३.३० ते ०५.३० वा. श्री. लक्ष चावला, हरियाणा यांचा साईभजन संध्‍या कार्यक्रम, सायं. ०७.०० ते ०९.३० यावेळेत साई सुमिरण वाद्य वृंद, बोरिवली (पुर्व) यांचा साई सुमिरन हा कार्यक्रम, दि. ३१ डिसेंबर २०२५ रोजी सकाळी १०.३० ते ११.३० यावेळेत श्री दासगणु महाराज जयंती निमित्‍त सामुहिक स्‍तवन मंजरी वाचन, दुपारी ०१.०० ते ०३.०० वा.सारेगमप ऑर्केस्‍ट्रा, संगमनेर यांचा साईभजन संध्‍या, दुपारी ०३.३० ते ०५.३० वा. साई स्‍वरांजली म्‍युझिकल ग्रुप, नागपुर यांचा साई भजन संध्‍या कार्यक्रम, सायं. ०७.०० ते ०९.०० यावेळेत ह.भ.प. सोनाली दिदी करपे, नांदेड यांचा किर्तन सेवा कार्यक्रम, रात्रौ. १०.३० ते १२.०० यावेळेत जगदिश पाटील, ठाणे (वेस्‍ट) यांचा साई पालखीची भजने, तसेच दि. ०१ जानेवारी २०२६ रोजी सकाळी १०.०० ते ११.३० वा. श्री मिनू सचदेवा, साई आशिर्वाद ग्रुप, लखनऊ यांचा साईभजन संध्‍या कार्यक्रम, दुपारी ०१.०० ते ०३.०० वा. आर. डी. म्‍युझीक अकॅडमी, श्रीरामपुर यांचा साईभजन संध्‍या कार्यक्रम, दुपारी ०३.३० ते ०५.३० वा. शुभम कुमार गुप्‍ता, मिर्झापुर यांचा साईभजन संध्‍या कार्यक्रम व सायं. ०७.०० ते ०९.३० यावेळेत श्री पारस जैन, शिर्डी यांचा साईंची भजने आदी कार्यक्रमांचे आयोजन करण्‍यात आलेले आहे. हे सर्व कार्यक्रम हनुमान मंदिराशेजारील श्री साईबाबा समाधी मंदिर शताब्‍दी मंडपातील स्‍टेजवर होणार असल्‍याचे सांगुन शिर्डी महोत्‍सवानिमित्‍ताने आयोजित करण्‍यात आलेल्‍या साईभजन संध्‍या कार्यक्रमांचा जास्‍तीत-जास्‍त साईभक्‍त व श्रोत्‍यांनी लाभ घ्‍यावा, असे आवाहन श्री गाडीलकर यांनी केले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

आजची इजिप्शियन म्हण: “स्नानगृहात प्रवेश करणे म्हणजे ते सोडण्यासारखे नाही.” |

दिवसाची इजिप्शियन म्हण (गुगल मिथुनद्वारे व्युत्पन्न केलेली प्रतिमा) तुम्ही थांबून क्षणभर त्यांचा विचार करेपर्यंत काही नीतिसूत्रे अनाकलनीय वाटतात."स्नानगृहात प्रवेश करणे म्हणजे ते सोडण्यासारखे...

सायबर फसवणूक पीडितांना प्रत्येक खेचर खात्यातून 50 हजारांपर्यंत पैसे मिळू शकतात

बनावट स्टॉक ट्रेडिंग ॲप्लिकेशनद्वारे गुंतवणूक करण्याचे आमिष दाखवणाऱ्या सायबर घोटाळेबाजांकडून तेल्लापूर येथील एका ४७ वर्षीय सॉफ्टवेअर इंजिनीअरने ३.२६ कोटी रुपये गमावले आहेत. पीडितेने...

64 धावांची हॅमरिंग! दीप्ती शर्मा आणि ऋचा घोष यांनी पाकिस्तानला बुडविले कारण भारताने टी-२०...

दीप्ती शर्माने ICC महिला T20 विश्वचषक, बर्मिंघम, इंग्लंड येथे भारत आणि पाकिस्तान यांच्यातील गट 1 क्रिकेट सामन्यादरम्यान पाकिस्तानच्या नतालिया परवेझला धावबाद करण्याचा प्रयत्न...

शहराचे रक्षण करणाऱ्यांसाठी घर: पश्चिम बंगालच्या प्रत्याशा गृहनिर्माण योजनेचे स्पष्टीकरण

पश्चिम बंगालमधील हजारो पोलिस कर्मचाऱ्यांसाठी घर घेणे हे फार पूर्वीपासून दूरचे ध्येय राहिले आहे. राज्य सरकारची प्रत्याशा योजना हे बदलण्यासाठी तयार करण्यात...

जगातील सर्वात लांब साप आणि जेथे प्रवासी त्यांना पाहू शकतात

या यादीत पुढे हिरवा ॲनाकोंडा आहे जो जाळीदार अजगरापेक्षा थोडा लहान आहे. हा जगातील सर्वात वजनदार साप म्हणून प्रसिद्ध आहे. त्यापैकी, प्रौढ महिला मोठ्या...

error: Content is protected !!