शारदा कन्या विद्या मंदिर येथे गणित विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन केले.
आज शनिवार दिनांक 15 नोव्हेंबर 2025 रोजी रयत शिक्षण संस्थेचे शारदा कन्या विद्या मंदिर राहतात या ठिकाणी विज्ञान गणित प्रदर्शन आयोजन करण्यात आले. सदर प्रदर्शनासाठी पाचवी ते दहावी तील एकूण 70 विद्यार्थिनींनी सहभाग नोंदवला या प्रदर्शनासाठी शेती संशोधन त्याचप्रमाणे आरोग्य ,स्वच्छता, आपत्ती व्यवस्थापन अशा प्रकारचे विषय निवडून विद्यार्थिनींनी वेगवेगळ्या प्रकारचे उपकरणे तसेच मॉडेल तयार केले. वैज्ञानिक दृष्टिकोन रुजविण्याचे महत्त्वाचे कार्य या वैज्ञानिक प्रदर्शनातून केले जाते. सदर प्रदर्शनासाठी आदरणीय श्री नानासाहेब मते जनरल बॉडी सदस्य रयत शिक्षण संस्था सातारा ही या प्रदर्शनासाठी उपस्थित होते यांनी वैज्ञानिक उपकरणांचे महत्त्व उद्दिष्टे हेतू मुलींना समजावून सांगितले व प्रदर्शनात मांडलेल्या उपकरणांची माहिती घेतली, शारदा शैक्षणिक संकुलाचे मार्गदर्शक श्री रमेश भाऊ शिंदे पाटील तसेच शारदा शारदा संकुलाचे प्राचार्य श्री अनिल बनसोडे तसेच शारदा कन्या विद्या मंदिर च्या मुख्याध्यापिका सौ गुंजाळ मॅडम यांनी मार्गदर्शन केले सदर प्रदर्शनासाठी शारदा कन्या विद्यालयाचे जेष्ठ शिक्षक साळवे सर तसेच विज्ञान व गणित विषय शिक्षिका सातव मॅडम कारभारी मॅडम या उपस्थित होत्या व विभाग प्रमुख श्रीमती पठाण मॅडम यांनी कार्यक्रमाचे आभार मानले.




















