काल झालेल्या मुसळधार पावसामुळे आज डॉ.राजेंद्र पिपाडा यांनी राहाता शिर्डी व परिसरातील ओढा-नाल्यांची पहाणी केली. अत्यंत मुसळधार स्वरुपाच्या पावसामुळे परिसरातील जनजीवन विस्कळीत झाले आहे. यावेळी शिवाजी आनप, अनिलभाऊ पिपाडा, नेमीचंद लोढा, महावीर पिपाडा व नागरिक उपस्थित होते.
यावेळी राहाता शहरील छत्रपती व्यापारी संकुल, राहाता साकुरीला जोडणारा पुल, रांजणगाव रोड साई कॉलनी, राष्ट्रीय महामार्गलगत शिरकांडे ओढा इत्यादी ठिकाणी पहाणी केली. यावेळी नागरीकांना काळजी घेण्याचे आवाहन करताना डॉ. राजेंद्र पिपाडा म्हणाले की, राहाता एखरुखे,केलवड,गणेशनगर,शिर्डी सर्वत्रच परिसरामध्ये मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे. ओढे नाले मोठ्या प्रमाणावर वाहत आहे सर्वसामान्य जनतेने ओढे नाले ओलांडताना काळजी घ्यावी. गरज असेल तरच घराबाहेर पडावे,लहान मुले वयस्कर नागरीकांची काळजी घ्यावी,अजुनही पावासाची शक्यता सांगितल्यामुळे सर्वांनी सतर्क रहावे असे आवाहन केले.




















