Homeआरोग्यशिर्डी:श्री साईबाबा हॉस्पिटल मध्ये १५ किलो वजनाची गाठ काढून यशस्वी शस्त्रक्रिया

शिर्डी:श्री साईबाबा हॉस्पिटल मध्ये १५ किलो वजनाची गाठ काढून यशस्वी शस्त्रक्रिया

शिर्डी : श्री साईबाबा हॉस्पिटलमध्ये 15 किलो वजनाची गाठ काढून यशस्वी शस्त्रक्रिया
शिर्डीतील श्री साईबाबा संस्थान संचलित श्री साईबाबा हॉस्पिटल येथे जनरल सर्जरी विभागात अत्यंत जटिल व धाडसी शस्त्रक्रिया यशस्वीरीत्या पार पडली. सुमारे 32 सेंटीमीटर आकाराची आणि अंदाजे 15 किलो वजनाची पोटातील गाठ रुग्णाच्या शरीरातून सुरक्षितपणे काढण्यात आली. सध्या रुग्णाची प्रकृती समाधानकारक असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली.
जळगाव येथील मायाबाई राठोड (वय 46) या गेल्या तीन वर्षांपासून पोटाच्या गंभीर आजाराने त्रस्त होत्या. विविध ठिकाणी उपचार करूनही अपेक्षित लाभ न झाल्याने त्यांनी शिर्डी येथे उपचारासाठी धाव घेतली. जनरल सर्जन डॉ. रणजीत भोजने यांनी तपासणीनंतर तातडीने शस्त्रक्रियेचा निर्णय घेतला.
डॉ. रणजीत भोजने यांच्या नेतृत्वाखाली तसेच भूलतज्ज्ञ डॉ. संतोष सुरवसे यांच्या मार्गदर्शनाखाली ही शस्त्रक्रिया यशस्वीरीत्या पूर्ण करण्यात आली. जनरल ओटी विभागातील विद्या कदम, निलेश रावस, शहनाज पठाण, योगिता डालोरे, बाळासाहेब मोगल, गौतम मोकळ, रवी निर्मळ, बाळू डांगे या प्रशिक्षित वैद्यकीय व सहाय्यक कर्मचाऱ्यांच्या अचूक नियोजन व आधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने ही अवघड शस्त्रक्रिया पार पडली.

सदर शस्त्रक्रिया आयुष्यमान भारत योजनेअंतर्गत पूर्णपणे मोफत करण्यात आली असून रुग्णाच्या प्रकृतीत लक्षणीय सुधारणा झाली आहे. रुग्ण व त्यांच्या कुटुंबीयांनी समाधान व्यक्त केले आहे.
या यशस्वी शस्त्रक्रियेबद्दल संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर, उपमुख्य कार्यकारी अधिकारी भीमराज दराडे, वैद्यकीय संचालक डॉ. शैलेश ओक तसेच उपवैद्यकीय संचालक डॉ. प्रीतम वडगावे यांनी वैद्यकीय पथकाचे अभिनंदन केले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

10 लहान मुलाची नावे जी अमर्यादतेचे प्रतीक आहेत

बाळाचे नाव निवडणे हे पालकांनी घेतलेल्या सर्वात अर्थपूर्ण निर्णयांपैकी एक आहे. अनेक कुटुंबे सकारात्मक आणि प्रेरणादायी अर्थ असलेली नावे शोधतात, या आशेने की नाव...

पुण्याच्या पुरंदर विमानतळाच्या जमिनीसाठी ७०% संमती, मुदतवाढीचा निर्णय प्रलंबित

पुणे : प्रस्तावित पुरंदर आंतरराष्ट्रीय विमानतळासाठी भूसंपादन संमती प्रक्रिया 70% पर्यंत पोहोचली आहे, प्रकल्पासाठी आवश्यक असलेल्या एकूण 1,285 हेक्टरपैकी सुमारे 851 हेक्टरसाठी...

अर्जेंटिनाच्या फिफा विश्वचषक विजेतेपदाच्या बचावापूर्वी लिओनेल मेस्सीचा पासपोर्ट तपशील लीक झाला आहे | फुटबॉल...

नवी दिल्ली: FIFA विश्वचषक 2026 च्या अर्जेंटिनाच्या तयारीवर सुरक्षेतील त्रुटी आढळून आल्याने कर्णधार लिओनेल मेस्सीसह संघातील प्रत्येक खेळाडूचा पासपोर्ट तपशील उघड झाला.रॉयटर्सच्या...

वैभव सूर्यवंशी : संवेदनामागील त्याग आणि वडिलांनी सोडलेली वडिलोपार्जित जमीन

वैभव सूर्यवंशी आणि त्यांचे वडील संजीव सूर्यवंशी (इमेज क्रेडिट: विशेष व्यवस्था) नवी दिल्ली: बॅटिंग सेन्सेशन वैभव सूर्यवंशी यांचा जन्म होण्याच्या खूप आधी, त्याचे...

त्या दिवसाची स्पॅनिश म्हण: “स्त्री जितकी तिच्या चेहऱ्याची प्रशंसा करते तितकी ती तिचा नाश...

दिवसाची स्पॅनिश म्हण (गुगल मिथुनद्वारे व्युत्पन्न केलेली प्रतिमा) काही म्हणी सल्ल्यासारख्या कमी आणि वेगळ्या समाजव्यवस्थेतील उरलेल्या तुकड्यांसारख्या वाटतात. ही स्पॅनिश म्हण त्यापैकी एक...

error: Content is protected !!