Homeताज्या बातम्याप्रवरा बँकेच्या विळद घाट शाखेमुळे औद्योगिक व व्यापारी क्षेत्राला मिळणार आधार-राधाकृष्ण विखे...

प्रवरा बँकेच्या विळद घाट शाखेमुळे औद्योगिक व व्यापारी क्षेत्राला मिळणार आधार-राधाकृष्ण विखे पाटील (प्रवरा बँकेच्या विळद घाट शाखेचे उद्घाटन)

*प्रवरा बॅंकेच्या विळदघाट शाखेमुळे औद्योगिक व व्यापारी क्षेत्राला मिळणार आधार — राधाकृष्ण विखे पाटील*

प्रवरा बँकेच्या विळदघाट शाखेचे उद्घाटन

अहिल्यानगर, दि. २३ – सहकारी बँकिंग क्षेत्रात प्रवरा सहकारी बँकेने प्रगतीचा मोठा टप्पा गाठला आहे. विळदघाट येथे नव्याने सुरू झालेली बँकेची शाखा अहिल्यानगरच्या औद्योगिक व व्यावसायिक क्षेत्राच्या यशस्वी वाटचालीत महत्त्वपूर्ण भागीदारी करेल, असा विश्वास जलसंपदामंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी व्यक्त केला.

प्रवरा सहकारी बँकेच्या विळदघाट येथील नव्या शाखेचे उद्घाटन पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते झाले.त्यावेळी ते बोलत होते . याप्रसंगी सौ. शालिनी विखे पाटील, माजी आमदार नंदकुमार झावरे, वसंतराव कापरे, बँकेचे चेअरमन डॉ. भास्करराव खर्डे, व्हा. चेअरमन मच्छिद्र थेटे, सीईओ सौरभ बालोटे, संचालक मंडळातील सदस्य तसेच पद्मश्री डॉ. विखे पाटील फाउंडेशनचे डायरेक्टर डॉ. अभिजीत दिवटे, डॉ. पांडुरंग पवार व महाविद्यालयाचे प्राचार्य उपस्थित होते.

पालकमंत्री श्री.विखे पाटील म्हणाले, लोकनेते पद्मभूषण डॉ. बाळासाहेब विखे पाटील यांनी दूरदृष्टीने प्रवरा सहकारी बँकेची स्थापना केली. समाजातील कमी उत्पन्न गटाला विविध कर्ज योजनांद्वारे आधार देत बँकेने पन्नास वर्षांची यशस्वी वाटचाल पूर्ण केली असून आज सुमारे १४०० कोटी रुपयांचा व्यावसायिक टप्पा गाठला आहे.

विळदघाट शाखा अहिल्यानगरच्या व्यापारी, उद्योजक व छोट्या व्यावसायिकांसाठी आधार ठरेल. अहिल्यानगरच्या औद्योगिक व व्यापारी क्षेत्राला समृद्ध परंपरा लाभली आहे. नागापूर औद्योगिक वसाहतीच्या अगदी जवळ ही शाखा सुरू झाल्यामुळे उद्योजकांसाठी दैनंदिन आर्थिक व्यवहारांचे विश्वासार्ह ठिकाण निर्माण झाले आहे, असेही त्यांनी सांगितले.

बँकिंग क्षेत्रातील वाढती स्पर्धा लक्षात घेऊन ग्राहकांच्या व उद्योजकांच्या अपेक्षा जाणून घेण्यासाठी प्रवरा बँकेच्या वतीने लवकरच संवाद कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येईल, अशी माहितीही त्यांनी दिली.

कार्यक्रमाचे स्वागत बँकेचे चेअरमन डॉ. भास्करराव खर्डे यांनी केले.

*******

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

चंदीगड स्टोअरमध्ये गोळ्यांचा पाऊस : कॅशियरची गोळ्या झाडून हत्या; 13 राऊंड गोळीबार, थंडगार सीसीटीव्ही...

चंदीगड: चंदीगडच्या सेक्टर 11 मधील एका मेडिकल स्टोअरमधील कॅशियरची शनिवारी दुपारी दोन मुखवटाधारी व्यक्तींनी दुकानात गोळीबार केल्याने त्याची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली.या हल्ल्यात...

घरामध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुम्ही “सन टेस्ट” केली आहे का?

भारतातील बहुतेक भागांमध्ये, पूर्वाभिमुख आणि उत्तराभिमुख घरे सामान्यतः सर्वात आरामदायक मानली जातात कारण त्यांना मऊ आणि अधिक संतुलित सूर्यप्रकाश मिळतो. पूर्वाभिमुख घरे सकाळचा आल्हाददायक...

पुण्यातील तांत्रिकाची आत्महत्या: सहकाऱ्याच्या आत्महत्येस प्रवृत्त करणाऱ्या तीन आरोपींसह आयटी फर्मच्या दोन महिला अधिकाऱ्यांचा...

AI-व्युत्पन्न केलेली प्रतिमा प्रातिनिधिक हेतूसाठी वापरली जाते. पुणे - भोसरी पोलिसांनी हिंजवडी येथील एका प्रख्यात आयटी कंपनीतील दोन महिला अधिकारी आणि 48 वर्षीय...

'कोणालाही हारलो, पण पाकिस्तानला नाही': जेमिमाह रॉड्रिग्स IND vs PAK महिला T20 विश्वचषक सलामीच्या...

जेमिमाह रॉड्रिग्ज (पीटीआय फोटो/शैलेंद्र भोजक) नवी दिल्ली: भारताची फलंदाज जेमिमाह रॉड्रिग्ज हिने रविवारी बर्मिंगहॅम येथे होणाऱ्या ICC महिला T20 विश्वचषक 2026 च्या उभय...

अमेरिकन सरकारने इंटेल, आयबीएम आणि इतर अमेरिकन कंपन्यांमध्ये भाग घेतल्याने बिल गेट्स खूश नाहीत;...

बिल गेट्स यांनी ट्रम्प प्रशासनाच्या खाजगी अमेरिकन कंपन्यांमधील इक्विटी स्टेक उचलण्याच्या वाढत्या सवयीबद्दल शांत परंतु निदर्शनास चिंतेचा झेंडा दाखवला आहे, असा इशारा...

error: Content is protected !!