Homeताज्या बातम्यामतदारयादी पुनरीक्षण कार्यक्रम काटेकोरपणे राबवा - मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोक्कलिंगम

मतदारयादी पुनरीक्षण कार्यक्रम काटेकोरपणे राबवा – मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोक्कलिंगम

मतदारयादी पुनरीक्षण कार्यक्रम काटेकोरपणे राबवा – मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोक्कलिंगम

शिर्डी, दि. १ : आगामी राहुरी विधानसभा पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मतदारयादीचे काम अत्यंत अचूक व पारदर्शक पद्धतीने होणे आवश्यक आहे. यासाठी मतदारयादी पुनरीक्षण कार्यक्रम काटेकोरपणे राबवून विहित वेळेत अंतिम मतदारयादी निर्दोष प्रसिद्ध करावी, अशा सूचना राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोक्कलिंगम यांनी दिल्या.

शिर्डी येथे ‘ २२३ – राहुरी विधानसभा ‘ मतदारसंघाची पोटनिवडणूक व विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रमाच्या अनुषंगाने आयोजित आढावा बैठकीत ते बोलत होते. याप्रसंगी जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया, उपजिल्हा निवडणूक अधिकारी दत्तात्रय कवितके, शिर्डीचे उपविभागीय अधिकारी माणिक आहेर यांच्यासह जिल्ह्यातील सर्व मतदार नोंदणी अधिकारी आणि सहायक मतदार नोंदणी अधिकारी उपस्थित होते.

श्री. चोक्कलिंगम म्हणाले, सध्याच्या मतदारयादीतील नावांचे २००२ च्या यादीशी जास्तीत जास्त ‘मॅपिंग’ करून घ्यावे, जेणेकरून भविष्यात केवळ उर्वरित मतदारांचेच आवश्यक पुरावे घ्यावे लागतील. तसेच मतदारयादीतील दुबार नावे व ८५ वर्षांवरील मतदारांच्या नावांची तात्काळ पडताळणी करून याद्या अद्ययावत कराव्यात, असे त्यांनी सांगितले.

मतदारयादीत नाव समाविष्ट करणे, नाव वगळणे किंवा तपशीलात दुरुस्ती करणे यासाठी प्राप्त होणाऱ्या अर्जांवर वेळेतच निर्णय घेणे बंधनकारक आहे. विशेषतः राहुरी मतदारसंघासाठी जाहीर करण्यात आलेल्या संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रमादरम्यान येणाऱ्या अर्जांची योग्य ती पडताळणी करून अंतिम मतदारयादी निर्दोष प्रसिद्ध होईल, याची विशेष काळजी घेण्याच्या सूचनाही श्री.चोक्कलिंगम यांनी दिल्या.

यावेळी त्यांनी जिल्ह्यात आतापर्यंत झालेल्या कामाबाबत समाधान व्यक्त केले.

******

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

रुग्णसेवेचा वसा जपनारे मैड डॉक्टर कुटुंब:एकाध छताखाली ४ तज्ञ,राहत्याला मिळाला आरोग्याचा आधार

  रुग्णसेवेचा वसा जपणारे मैड डॉक्टर कुटुंब: एकाच छताखाली 4 तज्ञ, राहत्याला मिळाला आरोग्याचा आधार राहता, दि. 19: राहता तालुक्याच्या आरोग्य नकाशावर ठळकपणे नाव कोरलेले डॉ....

सामानात सॅटेलाइट फोन सापडल्याने दोन अमेरिकन नागरिकांना श्रीनगर विमानतळावर ताब्यात घेण्यात आले

श्रीनगर आंतरराष्ट्रीय विमानतळ (फाइल फोटो) नवी दिल्ली: दोन अमेरिकन नागरिकांना रविवारी श्रीनगर आंतरराष्ट्रीय विमानतळावर ताब्यात घेण्यात आले आणि नियमित तपासणीदरम्यान त्यांच्या सामानात सॅटेलाइट...

रस्त्यावर एका मोठ्या गेंडयाने लघवी केली आणि एका महिलेने जे केले ते इंटरनेट कधीही...

पहिल्या दृष्टीक्षेपात, व्हिडिओ AI-व्युत्पन्न दिसत आहे कारण दृश्य काहीसे अविश्वसनीय आहे. नेपाळमध्ये, नियंत्रित सफारी किंवा प्राणीसंग्रहालयाच्या वातावरणाच्या बाहेर, जगभरातील लोकांना गेंड्यांना वैयक्तिकरित्या...

जयंत पाटील यांच्या पुतण्याने राष्ट्रवादी काँग्रेस (एसपी) सोडण्याचे संकेत दिले आहेत, म्हणतात की आजच्या...

पुणे : राष्ट्रवादीचे माजी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांचे पुतणे आणि माजी आमदार प्राजक्त तनपुरे यांनी लवकरच पक्ष सोडून भाजपमध्ये प्रवेश करण्याचे संकेत...

error: Content is protected !!