Homeताज्या बातम्या*पत्रकारांच्या अडचणी आणि प्रश्न सोडवण्यासाठी सकारात्मक: विधानपरिषद सभापती प्रा. राम शिंदे* ...

*पत्रकारांच्या अडचणी आणि प्रश्न सोडवण्यासाठी सकारात्मक: विधानपरिषद सभापती प्रा. राम शिंदे* *राज्य वृत्तपत्र व प्रसारमाध्यम अधिस्वीकृती समिती सदस्यांशी साधला संवाद*

*पत्रकारांच्या अडचणी आणि प्रश्न सोडवण्यासाठी सकारात्मक: विधानपरिषद सभापती प्रा. राम शिंदे*

*राज्य वृत्तपत्र व प्रसारमाध्यम अधिस्वीकृती समिती सदस्यांशी साधला संवाद*

शिर्डी दि. ८ : पत्रकार हे लोकशाहीचा चौथा स्तंभ आहेत. बदलत्या परिस्थितीत वास्तवाचे भान ठेवून पत्रकारांना येणाऱ्या अडचणी आणि प्रश्न सोडवण्यासाठी सकारात्मक असल्याचे प्रतिपादन विधानपरिषदेचे सभापती प्रा.राम शिंदे यांनी केले. तसेच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या प्रतिनिधींना कायमस्वरूपी प्रशिक्षण केंद्र नागपूर येथे सुरू करण्याबाबत निश्चितपणे विचार केला जाईल, असे त्यांनी सांगितले.

शिर्डी येथे राज्य वृत्तपत्र व प्रसारमाध्यम अधिस्वीकृती समितीची दोन दिवसीय बैठक सुरू आहे. यावेळी विधानपरिषद सभापती प्रा. शिंदे यांनी समिती सदस्यांची सदिच्छा भेट घेऊन त्यांच्याशी संवाद साधला. यावेळी समितीचे अध्यक्ष यदु जोशी आणि माहिती संचालक डॉ. गणेश मुळे यांनी त्यांचा सत्कार केला. याप्रसंग राज्य समिती सदस्य नवनाथ दिघे, प्रकाश कुलथे, नाशिक विभागीय समितीचे अध्यक्ष सुधीर लंके तसेच राज्य समितीचे सदस्य उपस्थित होते.

विधानपरिषद सभापती प्रा. शिंदे म्हणाले, सर्वांना न्याय देण्याचे काम पत्रकार करत आहेत. या क्षेत्राचे महत्त्व अबाधित ठेवाण्यासाठी पत्रकारितेतील मूल्ये टिकवून ठेवण्याची गरज आहे. भविष्यकाळातील गरजा, निकड, पत्रकारांच्या गरजा ओळखून समितीने त्यासाठी पाठपुरावा करावा, त्यासंदर्भात आवश्यक सहकार्य करण्यात येईल, असे त्यांनी सांगितले.

बदलत्या परिस्थितीत आता प्रत्येक नागरिक हा पत्रकार झाला आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून तो व्यक्त होत असतो. अशावेळी, पत्रकारांनी सकारात्मक दृष्टिकोनातून काम करणे, वंचिताना न्याय देण्याचे काम सुरू ठेवावे, असे प्रा. शिंदे यांनी सांगितले.

यावेळी समितीचे अध्यक्ष यदु जोशी यांनी समितीच्या कामकाजाची माहिती दिली. नागपूर येथील विधानभवन अधिवेशन काळ वगळता इतर वेळी बंद असते. अशावेळी त्याठिकाणी स्थानिक स्वराज संस्था देशपातळीवर प्रशिक्षण केंद्र असावे आणि तिथेच स्थानिक स्वराज्य संस्था आणि विधिमंडळ कामकाजाचे वृत्तांकन करणाऱ्या पत्रकारांसाठी असावे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

यावेळी विधानपरिषद सभापती प्रा. शिंदे यांच्या हस्ते महिला दिनानिमित्त राज्य अधिस्वीकृती समिती सदस्या सविता हरकरे आणि नेहा पुरव यांचा सत्कार करण्यात आला. डॉ. मुळे यांनी आभार व्यक्त केले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

चंदीगड स्टोअरमध्ये गोळ्यांचा पाऊस : कॅशियरची गोळ्या झाडून हत्या; 13 राऊंड गोळीबार, थंडगार सीसीटीव्ही...

चंदीगड: चंदीगडच्या सेक्टर 11 मधील एका मेडिकल स्टोअरमधील कॅशियरची शनिवारी दुपारी दोन मुखवटाधारी व्यक्तींनी दुकानात गोळीबार केल्याने त्याची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली.या हल्ल्यात...

घरामध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुम्ही “सन टेस्ट” केली आहे का?

भारतातील बहुतेक भागांमध्ये, पूर्वाभिमुख आणि उत्तराभिमुख घरे सामान्यतः सर्वात आरामदायक मानली जातात कारण त्यांना मऊ आणि अधिक संतुलित सूर्यप्रकाश मिळतो. पूर्वाभिमुख घरे सकाळचा आल्हाददायक...

पुण्यातील तांत्रिकाची आत्महत्या: सहकाऱ्याच्या आत्महत्येस प्रवृत्त करणाऱ्या तीन आरोपींसह आयटी फर्मच्या दोन महिला अधिकाऱ्यांचा...

AI-व्युत्पन्न केलेली प्रतिमा प्रातिनिधिक हेतूसाठी वापरली जाते. पुणे - भोसरी पोलिसांनी हिंजवडी येथील एका प्रख्यात आयटी कंपनीतील दोन महिला अधिकारी आणि 48 वर्षीय...

'कोणालाही हारलो, पण पाकिस्तानला नाही': जेमिमाह रॉड्रिग्स IND vs PAK महिला T20 विश्वचषक सलामीच्या...

जेमिमाह रॉड्रिग्ज (पीटीआय फोटो/शैलेंद्र भोजक) नवी दिल्ली: भारताची फलंदाज जेमिमाह रॉड्रिग्ज हिने रविवारी बर्मिंगहॅम येथे होणाऱ्या ICC महिला T20 विश्वचषक 2026 च्या उभय...

अमेरिकन सरकारने इंटेल, आयबीएम आणि इतर अमेरिकन कंपन्यांमध्ये भाग घेतल्याने बिल गेट्स खूश नाहीत;...

बिल गेट्स यांनी ट्रम्प प्रशासनाच्या खाजगी अमेरिकन कंपन्यांमधील इक्विटी स्टेक उचलण्याच्या वाढत्या सवयीबद्दल शांत परंतु निदर्शनास चिंतेचा झेंडा दाखवला आहे, असा इशारा...

error: Content is protected !!