Homeताज्या बातम्यापोकळेच्या गुंडगिरीबद्दल मराठवाड्यातील भाजपाचे नेते आमदार सुरेशजी धस यांना निवेदन —-डॉ राजेंद्र...

पोकळेच्या गुंडगिरीबद्दल मराठवाड्यातील भाजपाचे नेते आमदार सुरेशजी धस यांना निवेदन —-डॉ राजेंद्र पिपाडा ( भाजपा नेते )

शिर्डीतील सचिन गिधे या तरुणाची मोक्क्यातील गुंड दीपक पोकळे याने जिवंत जाळून क्रूर व भीषण हत्या केली. या पोकळेच्या गुंडगिरीबद्दल मराठवाड्यातील भाजपाचे नेते आमदार सुरेशजी धस यांना निवेदन देवुन यात आपण लक्ष घालावे अशी मागणी भाजपाचे नेते डॉ.राजेंद्र पिपाडा यांच्या निवासस्थानी आमदार सुरेश धस यांनी भेट दिली त्यावेळेस निवेदन देवुन केली. यावेळी प्रगतशील शेतकरी शिवाजी आनप, मदनलालजी पिपाडा,नरेंद्रजी पिपाडा,महावीरजी पिपाडा,निखील पिपाडा,योगेश मुनावत,चेतन पिपाडा,रामदास येवले आदी यावेळी उपस्थित होते.  

       दिलेल्या निवेदनात पुढे म्हटले आहे की, मोक्क्यातील आरोपी दीपक पोकळे हा सराईत गुन्हेगार आहे. गेल्या 15 वर्षापासून राहाता,शिर्डी,कोपरगाव,संगमनेर या तालुक्यात दहशत करतो. राहात्यामध्ये दिनेश भडांगे नावाचा एक गरीब मुलगा चहाचा व्यवसाय करत होता. पोकळे त्याचा गल्ला लुटायला गेला त्याने विरोध केला तर त्याचे मुंडके तोडून 2014 साली त्याचा खुन केला. राहाता पो.स्टे. गु.र.नं. 31/2014 भादवि कलम 302 दाखल आहे. साकुरीतील एका हॉटेलमध्ये जेवनाचे बील मागीतले म्हणुन त्याने त्याठिकाणी गोळीबार केला होता. त्याचा राहाता पो.स्टे.येथे 2017 आर्म अँक्ट कलम 4/25 सह.महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी अधि.सन 1999 चे कलम3(1) प्रमाणे गुन्हा दाखल आहे. रेशनचे धान्य वाहतूक व्यवसाय करणारे विजय बोबडे यांना रिव्हॉल्वहर लावून त्यांच्याकडून 10 लाख रुपये लुटले. त्याचा राहाता पो.स्टे.मध्ये गु.र.नं.220/2023 भादवि कलम 395,341,385,384,आर्म अँक्ट कलम 4/25 प्रमाणे गुन्हा दाखल आहे. दि.13/09/2025 रोजी त्याने संगमनेर तालुक्याताल अनिल आहेर यांच्यावर जीवे मारण्याच्या उद्देशाने धारदार शस्त्राने वार केला. संगमनेर तालुका पो.स्टे.येथे गु.रं.नं. 56/2025 गुन्हा दाखल आहे. या गुन्ह्यात अद्याप पर्यंत त्याला अटक केलेली नाही. 4 महिन्यापुर्वीच्या या खुनी हल्ल्यामध्ये पोलिसांनी दीपक पोकळेला जर अटक केली असती तर शिर्डीतील सचिन गिधे या तरुणाचे प्राण वाचले असते.

10 डिसेंबर रोजी शिर्डी येथुन आरोपी दीपक पोकळे याने सचिन गिधे या तरुणाचे अपहरण करून टायर व डिजेलच्या सहाय्याने जाळून टाकले. पोकळे या गुंडाने आता पर्यंत हजारो साईभक्तांच्या गाड्या लुटल्या परंतु त्यापैकी ठरावीकच गुन्हे लुटल्याचे दाखल आहेत. त्याचे विरुद्ध मोक्का,खुन,खुनाचा प्रयत्न,दरोडा,जबरी चोरी,गाड्या लुटणे,घरफोड्या करणे,हप्ते गोळा करणे,अवैध वाळू उपसा करणे असे गुन्हे दाखल आहेत.फिर्यादीला जीवे मारण्याच्या धमक्या देवुन तो फिर्यादीही मागे घ्यायला लावतो अशी त्याची गुंडगिरीची पद्धत आहे. संगमनेर तालुक्यात 4 महिन्यापूर्वी जो त्याचे खुनी हल्ला केला त्यात त्याला पोलिसांनी वेळीच अटक केली असती तर शिर्डीतील तरुणाची निर्घृणपणे जी हत्या केली हा प्रकार टळला असता.

   शिर्डी मतदार संघातील राजकीय नेत्यांनी दीपक पोकळे याला पाठबळ दिले त्यामुळे त्याने आपले कोणीच काही वाकडे करू शकत नाहीत. मोठी राजकीय शक्ती आपल्या बरोबर आहे असे त्याला वाटत असल्याने त्याचे धाडस वाढले व त्यातून त्याने अपहरण करून अत्यंत निर्दयीपणे डिजेलच्या सहाय्याने जाळून टाकून खून केला त्यामुळे शिर्डी मतदारसंघामधील सर्वसामान्य जनतेमध्ये प्रचंड संतापाची भावना आहे.

   तरी राहाता–शिर्डी परिसर हादरवून टाकणार्‍या अपहरण व हत्याकांडाचा अखेर पर्दाफाश झाला असून सचिन कल्याणराव गिधे याचा निर्घृण खून करण्यात आल्याचे उघडकीस आले आहे. या प्रकरणातील दहशत निर्माण करणारा सराईत गुन्हेगार दीपक अंबादास पोकळे याला कठोर शिक्षा करून मृत झालेल्या तरुणाच्या कुटुंबाला न्याय द्यावा ही विनंती. 

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

एजबॅस्टनचा इतिहास! भारत-पाकिस्तानने मोडला महिला T20 विश्वचषकातील विक्रम | क्रिकेट बातम्या

भारताच्या स्मृती मानधनाने तिची अर्धशतक पूर्ण केली (AP/PTI) एजबॅस्टन येथे रविवारी भारत आणि पाकिस्तान यांच्यातील ब्लॉकबस्टर चकमकीने केवळ भारतीय विजय मिळवून दिला नाही...

ट्रम्प यांनी इराण करार पूर्ण झाल्याची घोषणा केल्याने तेलाच्या किमती घसरल्या; ब्रेंट प्रति बॅरल...

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणसोबतचा करार "पूर्ण" घोषित केल्यानंतर आणि जागतिक ऊर्जा पुरवठ्यासाठी महत्त्वाची धमनी असलेल्या "होर्मुझची सामुद्रधुनी त्वरित टोल-फ्री पुन्हा...

आजची इजिप्शियन म्हण: “स्नानगृहात प्रवेश करणे म्हणजे ते सोडण्यासारखे नाही.” |

दिवसाची इजिप्शियन म्हण (गुगल मिथुनद्वारे व्युत्पन्न केलेली प्रतिमा) तुम्ही थांबून क्षणभर त्यांचा विचार करेपर्यंत काही नीतिसूत्रे अनाकलनीय वाटतात."स्नानगृहात प्रवेश करणे म्हणजे ते सोडण्यासारखे...

सायबर फसवणूक पीडितांना प्रत्येक खेचर खात्यातून 50 हजारांपर्यंत पैसे मिळू शकतात

बनावट स्टॉक ट्रेडिंग ॲप्लिकेशनद्वारे गुंतवणूक करण्याचे आमिष दाखवणाऱ्या सायबर घोटाळेबाजांकडून तेल्लापूर येथील एका ४७ वर्षीय सॉफ्टवेअर इंजिनीअरने ३.२६ कोटी रुपये गमावले आहेत. पीडितेने...

64 धावांची हॅमरिंग! दीप्ती शर्मा आणि ऋचा घोष यांनी पाकिस्तानला बुडविले कारण भारताने टी-२०...

दीप्ती शर्माने ICC महिला T20 विश्वचषक, बर्मिंघम, इंग्लंड येथे भारत आणि पाकिस्तान यांच्यातील गट 1 क्रिकेट सामन्यादरम्यान पाकिस्तानच्या नतालिया परवेझला धावबाद करण्याचा प्रयत्न...

error: Content is protected !!