बातमी २ : सोन्याचा माणूस पण कान पितळाचे! सुजय दादांचा संघटनातील गटबाजीवर थेट प्रहार
भाजप कार्यकर्त्यांच्या बैठकीत खासदार सुजय दादा विखे पाटील यांनी संघटनेतील अंतर्गत गटबाजी आणि चुकीच्या सल्लागारांवर थेट प्रहार केला. त्यांनी स्पष्ट शब्दात म्हटलं, “लोकं म्हणतात — नामदार राधाकृष्ण विखे पाटिल हे माणूस सोन्याचा आहे पण कान पितळाचे आहेत. काही चुकीच्या माणसांच्या सांगण्यामुळे एकनिष्ठ कार्यकर्त्यांनाच त्रास सहन करावा लागला.”
दादांनी सांगितलं की, “विखे परिवाराला सर्वसामान्य लोकांपर्यंत कधी पोहोचूच दिलं नाही. काही ठराविक लोकांनी नेत्याभोवती कायम घेराव केला. पण आता ही साखळी तोडावी लागेल आम्ही आता थेट जनतेत जाऊ.
त्यांनी कार्यकर्त्यांना इशारा दिला की, “आमच्यातून गळती झाली की विरोधक त्यातूनच पॅनल तयार करतात. हा राहात्याचा जुना इतिहास आहे. पण आता गद्दारी करणाऱ्यांना संघटनेत स्थान मिळणार नाही. जो विखे परिवाराशी निष्ठावान आहे तोच पुढे राहील.”
सुजय दादांच्या या स्पष्ट वक्तव्यातून संघटनेतील शिस्त, आत्मपरीक्षण आणि जनतेशी थेट संवादाची दिशा दिसत आहे. त्यांच्या शब्दांनी कार्यकर्त्यांमध्ये ऊर्जा निर्माण केली असून, राहाता-शिर्डीतील आगामी निवडणुका विखे परिवारासाठी निर्णायक ठरणार असल्याचे चित्र स्पष्ट होत आहे.




















