Homeताज्या बातम्यालोणी खुर्द ग्रामपंचायतीकडून थकीत घरपट्टी व पाणीपट्टीत ५० टक्के सवलत ग्रामस्थांचा उत्स्फूर्त...

लोणी खुर्द ग्रामपंचायतीकडून थकीत घरपट्टी व पाणीपट्टीत ५० टक्के सवलत ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद; ग्रामपंचायत कार्यालयात नागरिकांची मोठी गर्दी

लोणी खुर्द ग्रामपंचायतीकडून थकीत घरपट्टी व पाणीपट्टीत ५० टक्के सवलत

ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद; ग्रामपंचायत कार्यालयात नागरिकांची मोठी गर्दी

लोणी खुर्द (ता. राहाता | जि. अहिल्यानगर):
राज्य शासनाच्या “मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान” अंतर्गत लोणी खुर्द ग्रामपंचायतीने थकित घरपट्टी व पाणीपट्टीवर ५० टक्के सवलत जाहीर केली असून, या लोकहितकारी निर्णयाला ग्रामस्थांकडून मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळत आहे. सवलत जाहीर होताच थकबाकीदार नागरिक मोठ्या संख्येने ग्रामपंचायत कार्यालयात हजेरी लावत असून, दिवसभर कार्यालयात गर्दीचे वातावरण पाहायला मिळत आहे.

या सवलत योजनेमुळे अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेली थकीत घरपट्टी व पाणीपट्टीची थकबाकी नागरिक स्वच्छेने भरत आहेत. परिणामी ग्रामपंचायतीच्या महसूल वसुलीत लक्षणीय वाढ होत असून ग्रामपंचायतीच्या आर्थिक स्थैर्यास चालना मिळत आहे. ग्रामस्थांनी दाखवलेली ही जबाबदारीची भावना ग्रामविकासाच्या दृष्टीने सकारात्मक ठरत आहे.

ही सवलत ३१ डिसेंबर २०२५ पर्यंत लागू असून, अद्याप थकबाकी असलेल्या सर्व मिळकतधारक व नागरिकांनी दिलेल्या मुदतीत थकबाकी भरून या सवलतीचा लाभ घ्यावा, असे आवाहन सरपंच जनार्दन चंद्रभान घोगरे पा. व ग्रामपंचायत लोणी खुर्द यांच्या वतीने करण्यात आली आहे.

सरपंच जनार्दन घोगरे पा. यांनी दिलेल्या या लोकहितकारी सवलतीमुळे ग्रामस्थांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले असून, ग्रामस्थांनी या निर्णयाबद्दल समाधान व्यक्त करत त्यांचे आभार मानले आहेत. तसेच सरपंच, उपसरपंच, सर्व ग्रामपंचायत सदस्य व कर्मचारीवृंद यांनी नागरिकांनी दिलेल्या सकारात्मक प्रतिसादाबद्दल समाधान व्यक्त केले आहे.

ग्रामपंचायतीच्या विविध विकासकामांसाठी महसूल वेळेत जमा होणे आवश्यक असून, ग्रामस्थांनी यापुढेही असेच सहकार्य केल्यास लोणी खुर्द गावाचा सर्वांगीण विकास अधिक गतीने साध्य होईल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला आहे. या उपक्रमामुळे लोणी खुर्द ग्रामपंचायतीची आर्थिक शिस्त अधिक भक्कम होत असून, पारदर्शक कारभार व लोकसहभागातून राबविण्यात येणारा हा उपक्रम इतर ग्रामपंचायतींसाठीही प्रेरणादायी ठरत आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

दिवसाची ग्रीक म्हण: “जेव्हा तुम्ही अनेक चेरींबद्दल ऐकता, तेव्हा एक लहान टोपली धरा.” |

दिवसाची ग्रीक म्हण (AI-व्युत्पन्न प्रतिमा) जीवन, मानवी स्वभाव, नातेसंबंध आणि निर्णय घेण्याबद्दल व्यावहारिक शहाणपण देणारी ग्रीक नीतिसूत्रे शतकानुशतके पिढ्यान्पिढ्या पार केली गेली आहेत....

क्रॉसविंड्स हाताळण्यासाठी MSRDC eway च्या नवीन लिंक ब्रिजवर पवन अडथळे बसवते

टायगर व्हॅलीमध्ये पसरलेल्या 650 मीटर लांबीच्या केबल-स्टेड ब्रिजवर अडथळे उभारण्यात आल्याचे अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. पुणे : महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने (MSRDC) मुंबई-पुणे...

गिल्बर्टो मोरा कोण आहे? टीन सेन्सेशन बनली सहावी सर्वात तरुण खेळाडू, त्याने मोडला फिफा...

दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या विश्वचषक सामन्यादरम्यान मेक्सिकोचा १७ वर्षीय गिल्बर्टो मोरा चेंडूवर नियंत्रण ठेवतो. (एपी फोटो) FIFA विश्वचषक 2026 च्या सुरुवातीच्या रात्री Estadio Azteca येथे...

'पेड्डी' बॉक्स ऑफिस कलेक्शन दिवस 8: राम चरण चित्रपटात आणखी घसरण; जगभरात जवळपास रु...

राम चरणच्या स्पोर्ट्स ॲक्शन ड्रामा 'पेड्डी'ने थिएटरमध्ये आठ दिवस पूर्ण केल्यामुळे संकलनात आणखी एक घट झाली. दमदार ओपनिंग आठवड्यानंतर, चित्रपटाची रोजची कमाई...

आजची यहुदी म्हण: “जो तुम्हाला त्याचे सर्व त्रास सांगतो त्याच्यावर कधीही विश्वास ठेवू नका...

दिवसाची ज्यू म्हण (Google Gemini द्वारे व्युत्पन्न केलेली प्रतिमा) बहुतेक लोकांना असे कोणीतरी भेटले आहे.संभाषण सामान्यपणे सुरू होते. काही मिनिटांत, ते समस्यांकडे वळते:...

error: Content is protected !!