Homeताज्या बातम्यामहाराष्ट्राचा आपला ‘दादा’ हरपला – सौ. प्रभावती घोगरे

महाराष्ट्राचा आपला ‘दादा’ हरपला – सौ. प्रभावती घोगरे

राहाता | प्रतिनिधी
तालुक्यातील लोणी खुर्द येथे महाराष्ट्राचे ज्येष्ठ नेते व उपमुख्यमंत्री मा. अजितदादा पवार यांच्या दुःखद निधनामुळे संपूर्ण राज्यात शोककळा पसरली आहे. या दुःखद घटनेचे तीव्र पडसाद लोणी खुर्द गावातही उमटले. या पार्श्वभूमीवर लोणी खुर्द गाव बंद ठेवून ग्रामस्थांच्या वतीने श्रद्धांजली कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
या कार्यक्रमात माननीय अजितदादा पवार यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून उपस्थितांनी भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली. यावेळी गावातील विविध राजकीय व सामाजिक पदाधिकारी, कार्यकर्ते, युवक तसेच ज्येष्ठ नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. संपूर्ण परिसरात शोकाकुल वातावरण निर्माण झाले होते.
याप्रसंगी बोलताना महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसच्या सरचिटणीस सौ. प्रभावती घोगरे म्हणाल्या, “महाराष्ट्राचा आपला ‘दादा’ आज आपल्यातून निघून गेला आहे. सामान्य माणसाच्या प्रश्नांसाठी ठामपणे उभे राहणारे, निर्णयक्षम आणि विकासाभिमुख नेतृत्व म्हणून अजितदादा पवार यांची ओळख होती. त्यांच्या जाण्याने राज्याच्या राजकारणात मोठी पोकळी निर्माण झाली आहे.”
लोणी खुर्दचे सरपंच श्री. जनार्दन घोगरे यांनी आपल्या भावना व्यक्त करताना सांगितले, “अजितदादा पवार हे पुरोगामी विचारांचे नेतृत्व होते. महात्मा फुले, छत्रपती शाहू महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारधारांवर विश्वास ठेवून त्यांनी सामाजिक न्याय व सर्वसमावेशक विकासासाठी सातत्याने कार्य केले. त्यांचे नेतृत्व कायम प्रेरणादायी राहील.”
कार्यक्रमादरम्यान युवक कार्यकर्ते, ज्येष्ठ नागरिक व ग्रामस्थांनी अजितदादांच्या आठवणींना उजाळा देत आपल्या भावना व्यक्त केल्या. महाराष्ट्राने एक कर्तृत्ववान, जनतेचा नेता गमावल्याची भावना प्रत्येकाच्या मनात स्पष्टपणे दिसून येत होती.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

“मुले रडत नाहीत” कदाचित आपल्या मुलांना आपल्या लक्षात येण्यापेक्षा जास्त त्रास होत असेल; 5...

एक लहान मुलगा एका संध्याकाळी त्याच्या आईकडे पाहतो आणि विचारतो, "आई, लोक मला सांगतात की मुले रडू नका. म्हणून मी रडलो तर मी अशक्त...

तळेगाव मंदिरात 1.3 किलोचा चांदीचा मुकुट पुन्हा चोरीला गेला

पुणे23 मे रोजी तळेगाव दाभाडे येथील मंदिरातून चोरट्यांनी पहिल्यांदा तुळजाभवानी देवीचा 1.3 किलो वजनाचा चांदीचा मुकुट चोरला.एका अज्ञात व्यक्तीने भक्त असल्याचे भासवून...

एजबॅस्टनचा इतिहास! भारत-पाकिस्तानने मोडला महिला T20 विश्वचषकातील विक्रम | क्रिकेट बातम्या

भारताच्या स्मृती मानधनाने तिची अर्धशतक पूर्ण केली (AP/PTI) एजबॅस्टन येथे रविवारी भारत आणि पाकिस्तान यांच्यातील ब्लॉकबस्टर चकमकीने केवळ भारतीय विजय मिळवून दिला नाही...

ट्रम्प यांनी इराण करार पूर्ण झाल्याची घोषणा केल्याने तेलाच्या किमती घसरल्या; ब्रेंट प्रति बॅरल...

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणसोबतचा करार "पूर्ण" घोषित केल्यानंतर आणि जागतिक ऊर्जा पुरवठ्यासाठी महत्त्वाची धमनी असलेल्या "होर्मुझची सामुद्रधुनी त्वरित टोल-फ्री पुन्हा...

आजची इजिप्शियन म्हण: “स्नानगृहात प्रवेश करणे म्हणजे ते सोडण्यासारखे नाही.” |

दिवसाची इजिप्शियन म्हण (गुगल मिथुनद्वारे व्युत्पन्न केलेली प्रतिमा) तुम्ही थांबून क्षणभर त्यांचा विचार करेपर्यंत काही नीतिसूत्रे अनाकलनीय वाटतात."स्नानगृहात प्रवेश करणे म्हणजे ते सोडण्यासारखे...

error: Content is protected !!